नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…

मध्यमहेश्वर

हिमालय हा भारताच्या सांस्कृतिक भावजीवनातील एक अनन्यसाधारण विभुती आहे. भारताची सस्यशामल भूमी समृद्ध करणाऱ्या पवित्र नद्यांचा हिमालयात उगम झाला आहे. परंपरेने भगवान शंकराचे हिमालयाशी नाते जोडले आहे. अशा शंकरानी आपल्या कायम वास्तव्यासाठी हिमालयाची निवड केली. पुराणांनी शंकराचे हिमालयाशी आलेले कोमल संबंध आल्हादाने उलगडून दाखवले आहेत. अनेक देव-देवतांचे क्रीडास्थान, निवासस्थान म्हणून हिमालय पुराण प्रसिद्ध आहे. कालिदासाने आपल्या […]

हिमशिखरांच्या सान्निध्यातलं केदारनाथ

चैत्र महिना उजाडतो. आकाश निळ्या रंगाने झळकू लागते. आसमंतात सोनशिंपण पसरते. सूर्यकिरणांचे नाजूक हात पर्वतशिखरे गोंजारू लागतात. बर्फाची चादर हलकेच दूर होऊ लागते. नव्या नवलाईचे दिवस सुरू होतात. खुलणारा निसर्ग हसरा होऊ लागतो. […]

पाताळ भुवनेश्वर

ही स्कंदपुराणाच्या मानसखंडातील कथा आहे. त्रेता युगात सूर्यकुलोत्पन्न चक्रवर्ती राजा ऋतुपर्ण अयोध्येवर राज्य करीत होता. एके दिवशी नल राजा आपली पत्नी दमयंती हिच्याबरोबर सारीपाट खेळत असताना खेळात हरला. शरमलेला नल राजा आपला मित्र राजा ऋतुपर्ण याच्याकडे आला व एखाद्या अज्ञात स्थळी आपल्याला लपवून ठेवण्याची ऋतुपर्ण राजाला विनंती करू लागला. ऋतुपर्ण राजा नल राजाला घेऊन हिमालयातील एका […]

नंदराज जटयात्रा – भाग 3

बाराव्या दिवशी यात्रा ३०४९ मी. उंचीवरील गरोली पाताळ या ठिकाणी येते. हे अंतरसुद्धा १०-११ कि.मी. आहे. तेराव्या दिवशी यात्रेकरू कैलगंगेत स्नान करतात व ‘पातरनचौनिया’ या मुक्कामाकडे प्रस्थान करतात. हे अंतर १२ कि.मी. असून वाट अवघड व चढणीची आहे. पातरनचौनियाची उंची ३६५८ मी. आहे. कोणतीही यात्रा ही संस्कृतीचे, रितीरिवाजाचे दर्शन आहे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने परमेश्वरी चरणी लीन होण्यात […]

नंदराज जटयात्रा – भाग 2

ही यात्रा हरिद्वार-बद्रीनाथ रस्त्यावरील कर्णप्रयागजवळील नौटी या गावापासून सुरू होते. ही यात्रा खडतर आहे. पण निसर्गाचे विलोभनीय दृश्य व गढवाल, कुमाऊँमधील रीतीरिवाज, संस्कृती, लोकगीते, लोककथा या यात्रेत अनुभवायला मिळतात. सरकार तसेच स्थानिक लोक या यात्रेला पूर्ण सहकार्य करतात. ही यात्रा अतिशय पुण्यप्रद समजली जाते. स्थानिक लोक मोठ्या संख्येने तसेच परदेशी पर्यटकसुद्धा या यात्रेत सहभागी होतात. या […]

