‘गणेश’ हे नांव तयार करणारी मराठी वर्णमालेतील ‘ग’, ‘ण’ आणि ‘श’ ही तीन अक्षरं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ह्या तिनही अक्षरांमध्ये त्यांचा काना स्वतंत्र, म्हणजे मुख्य अक्षरापासून किंचित अंतर राखून अदबीने उभा आहे. ह्या तिनच अक्षरांचं हे वैशिष्ट्य. ह्या तीन अक्षरांव्यतिरिक्त बाकीची अक्षरं कान्याचा आधार घेऊन किंवा कान्यात गुरफटून किंवा ‘ळ’सारखी काना(कणा)हीन होऊन उभी आहेत.. गणेश नांव […]
|| हरी ॐ || वर्षानुवर्षे अग्रपूजेचा माझा मान, त्याचे नाही कधी चुकले भान! या वर्षी येताना मनात शंका नाना, आनंदाने स्वागत होईल ना? शेतकरी झाले होते अवर्षणाने हैराण, पीक गेले हातचे शेत झाले वैराण! माझ्याकडे विनंती आर्जव त्यांच्या मनात, आगमनाने बरसूदे पाऊस आमच्या शेतात! वरुणाला आज्ञा माझ्या बरोबर येण्या, नकळत बरसला बेटा वेड्यावीण्या! […]
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत […]
तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा. अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात. आयुष्य त्यांच्या सोंडेइतके लांब असावे आणि
आयुष्यातले प्रत्येकक्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत. […]
महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं. ‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ..? मी […]
आजही मनोभावे हाक मारली असता समाधी घेतलेले शंकर महाराज समोर उभे राहतात हे खास वैशिष्ट्य आहे. आपली लीला आजही कश्या प्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही. अनेकांना याचा अनुभव आला आहे. आणि तसे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. […]
श्रावण सुरु होतोय,पाठोपाठ गणपती,नवरात्र,दिवाळी अशी सणांची रांगच लागते. या सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘नैवेद्य’.. फक्त देवाला दाखवायला लागतो म्हणून असतो का हा ‘नैवेद्य?’.. नाही,खरतरं या ‘नैवेद्य’ करण्यामागे अनेक गोष्टींची योजना आपल्या परंपरेत आहे. […]
सरत्या आषाढात बरसला मुसळधार शेती झाली हिरवीगार नद्या, तळी, धरणे भरली काठोकाठ पाण्याची चिंता टळली पाठोपाठ आषाढा नंतर आला श्रावण नभ मेघांनी आले दाटून रिमझिम बरसती धारा सुंदर ऊन पावसाचा खेळ अधीर श्रावण सरींनी केले नृत्य मस्त मयुरी येई ठुमकत इंद्रधनुचे बांधून तोरण करी रंगांची उधळण श्रावण सोमवारी भोलानाथ […]
हे परमेश्वरा, मला या जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे. यासाठी मला तू अंतिम सत्य सांग. मला एवढे कळते आहे, की माझे अंतिम सत्य तूच आहेस. तरीदेखील माझी बुद्धी मला वेळोवेळी तुझ्यापासून लांब नेते. माझ्या बुद्धीला तू स्थिर बनव. […]