नवीन लेखन...

दोन देशीचा संसार

आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करावे हे प्रत्येक होतकरू क्रिकेटपटूचे अंतिम ध्येय, स्वप्न असते. फार थोड्या नशीबवान खेळाडूंच्या या स्वप्नाची पूर्तता होते. पण तुम्हाला माहीत आहे का की असेही काही मोजके क्रिकेटपटू आहेत की जे केवळ एका नाही तर चक्क दोन देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेत. कौटुंबिक स्थलांतर, शिक्षण वा नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशगमन, स्वदेशात संधीचा अभाव, विदेशातर्फे खेळण्याची सुसंधी, राजकीय परिस्थिती अश्या विविध कारणांनी क्रिकेटपटू दोन देशांसाठी खेळताना दिसले आहेत. […]

कुटुंब रंगलय क्रिकेटमध्ये

अनेकदा आपण बघतो की मुलं आपल्या आई-वडिलांचा किंवा थोरल्या भावंडांचा व्यवसाय/पेशा स्वतःसाठी स्विकारतात आणि त्यात यशस्वीदेखील होतात. कला,क्रीडा क्षेत्रातही अशी काही उदाहरणे आढळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येसुद्धा आपल्याला अश्या काही वडील-मुलगा किंवा भावा-भावांच्या जोड्या आढळतील. पटकन आठवणारी नावे म्हणजे : अमरनाथ, मांजरेकर, मंकड, ब्रॉड ईत्यादी पिता-पुत्र तर गुप्ते, चॅपेल, वॉ, हसी, पंड्या वगैरे भावांच्या जोड्या. […]

अष्टपैलू : खंडू रांगणेकर

क्रिकेटच्या मैदानावर साधारणपणे फलंदाजी, गोलंदाजी, यष्टिरक्षण / क्षेत्ररक्षण यांपैकी कोणत्याही दोन गोष्टी उत्तम प्रकारे करणाऱ्या खेळाडूला अष्टपैलू म्हटले जाते. पण २७ जून, १९१७ ला मुंबईत जन्मलेल्या ‘खंडेराव मोरेश्वर रांगणेकर’ या भारदस्त नावाच्या मराठमोळ्या गड्याने केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर बॅडमिंटन, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, प्रशासन, समाजकारण अश्या विविध क्षेत्रातही चमक दाखवून खऱ्या अर्थाने अष्टपैलू जीवन व्यतीत केले. […]

दत्ताजीराव गायकवाड – भारतीय क्रिकेटचे पितामह

दूर असले तरी मार्गदर्शक वाटणारे अनेक जुने तारे कालौघात निखळून पडत असतात. भारतीय क्रिकेटच्या प्रांगणातून यावर्षी आपल्यापासून दूर गेलेला, स्वातंत्र्यपूर्व काळाशी नाळ जुळलेला असाच एक तारा म्हणजे ‘दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड’. बडोदा (आत्ताचे–वडोदरा) येथे २७ ऑक्टोबर १९२८ रोजी जन्मलेले ‘डीके’ या टोपणनावाने प्रसिद्ध दत्ताजी बडोद्याच्या प्रतिष्ठित ‘गायकवाड’ राजघराण्याशी संबंधित होते. […]

दत्ता हिंदळेकर : स्मृतिआडचा मराठमोळा क्रिकेटवीर

( मुंबईचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दत्ता हिंदळेकर यांच्या निधनाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली , त्यानिमित्ताने स्मरणांजली ) क्रिकेट हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा खेळ. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी हा खेळ भारतात रुजवल्यानंतर इथल्या स्थानिकांनी त्याला चांगलेच आपलेसे केले. सुरुवातीच्या काळात मोठ्या महानगरांतून या खेळाचा जास्त प्रसार झाला. त्यामुळे मुंबईच्या गल्ल्यांमधूनही क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागली. या खेळासाठी फार साधनसामुग्री […]

जानेवारी १४ : प्रो. दि. ब. देबधरांचे पुण्यस्मरण

१४ जानेवारी १८९२ रोजी पुण्यात दिनकर बळवंत देवधरांचा जन्म झाला. भारतीय क्रिकेटमधील पहिलेवहिले प्रथमश्रेणी शतक देवधरांनी काढले होते, तेही आर्थर गिलीगनच्या नेतृत्वाखालील परदेशी संघाविरुद्ध. हे पहिले भारतीय कसोटी शतकही ठरले असते पण तोवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळच अस्तित्वात नसल्याने हा मान त्यांच्या नावे लागू शकला नाही. महाराष्ट्राने १९३९-४० आणि १९४०-४१ या लागोपाठच्या वर्षांमध्ये रणजी करंडक जिंकला तेव्हा देवधरच कर्णधार होते. सातत्याने मोठमोठ्या सांघिक धावा करणार्‍या महाराष्ट्र संघाने आणि नभोवाणीवरून सामन्यांची वर्णने करणार्‍या बॉबी तल्यारखानांनी भारतात रणजी स्पर्धा लोकप्रिय केली असे खुद्द देवधरांनीच आपल्या ‘शतकाकडे’ या आत्मचरित्रात म्हटले आहे.
[…]

भारताचा जगविख्यात फलंदाज सुनील गावस्कर

भारताचा जगविख्यात फलंदाज (सलामीवीर) सुनील मनोहर गावस्कर यांनी तीस वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध खेळतांना आजच्या दिवशी म्हणजेच “०७ मार्च १९८७”रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आपल्या कसोटी क्रिकेट करकिर्दीतील १०००० (दहा हजार) धावा पूर्ण केल्या. अशी अजोड कामगिरी करणारा सुनील गावस्कर हा क्रिकेट विश्वातील पहिला महान फलंदाज ठरला. पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात सुनील छप्पन धावांवर खेळत […]

फेब्रुवारी ०९ : ग्लेन मॅग्राचा जन्म

जगातील सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाजांपैकी एक आणि ऑस्ट्रेलियाचा सार्वकालिक सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाज (ठसन असलीच तर डेनिस लिलीचीच) अशी मॅग्राची सार्थ ख्याती आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर जे जबरदस्त वर्चस्व राखले त्यात ह्या कबुतराच्या गोलंदाजीचा सलामीचा आणि सिंहाचा वाटा होता.
[…]

1 2 3 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..