नंदराज जटयात्रा – भाग 1

ही एक लोककथा आहे. तिन्ही लोकांत असुरांचे प्राबल्य वाढले होते. देव, देवता, ऋषीमुनी, लोक असुरांच्या त्रासाने त्रस्त झाले. शिव संहारक आहे. सर्वांनी जाणले की शिव व शक्ती एकरूप झाल्याशिवाय असुरांचे निर्दालन होणार नाही. सर्वजण शंकराला शरण गेले. आपली व्यथा त्यांनी शंकराला सांगितली. शिव व शक्ती एकत्र येण्याची आवश्यकता पण शंकराला पटवून दिली. शंकरालासुद्धा तो विचार पटला. […]

देवभूमीतील पंचबद्री  – भविष्यबद्री

पंचबद्रीमधील शेवटचे स्थान म्हणजे भविष्यबद्री. जोशीमठापासून १७ कि.मी. अंतरावर मलारी रस्त्यावर ‘सुबैन’ या गावी भविष्यबद्रीचे मंदिर पर्वतराजीत दडले आहे. लोककथेनुसार जोशीमठाच्या नृसिंह मंदिरातील नृसिंह मूर्तीचा कृश होत जाणारा डावा हात गळून पडेल. त्यावेळी नर-नारायण पर्वत एकमेकावर कोसळतील व विशालबद्रीची वाट कायमची बंद होईल. तेव्हापासून भविष्यबद्रीलाच बद्रीनाथचे स्थान समजले जाईल. जोशीमठहून मलारी रस्त्यावर हे स्थान आहे. जोशीमठपासून […]

देवभूमीतील पंचबद्री  – विशालबद्री किंवा बद्रीनाथ  – भाग 3

बद्रीनाथपासून साधारण ३ कि.मी. अंतरावर मूर्तीमातेचे मंदीर आहे. सहस्रकवच राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीविष्णूंनी नर-नारायणाच्या रूपात मूर्तीमातेच्या उदरात प्रवेश केला व भूतलावर प्रगट झाले. त्यामुळे मूर्तीमाता बद्रीनाथाची आई समजून तिची पूजा केली जाते. मूर्तीमातेच्या मंदिराला माता मंदीर म्हणतात. वामन द्वादशीच्या दिवशी बद्रीनाथाची व मातेची भेट घडवून आणली जाते. शृंगारलेली बद्रीनाथाची चांदीची चतुर्भूज उत्सवमूर्ती वाजत गाजत या ठिकाणी […]

देवभूमीतील पंचबद्री  – विशालबद्री किंवा बद्रीनाथ – भाग 2

हे मूळ मंदीर कोणी व कधी बांधले याचे उल्लेख सापडत नाहीत. पण मिळालेल्या एका शिलालेखानुसार हे मंदीर २५०० वर्षांचे पुरातन आहे असा एक अंदाज निघतो. शंकराचार्यांनी या मंदिराचा बद्रीनाथाची मूर्ती स्थापन केल्यावर जीर्णोद्धार केला असावा. आजचे हे मंदीर कत्युरी राजाने बांधले व तिथे पूजा-अर्चा सुरू केली. त्यासाठी मंदिराला त्यांनी काही जमिनी इनाम दिल्या, असे काही संशोधकांचे […]

देवभूमीतील पंचबद्री  – विशालबद्री किंवा बद्रीनाथ – भाग 1

पांडुकेश्वर ते विशालबद्री हे २४ कि.मी. अंतर आहे. या स्थानाचे माहात्म्य विशाल आहे म्हणून हे स्थान विशालबद्री म्हणून ओळखले जाते. ह्या पवित्र भूमीत देवदेवता, ऋषी-मुनी, साधू-संन्याशी, तपस्वी महात्म्यांनी वास्तव्य केले. तपोसाधना, ध्यानसाधना केली. बद्रीनाथचे दर्शन हे त्यांचे जीवन ध्येय होते. या भूमीत व्यास महर्षीनी वेद-पुराणांची, महाभारताची रचना केली. शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर, उपनिषदावर भाष्य याच भूमीत केले. पांडुकेश्वर […]

1 8 9 10 11 12 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..