दिवाळीतील आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते, असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी […]
समर्थ रामदास स्वामींची ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत. अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला । अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।। अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज । सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ […]
धरली कास तुझ्या पायी माझा विश्वास मुखी नामघोष तुला भेटण्याची आस ।।1।। चारी वेद तुला गाती विश्वव्यापक तू कमळापती।।2।। अठरा पुराणांच्या अंती साधू संत तुला ध्याती ।।3।। क्षणोक्षणी येते तुझी मला प्रचिती सुख-दुःखात देवा तू माझा सांगाती।।4।। संत तुक्यासाठी तू सखा पांडुरंग नामयाच्या कीर्तनात गातोस अभंग ।।5।। जनीसाठी दळण, कान्होपात्रेला क्षमादान हेची तुझे गुण, ऐकून तृप्त […]
या लेखातून संतांनी श्राद्ध करावं की नाही यावर प्रकर्षाने कटाक्ष टाकला आहे. ब-याच वेळेस श्राद्ध करावं की नाही हा लोकांसमोर प्रश्न असतो त्याचं उत्तर देणारा हा लेख. […]
हिंदू धर्म संस्कृतीला लाभलेलं देणं म्हणजेच हिंदू धर्मातील सणवार पण हेच सणवार कधी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर कधी बंधुत्व आणि प्रेमाचं प्रकटीकरण करण्यासाठी साजरे केले जातात. श्रावणातल्या सणासुदीची रीघ आणि गणेशोत्सवाची धामधूम संपली की, आपल्या पूर्वजांची आठवण काढणारा हा पितृ पंधरवडयाचा कालावधी सुरू होतो. हा पितृपक्षाचा काळ, त्यात केलं जाणारं पूर्वजांचं शास्त्रोक्त स्मरण, पितृपक्षाच्या अखेरच्या दिनी येणारी सर्वपित्री अमावस्या आणि तिचं महत्त्व यावर टाकलेला हा प्रकाशझोत. संतांच्या द़ष्टीतून श्राद्ध म्हणजे काय, तसेच या पक्षातील विविध तिथीवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख आहे. […]
मन माझे हिंदोळ्यावरी बघते धरू आभाळ, विहरते किती उंच ठाऊक खितीज मृगजळ ! मना मनाच्या साखळ्या गुंतता गुंती गुंता, सोडविण्या त्या सगळ्या हैराण जीव पुरता ! मना मनाचे द्वैत भांडते आतल्या आत, भांड भांडूनिया भूस नकळे कशात अंत ! होण्या मन मोकळे फिरे गरगरा भोवर्यावाणी, पळे इकडून तिकडे, मग भटके रोनोमाळी ! मन गेले बुद्धीकडे विचाराव्या […]
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ जनी सर्व सुखी असा कोण आहे । विचारे मना तूचि शोधूनी पाहे । मना तांची रे पूर्वसंचीत केले । तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥ मना मानसी दु:ख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे । विवेके देहेबुद्धी सोडूनी द्यावी । विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी […]
माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा आहे. मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे. नवार्ण मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. […]
मित्रांनो, आपण मनाचे श्लोक, दासबोध किंवा त्यांचे इतर काव्य रचना जेंव्हा वाचतो किंवा ऐकतो तेंव्हा आपल्याला असे वाटत असते की जणू प्रत्यक्ष समर्थच आपल्याला ते सांगत आहेत. संतांच्या वाणीचा हा प्रभाव असतो कारण ते त्यांच्या स्वानुभवाचे बोल असतात. […]
हिन्दू संस्कृती ‘धर्म’ म्हणून ओळखली जाण्याच्या टप्प्यावर, स्वत:ला हिन्दू म्हणवणाऱ्या प्रत्येकाने या लेखात उपस्थित केलेल्या मुद्दयांचा गांभिर्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. मला याबातीत आपण विचारपूर्वक दिलेली उत्तरं जाणून घेण्यात मला रुची आहे, नव्हे आपण हिन्दूंच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी तसं होणं आवश्यक आहे, असंही मला वाटतं. […]