नवीन लेखन...

निसर्गाची शाळा

मह्या शेतातं जोंधळं, डोले डौलं वार्‍यावरं पानं हिरवे वल्लेचिंब, सळसळती तालातं…!!! वारं गाई गाणं छानं, घुमे शिळं कपार्‍यांत, कणीस डोकाऊनं पाहते, धुंडते शिळकर्‍यालं..!!! पानावर पानं सात, पानं बसले चोपून जसं नववारी लुगडं, नेसलं नटुनं थटुनं.!!! दानं भरती कनसातं, मोती पवळंयाची आरासं लपत येई चिमना चोरं, नेई दानं पळवुनं…!!! फुलपाखराच्या संगतीनं, फुलं पहाती लपुन, मध्ये लुडबुडे सुगरनं, […]

मैत्री दीन

तुझ्याशी बोलायला ;शब्दांची गरज नसते तुझ्या सोबत रहायला; सहवासाची गरज नसते इथे तुला आठवता;भावना तीथे पोहचते मनातल्या भावना व्यक्त करायला; सोबत गरजेची नसते मैत्रीच्या नात्याची; हीच तर ओळख असते सोबत सदैव नसते; मनात मात्र कायम असते प्रेम, विश्वास, आपुलकी; हेच तर नाते असते मैत्रीचे हे असेच; अद्भूत रसायन असते तुझी मैत्री माझा विश्वास; हीच ओढ असते […]

मौन

शब्द माझे उतावीळ सदा या मौनातुनी मुक्त व्हावया तू मात्र अशी कां ?अबोली कसे लावू तुजसी बोलावया अव्यक्तातुनीही प्रीत उमजते तुज लागावे कां ? समजावया मौन छळतेच जीवा जिव्हारी हे तुलाही कां ? हवे सांगावया उमलुदे आता मनभावनांना फुलुदे, कळ्यांना गंधाळाया ब्रह्मानंद तोच सुगंध परिमल जीव आसुसला तुज भेटावया शब्दभावनां माझ्या उतावीळ तुझ्याशीच संवाद साधावया नको, […]

बापू….

बापू, आजही तु दिलेल्या टोपीच्या, झाकणाखालून सडलेल्या मेंदूतले, नासके विचार वाहू लागतात ना तव्हा मलं तुह्या अहिंसेतुन जन्मलेल्या मुक्त स्वातंत्र्याची किंमत कळते….!!! बापु, तुलं ते एकदा न कदा मारू शकतात रे, पण जव्हाबी तेह्यनं तुलं, मारायचा प्रयत्न केला नं, तव्हा तव्हा तु रक्तबीजासारखा पुनर्जिवीत झालास…!!! वांझुट्या विचारांच्या आडुन त्यांनी तुलं, मारायचा खुप प्रयत्न केला, टोप्यांना वेगवेगळे […]

आँगस्ट

चौफेर पाऊस मदमस्त् फळी येती पेरलेलेे कष्ट हिरवाई पांघरलेले शिवार झुळझुळ वाहती जीवन झरे सभोवती चार….. विश्रांती घेत बरसती वरुण तुषार धरती ला अवगते नवनिर्मिती सार बरसला तोचि आपला…. मनोवेधी ढग़ गडगडला… पाहुनी जीव तया अवघा गुंतला ऊन पाऊसाचे लपंडावात मन मनस्वी दंगला…. अनुभवी निसर्ग चक्री कवडसे मनी उमली श्रावणी ठसे… श्रावणी सोमवार…. श्रध्दाळू शिवगणी करती […]

गेला आस्तालं सुरयं……

ना.धो.महानोर सर भावपूर्ण श्रद्धांजली गेला अस्तालं सुरयं,काळवंडलं आभाळं जिवं झाला कासावीसं,झाला काळुख आंधारं उजेडाची हि लेखनं,कशी रूकली रूसली आज सरोसती माय,हुंदका फोडून रडली झाली पोरकी कविता, रानी आंधार आंधारं कुठं शोधु तुलं आत्ता,कुठं गेलासी सोडूनं युगां पडलं भगदाडं,झाला युगांत युगांत वलावल्या पापण्यां त्या,वघळत वघळती अवकाश मोठा झाला,त्यालं तुहीच गरजं ये रे आता परतुनी,उजवं सरू मायची कुसं […]

बाई मी शेतातं निंदते….

बाई मी शेतात, शेतातं निंदते, काळ्या मातीतं, जिवनं सांधीते… हाती खुरपं, खुरप्यानं खुरपीते, काळ्या मायंवर,नक्षी मी काढीते….! बाई मी पिकाशी,पिकाशी बोलीते… मव्हा संसार, संसार सांगते… मन हालकं, फुलकं करीते… सुख द:खाचा हिशोब मांडीते…! बाई खुरपं गं, खुरपं संवंगडी… त्याच्या साथीनं, किटाळ काढीते… तणं शावकार, देनं मी मोडीते… काळ्या मायचं रून मी फेडीते….! बाई जगाचा जगाचा जलम…. […]

ऋण जन्मदात्यांचे

हा गर्भ एक पावन उदरातला तो कोण ? कुणा कळला नाही जन्मदात्यांचेच ऋण आजन्मी तेच ब्रह्मरुप ईश्वरी , दुजे नाही….। त्यांना पुजावे, त्यांनाच भजावे श्रद्ध्येय भक्तीप्रीती दुजी नाही पान्हा मातृत्वी वात्सल्यपुर्तीचा पितृत्वासम, दुजा आधार नाही….। जन्मदाते! सर्वश्रेष्ठ या जगती तिथेच नमावे अन्य कोठे नाही पापपुण्यकर्म हिशेब चित्रगुप्ती तिथे तर कुणाची सुटका नाही….। तो जो कोण अनामिक […]

शेवटची ओळं

देह चिखलाचा गोळा, माय बाप रे कुंभार त्यासी देती ते आकार, तसा तसा घडे जाय..!!! लहानपणी माय बाप, बहीन भाऊ गोतावळा, मोठा व्हता बायको भार्या, जिनं व्यापुनं टाकीते…!!! लेकर बाळ आन संसारं, दमछाकीचा तो खेळं, किती धावशीलं पळशीलं, भावना बाजाराचा मेळं…!!! देवा बाजार मांडला, सगळे बाव्हले बाव्हले, मोह टाकुनिया त्यातं, जिवं कामालं लावले…!!! देवा देले दोनं […]

माहेरचा पाऊसं

मह्या शेतातलं पिकं, कस डौलतया तोर्‍यातं, शेतं हिरव हिरवं, मन हारके सुखानं. नभ ढगाळ ढगाळ, झोंबी झोंबाडं गारवा, मना सुखवी शिळानं, पिक नाचे शहारून. ढगं बरसती थेंब थेंब, मोती पखरले शेतातं, त्याचा लेऊन शिंगार, पिकं डौलते डौलात. हिरवले रानं वनं, गेली सृष्टि गोंजारूनं, पशु पक्षी चहकती, कोकिळं करीते गुंजनं. पशु,पक्षी,झाडं,वेली, अवघी धरा उल्हासली, आला महेरचा पाऊस, […]

1 5 6 7 8 9 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..