नवीन लेखन...

हलकेच सख्या मी रानात

हलकेच सख्या मी रानात चोर पावलांनी अशी येते, वाट तुझी पाहता मी बैचेन जराशी मग होते येतो तू असा समोरुन भान हरपून माझे जाते, जवळ येता तू माझ्या मी मोहरुन पुरती जाते. घेता मिठीत अलवार तू चुंबीतो तू बेसावध क्षणा, ओठ ओठांनी अधर तू टिपता लाज गाली येते हलकेच तेव्हा स्पर्श तुझा बावरा मज होता पदर […]

मायमाऊली मराठी

माऊली मराठीच माझी मायबोली ज्ञानयोगीयांची कनवाळू माऊली ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या मराठी माझी मायबोली ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर माऊलीची गाथा, जगतगुरू तुकाई माऊली भाषाबोध सकल संतसद्गुरूंचा माऊली मराठीच माझी मायबोली शब्द मराठीच अस्मिता अंतरीची गीता, भागवत, दासबोधादी ग्रंथाली अक्षर अक्षर, साक्षात्कार स्वयंभू माऊली मराठीच माझी मायबोली माझ्या मराठीचा मला स्वाभिमान जगतवंद्य! ती जगतवंद्य मानिली प्राणांहूनही […]

कितीक तुझ्यात गुंतून गेले

कितीक तुझ्यात गुंतून गेले भावुक वेल्हाळ मी झाले, अशी कशी अवखळ झाले अलगद भान हरपून बसले काहूर उठता अंतर मनी प्रश्न पडतील वेगवेगळी, तू कितीक दूर दूर जाशी तितकी जखम खोल हृदयी रानावनात रान गाणी रमते अल्लड मग फुलराणी, निःशब्द भाव साऱ्या आठवणी न विसरली तुला अबोल अबोली मदमस्त वारा बेफाट होई तुझी आठवण कातर क्षणी, […]

सोड अबोला

नकोस बोलू, मीही सारे जाणतो न उरले, काहीच बोलण्यासारखे जाणतो मी, तुझ्या मौनी वेदनांना आज नां काहीच विसरण्यासारखे जे जे अव्यक्त! कसे व्यक्त करावे सांगनां! तूं काय सावरण्यासारखे जे, जे घडले, ते, ते हृदयस्थ सारे सत्य! कोणते व्यक्त करण्यासारखे तूच सांगनां, काय कसे घडले होते जगी जगलो साऱ्यांच्या मनासारखे आज हा असा विरही दुरावा भाळी यावीण […]

जन्माला आलो तर

जन्माला आलो तर मरणं ही ठरलेलं आहे, कुणाचं लवकर जाणं हे विधिलिखित आहे कोण कसं लवकर गेलं ही हळहळ व्यक्त होते, आयुष्य असेल थोडं तर नशीब ही रुसते लहान मोठं वय ह्याचा संबंध मग राहतं नाही, मरणदारी नौका जाणं सत्य मग टळत नाही किती करा टेस्ट आणि किती खा गोळ्या, हृदय बंद पडेल कधी न कळेल […]

पाऊलवाट

वाट चढणीची ही गडकोटी सदैव मी चालतची राहिलो उरली आता, चारच पाऊले आत्ता माथ्यावरती पोहचलो आव्हानी पथ्थर पाऊलवाट दुर्दम्य! विश्वासाने चाललो सभोवार सुखदा हिरवीगार गतस्मृतीं! आठवीत राहिलो वाहतो,शीतल पवन गंधला झुळझुळ ती झेलीत राहिलो लोचनी, माझे गावकुंस सुंदर जिथे पडलो, झडलो, घडलो सारीपाट, साऱ्याच जीवनाचा मीच, आज उलगडित राहिलो — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ५९ २६ […]

सांजवेळ

येनां, सखये या सांजवेळी तुजविण, एकाकीच जगलो गतस्मृती, ओघळता नयनी मनी, मी चिंबचिंब भिजलो स्मृतीगंध! तो शिशु शैशवी त्यात सदैव, सचैल नाहलो वास्तव! सारे शुष्क जीवन दुरावा, तुझा साहत राहिलो सत्य! तुही भोगलेस जीवन सारे फक्त आठवित राहिलो सांजाळलेल्या दशदिशातुनी आठवांना उसवित राहिलो तनमन, झाले हळवे कातर प्रीतासक्त मी तुझ्यात गुंतलो येनां, सखये या सांजवेळी तुजविण, […]

ही मुग्ध रात्र मिलनाची

ही मुग्ध रात्र मिलनाची नवं यौवना नवथर तू अशी, चंद्र दुधाळ तो आकाशी रात्र ही चांदण न्हाली तू ये प्रिये अशी जवळ जरा पदर उडे वाऱ्यावर सावर जरा, गौर लव्हाळ सोन तुझी कांती ओठ तुझे नाजूक गुलाब पाकळी स्पर्श होतो मधाळ तुझा मी धुंद होतो तुझ्यात जरा, घेता समीप मी तुजला प्रिये लाजते तू हलकेच तेव्हा […]

अनंतात नाम तुझे

अनंतात नाम तुझे तुझ्या चरणी माथा, कानडा विठ्ठल तू उभ्या पंढरीचा राजा धाव घेतो तू सत्वरी भोळा भाव भक्तीचा, नामदेवाची खातो खीर काय वर्णावा तुझा सोहळा जनीचे दळतो दळण सावत्या माळ्याचा पिकवी मळा, श्रीखंडया बनून पाणी भरले एकनाथांच्या घरा चंद्रभागेच्या तिरी जमला साऱ्या वैष्णवांचा मळा, तुझ्या नामात तल्लीन होतो भक्तांचा हा मेळा ज्ञानदेवांनी सुरु केली वारीचा […]

मनप्रतिबिंब

कविता! म्हणजे जगणेच असते मनाचेच बिलोरी प्रतिबिंब असते मनभावनांना, मुक्त व्यक्त करुनी जाणीवांना शब्दात माळणे असते अलवार, अंतरात झुळझुळणारी आत्मरंगी! निर्मल सरिता असते मांगल्यमयी, ओढ प्रीतसागराची भावशब्दी, पावन गंगोत्री असते अविस्मरणीय, आठवांचीच गाथा पाझरणारी तृप्त आत्मशांती असते मनामनांचे, हितगुज भावस्पर्शी शब्दभावनांचीच रिमझिम असते शब्द शब्द! वरदान ते भगवंताचे क्षणात, वेचुनी अर्पावयाचे असते शब्दा,शब्दात, भाव सत्यप्रीतीचे कवीतेत, […]

1 58 59 60 61 62 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..