नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

गायक महेश काळे

शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने […]

देवरुख मधील ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक वसंत उर्फ बाळासाहेब पित्रे

बाळासाहेब पित्रे आणि देवरूख हे समीकरणच गेल्या अनेक वर्षात निर्माण झाले होते. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२८ रोजी झाला. वसंत मनोहर उर्फ बाळासाहेब पित्रे यांनी हिंदुस्थान लिव्हर, टाटा यांच्या सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये आधी मानव संसाधन क्षेत्रात ज्येष्ठ पदावर काम केले होते. देवरुख येथील जगप्रसिद्ध सुश्रुत-अॅडलर या ओर्थोपेडिक शल्य चिकित्सा उपकरणे तयार करणाऱ्या नामांकित कंपनीचे ते संस्थापक संचालक होते. बाळासाहेब […]

ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं.सत्यशील देशपांडे

शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू! लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. त्यांचा जन्म ९ जानेवारी […]

महान गायक महेंद्र कपूर

मनोज कुमार यांच्या “उपकार‘ चित्रपटातलं आजही दर स्वातंत्रदिनी अन्‌ प्रजासत्ताकदिनी आवर्जून कानांवर पडणारं गाणं “मेरे देश की धरती‘… हे गाणं कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीच्या संगीताने जेवढं लोकप्रिय केलं, त्याहीपेक्षा ते देशभर नेलं ते महेंद्र कपूर यांच्या आवाजाने. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९३४ रोजी झाला. महेंद्र कपूर यांचा जन्म व्यापारी घरात झाला. पण, त्यांना या व्यवसायात रुची नव्हती तर गीत-संगीताकडे त्यांचा […]

पखवाजवादक शंकरबापू आपेगावकर

शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव या छोट्या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना पखवाज वाजवायचा नाद होता. शंकरबापू आपेगावकर हे राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक होते. ते वारकरी प्रकारचे सुद्धा पखवाजवादन करीत. त्यांचा १९८६ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. शंकरबापू आपेगावकर यांचे मूळ नाव शंकर शिंदे होते. शंकरबापू आपेगावकर यांचा मुलगा उद्धवबापू आपेगावकर हे […]

कवी आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर

गोविंद वासुदेव कानिटकर हे कवी आणि भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना चित्रकला आणि संगीतातही गती होती. त्यांनी काही दीर्घकाव्यं लिहिली होती. त्यांचा जन्म ९ जानेवारी १८५४ पुणे रोजी झाला. कानिटकरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात आणि उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले. १८७६ मध्ये ते बी.ए. झाले. एल्‌एल.बी झाल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तीन वर्षे वकिली केली. नंतर ते सरकारी न्यायालयात मुन्सफ […]

जगप्रसिद्ध ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग

स्टीफन हॉकिंग यांचे वडील डॉ.फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी ऑक्सफर्ड इंग्लंड येथे झाला. स्टीफन यांच्या जन्माच्या वेळी, डॉ.फ्रँक आणि इसाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालु होते. स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत लंडनला स्थलांतर केले, कारण त्यांचे वडील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिसीनमध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे […]

एक प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय

दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. त्यांचा जन्म १२ जुलै १९०९ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळात कधी शेतकऱयांची व्यथा, रहस्यमय, विरह, समाजव्यवस्था आदी विषय त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आणि आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. ते खास करून चित्रपटामध्ये सौदर्याचा वापर करून घेणार दिग्दर्शक […]

लेफ्टनन्ट जनरल लाॅर्ड बेडन पावेल

स्काउट व गाईड्स या अवघ्या जगाला व्यापून टाकणाऱ्या विधायक चळवळीचे जनक लेफ्टनन्ट जनरल लाॅर्ड बेडन पावेल यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्स स्मिथ बेडन पॉवेल. लंडन मधील चार्टर औस ह्या शाळेत शिष्यवृती मिळवून त्यांनी शिक्षण केले. १८७६ साली लष्करात त्यांना कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी दक्षिण अफ्रीका, अफगाणिस्थान, भारत अशा […]

1 198 199 200 201 202 381
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..