`भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी’ हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले. […]
श्रीधरांचे घराणे आनंद संप्रदायाचे; परंतु संतांना आदर्श मानणाऱ्या श्रीधरांनी वारकरी संप्रदायाची जवळीक साधली आणि आपल्या मनातील भावना, विचार व्यक्त करण्यासाठी संतांची अभंग व ओवी ही अभिव्यक्तीची माध्यमे वापरले. त्यांचे ग्रंथ त्या काळात लोकमान्य झाले होतेच. पण आजही ती मनोभावे वाचली जातात.. […]
डॉ. अॅड्रीअन कॅन्ट्रोव्हिटझ् दक्षिण आफ्रिकन हृदयशल्यविशारद डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड यांनी जगातील पहिली मानवी हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. दुसरी मानवी हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा मान डॉ. अॅड्रीअन कॅन्ट्रोव्हिटझ् यांच्याकडे जातो. ६ डिसेंबर १९६७ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क मधील ‘मायमोनिडेस मेडिकल सेंटर’ येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. कॅन्ट्रोव्हिटझ् यांनी हृदयशल्यचिकित्सेच्या क्षेत्रात अतिशय भरीव कामगिरी केली आहे. प्रस्तुत शस्त्रक्रिया हा त्यांच्या शिरपेचातील […]
“आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे चिरंजीव श्रीनिवास शारंगपाणी यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी… […]
प्रवीण दवणे… वक्ते, साहित्यिक, मराठीचे अध्यापक आणि एक मनमोकळं व्यक्तिमत्त्व. जे त्याच्या छायाचित्रातून जाणवत राहते… पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण, अनेक कवितासंग्रह, नाटकांचं लिखाण, तब्बल सवाशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठीची गीतरचना, अडीचशेहून अधिक कॅसेटस्साठी दोन हजांहून अधिक भावगीतं आणि भक्तिगीतांचं लिखाण, सतत दौऱयावर राहून दर्दी प्रेक्षकांची गर्दी खेचणाऱया कार्यक्रमांचा सूत्रधार आणि सुमारे चार दशकं मराठीचे खमके अध्यापक म्हणून […]
१६४२ मधे गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच वर्षी न्यूटन जन्मला. ज्या तारखेला (८ जानेवारी) गॅलिलीयो मृत्यू पावला त्याच तारखेला हॉकिंग जन्मला, ३०० वर्षाच्या अंतराने १९४२ मधे. हॉकिंग याचा उल्लेख योगायोग असाच करतात. जे विश्वाच्या उत्पत्तीचा शोध घेत आहेत ते अशा घटनांना नियमात कसे बसवतील? […]
आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी. मराठी साहित्य आणि नाटय़सृष्टीत मोलाचं योगदान केलेल्या राम गणेश गडकरींची ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही नाटकं, तर ‘वाग्वैजयंती’ हा काव्यसंग्रह आजही रसिकांवर गारुड घालत आहे. याच गडकरींचा मराठी धागा पुढे कायम राखत आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या […]
नटसम्राट’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच. […]
`डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. […]
हृदय-प्रत्यारोपणाच्या इतिहासात डॉ. नॉर्मन शुमवे यांचे नाव सोनेरी अक्षरांत लिहिलेले आहे. त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड येथील पहिले हृदय-प्रत्यारोपण केले. त्याआधी बराच काळ ते यावर काम करीत होते. या विषयावर पथदर्शी संशोधन व कार्य करण्याचे श्रेय शूमवे यांच्याकडे जाते. डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड यांनी शुमवे यांच्याकडे हृदय-प्रत्यारोपणाचे प्रशिक्षण घेतले असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. मानवी हृदय-प्रत्यारोपणाची […]