स्पर्धेच्या या जगामध्ये माणूस स्पर्धक झाला आणि तो इतका बेभान झाला की त्याला कुठल्याही गोष्टीची काही घेणे देणे नाही , त्याला फक्त जिंकायचं आहे आणि ती जिंकणे त्याच्या आयुष्याचं ध्येय होऊन बसलेल आहे. इथल्या बहुतेक सर्वच स्पर्धेमध्ये माणूस निश्चितच जिंकणार पण खर्या आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तो हरणार तर नाही ना ही भीती मात्र वाटते….. […]
असं म्हणतात की माणसाने निसर्गाकडून गोष्टी शिकल्या पाहिजेत. आता समुद्राचंच उदाहरण घ्या ना , तो कधीही निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादांचं उल्लंघन करत नाही आणि जर का त्याने मर्यादा ओलांडल्या तर काय होतं ह्याचं त्सुनामीपेक्षा दुसरं कुठलंच मोठं उदाहरण नाही. जर माणसांनी मर्यादा पाळल्या तर आयुष्यात कितीतरी संकटांना तो टाळू शकतो. […]
बऱ्याच लोकांना आज मातृदिन आहे हेच माहीत नसेल. ते सगळेजण भुवया वर चढवून विचार करतील की आज कुठून मातृदिन आला? मी अशा सर्वांसाठी सांगू इच्छितो की , ह्या मातृदिनाचा इतिहास , आपण मे महिन्यात साजरा करतो त्या मातृदिनाच्या इतिहासापेक्षा जुना आहे. […]
आजकाल कोणतीही वस्तु विकत घेण्यासाठी घराबाहेर पडून बाजारात जावेच लागते असे काही नाही. आजच्या डिजिटल युगात टाचणी पासुन फ्रिज पर्यन्त जवळपास सर्व गोष्टी ऑनलाईन घरी मागवणे शक्य झाले आहे. अगदी हॉटेल मध्ये जाऊन जेवण्याची जरी इच्छा झाली तरी ऑनलाईन जेवणच घरी मागवणे शक्य आहे आज. […]
सर्व प्रकारची शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ता धारण केलेल्या बेरोजगारांची शिक्षकभरती आणि प्राध्यापक भरतीसाठी चाललेली आरडाओरड कोणत्याही राज्यकर्त्यांना दिसून येत नाही. किंबहुना दिसत असली तरी राजकीय स्वार्थासाठी कायम दुर्लक्ष करणे यातच हीत मानले जाते. फक्त आश्वासनाचे पीक घेणारे थोडा दिलासा देऊन जातात, मग मात्र सब घोडे बारा टक्के. […]
गुंजन दोन मनांचे म्हणजे, आपले मन एखाद्याच्या मनाशी गुणगुणणे, असा इथे अर्थ नव्हे….. तर आपले एक मन आपल्याच दुसर्या मनाची परीभाषा ओळखणे, असा इथे अर्थ आहे. […]
गुणधर्म म्हणजे आपल्यातलीच एक विशेषता…….मानवाचा खरा गुणधर्म म्हणजे मानवता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, ही मानवियता … जसे जलाचा धर्म आहे तहान भागवणे व्याकुळता दुर करणे, सुर्याचा धर्म आहे सुष्टीला प्रकाश देणे. सजीवांकरीता जीवनसत्त्व निर्माण करणे. वायुचा धर्म आहे प्राण़वायु देणे, अग्निचा धर्म आहे उष्णता देणे. […]
सोळावे वर्ष हे असे वर्षे असते जिथे विद्यार्थ्यांच्या मन आणि शरीरात अमुलाग्र बदल होत असतात. सोळावे वर्ष हे आपण तारुण्याच्या पदार्पनाचे वर्ष मानतोत. शाळेच्या कडक शिस्ती मधून विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या मुक्त जीवनामध्ये प्रवेश केलेला असतो. जिथे बारावीला उत्तम मार्क घेऊन पुढील आयुष्याच्या दिशा ठरवायच्या असतात त्याच क्षणी या वयात विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी भुरळ घालण्याचा प्रयत्न करत असतात. […]
संस्कृत सुभाषिता मध्ये पण म्हटले आहे की मित्रच नसले तर सुख कुठुन मिळणार ? असे प्रतिपादित करून मैत्रीचे महत्व सांगितले आहे.बालपणात ती नकळत होते.गंमत म्हणजे निस्वार्थ भाव असला तरी, त्या वयात कट्टी/ दोस्ती करून ती तोडतां जोडतां येते. नातगोत एखाद्या केळ्यासारखे असते.तुटले तर जोडता येत नाही पण मैत्री एखाद्या लाडु सारखी असते. […]