दगड-गोट्यांची अनोखी बाग

माणसाच्या आवडीतून काय कलाकृती घडेल काही सांगता येत नाही.. काळ्या कुळकुळीत बेढब अशा दगडातूनही शिल्प घडतं ते या माणसाच्या याच आवडीने …

अशाच एका अवलियाला वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद होता… वेगवेगळ्या रंगाचे आकाराचे दगड त्याने इतके जमाविले की त्या दगड गोरगो़ट्यांतून वेगवेगळ्या शिल्पांनी आकार घेतला… आणि त्या दगड-गोट्यांची साकारल्या शिल्पांची अख्खी बाग सुमारे १२ एकर मध्ये उभी राहिली.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

चंदीगढ मधील अभियांत्रिकी विभागातले रोड इन्स्पेक्टर म्हणून काम करणार्‍या नेकचंद यांनी हे रॉक गार्डन साकारालं… या रॉक गार्डन मध्ये तूम्हाला या दगडगोट्यांची वेगवेगळी शिल्पं दिसातील..नृत्यांगना, मोर, पशूपक्षी, सैनिक आणि बरंच काही..

या अनोख्या उद्यानाला १९७६ मध्ये सार्वजनिक स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.. आणि हे उद्यान घडविणार्‍या त्या अनोख्या शिल्पकाराला म्हणजेच नेकचंदजींना १९८३ साली भारत सरकारनं पद्मश्री देऊन गौरविले आणि त्यांच्या रॉक गार्डनच चित्रही भारतीय टपाल तिकीटावर छापण्यात आलं.

वॉशिंग्टन च्या चिल्ड्रेन्स म्युझिअमचे प्रमुख एन.लेव्हीन यांनी जेव्हा चंदिगढच्या रॉक उद्यानाला भेट दिली तेव्हा ते थक्क झाले आणि नेकचंद यांना विनंती केली असाच शिल्पाविष्कार वॉशिंग्टनला घडवावा.. आणि १९८६ साली नेकचंदजींनी पुन्हा एकदा आपला कलाविष्कार दाखविण्यास सुरूवात केली..

नेकचंदजींनी आपल्या अनोख्या कलेतून दगडांचीही सुंदर बाग होऊ शकते ह्याची जाणीव करून दिली.

— मिलिंद जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....