नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…

भ्रमंती सरोवरांची

गावागावागणिक प्रत्येक तळ्याला, लेकला त्या गावाची परंपरा व इतिहास जोडलेला आहे, कोल्हापूरचा रंकाळा,  नागपूरचा शुक्रवार,  हैदराबादचा हुसेनसागर,  नैनितालचा नैनी या व अशा अनेक तलावांच्या सुंदर आठवणी मनाला आगळा वेगळा आनंद देतात. काही सरोवरे मात्र माझ्या अंतर्मनाला विलक्षण आनंद देत गेली ती त्यांच्या  निर्मितीचा छाती दडपून टाकणारा इतिहास, त्यांची अती भव्यता व निसर्गाच्या  वैविधतेमुळे ! सरोवरांच्या भटकंतीची मजा औरच आहे.  […]

गंगा आरती -एक दिव्य अनुभूती

आजवर जी आरती दूरदर्शनवर कधीतरी पाहिली होती, ती प्रत्यक्षात अनुभवता आली याचा अतिशय आनंद वाटत होता. आता उठून परत फिरण्याच्या विचारात होतो तोच लाटांवर नाचत छोट्या छोट्या प्रकाशज्योती येताना दिसू लागल्या. मोठ्या मजेशीर दिसत होत्या. त्या पाण्यावर कशा तरंगताहेत याचे आश्चर्य जवळ आल्यावर निवले. […]

पाणबुडी ( submarine ) म्युझियम – भारतीय नौदलाचे गौरवस्थान

भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आंध्र राज्यातील विशाखापटटम ( वैझ्याग ) हे पुरातन काळापासूनचे महत्वाचे बंदर. ब्रिटीश राज्यकर्त्यानी मोठी गोदी बांधून समुद्र व्यापार मार्गाचे महत्वाचे ठिकाण तयार केले. आज भारतीय नौदलात त्याचे अनन्य साधारण महत्व असून सबमरीन्सचा महत्वाचा बेस येथे आहे. विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीच वरील सबमरीन म्युझियम पाहून डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्येक भारतीय नागरीकाने त्याला भेट देऊन मानाचा मुजरा दिलाच पाहिजे अशी ही विशेष जागा आहे. आशिया खंडातील अशा तऱ्हेचे हे एकमेव म्युझियम आहे. […]

युरेशीयन व सी.आय.एस देशांची सफर

जरी बाल्टिक देश खूप जवळ असले तरी ते पाहिल्यावर प्रत्येक देश हा वेगळा भासतो. येथील स्वस्त शॉपिग, बाझार, जेवण, भाषा, संस्कृती पर्यट्कांना आकर्षित करते. […]

बजेट मध्ये – रशियन ट्रान्स सैबेरियन, एक स्वप्नवत किफायतशीर मनोरंजक प्रवास

ट्रान्स सैबेरियन टूरचा प्रवास करणे म्हणजे बऱ्याच लोकांचं एक स्वप्न असतं. जगातील सर्वात मोठा रेल्वे प्रवास – मॉस्को पासून ते रशियाच्या पूर्वेच्या व्लादिवोस्तोक पर्यंत किंवा दुसरा मॉस्कोपासून ते मंगोलिया मार्गे बीजिंगपर्यंत. (ट्रान्स मंगोलिन) १५ दिवसांचा प्रवास करण्यासाठी चांगले नियोजन आणि थोडासा अभ्यास करावा लागतो. […]

दगड-गोट्यांची अनोखी बाग

माणसाच्या आवडीतून काय कलाकृती घडेल काही सांगता येत नाही.. काळ्या कुळकुळीत बेढब अशा दगडातूनही शिल्प घडत ते या माणसाच्या याच आवडीने … अशाच एका अवलियाला वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद होता.. […]

द रशियन कनेक्शन : रशिया टुरची नवी ओळख

जगातला सर्वात मोठा देश रशिया व ह्याच रशिया टुरसाठी आपण खरेच काय पाहतो ? रुशिया टूर करायची असल्यास आपण काय पाहतो तर, मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग. ह्या रशियाच्या खऱ्या दोन राजधान्या होत, पण ह्यासाठी आपण किती दिवस देतो तर प्रत्येकी दोन किंवा तीन  दिवस ! पाच दिवसाच्या रशिया टूर मध्ये फक्त भुज्याला शिऊन येतो. आणि रशिया पर्यटन म्हणजे  केवळ मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग पर्यंतच सीमित नाही. […]

रक्तरंजित आघातातून उभे राहिलेले पवित्र स्थान – सोरटी सोमनाथ

सोरटी सोमनाथच्या मंदिराचा रक्तरन्जीत इतिहास आणि आता उभे असलेले मंदीर भारताचे गौरव स्थान आहे. प्रत्येक भारतीयांनी अवश्य भेट द्यावी असे पर्यटन स्थळ आहे. एखादे धार्मिक स्थान हजारो वर्षे अनेक स्वाऱ्यामध्ये नेस्तनाबूत होते, परंतु त्यानंतर प्रत्येक वेळा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहते असे एकमेव स्थान आहे सोरटी सोमनाथ. सौराष्ट्राच्या पश्चिम किनारयावर वेरावळ पासून २० किमी वर वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांमधील प्रथम क्रमांकावर असलेल्या या स्थानाचा इतिहास रक्तरंजित आहे. […]

महेश्वरची महाश्वेता… अहिल्याबाई होळकर

प्रत्येक मराठी मनात ‘माळव्या’ बद्दल एक वेगळीच जवळीक आणि हळवं आकर्षण आहे. इंदूर … धार … देवास … मांडू .. जीवनदात्री…गूढरम्य नर्मदा …. ही आकर्षणं तर मराठी मनात खूप आहेतंच पण अजून मोठं आकर्षण म्हणजे नर्मदेच्या तीरावरचं महेश्वर आणि अहिल्याबाई होळकर. […]

पुराणपुरुष

जंगलातल्या मोकळ्या माळावर चरणांरा ‘रानगवा’ एवढ्या बेफिकिरीत वावरत असतो, की तो जणु काही त्या परिसराचा अनभिषिक्त सम्राटच आहे. त्याची ताकदच तशी प्रचंड असते. शरिराचा विलक्षण सुंदर घाट आणि पिळदार स्नायू यामुळे तो दिसतोही उत्तम शरीर कमावलेल्या पैलवानासारखा. व्यायामानं जसं पैलवानाचं शरीर चमकत असतं तशीच त्याची त्वचाही चमकत असते. त्याचं ते ‘बेरड’ रूपंच सगळ्या जंगलविश्वाला टरकावत असतं. […]

1 23 24 25 26 27 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..