नवीन लेखन...

माझे मन तुझे झाले !

माझे मन तुझे झाले नवनितावणी होते झाले ! बंध रेशमाचे त्यास मुलायम तंतूने विणलेले ! तुझ्या टपोऱ्या डोळ्यात मन माझे तुंतत जातं, वटारल्या डोळ्याने परत ते भानावर येतं ! माझ्या मनातील घालमेल तुझ्याही मनात होत होती! काय सांगावे किती सांगावे तुझ्या मुक्या संमतीने, मानाने सोडले मौन, बोलता तुझ्याशी एकरूप झाले केव्हा मन ! स्पर्शाने बऱ्याच गोष्टी […]

मन हिंदोळ्यावरी !

मन माझे हिंदोळ्यावरी बघते धरू आभाळ, विहरते किती उंच ठाऊक खितीज मृगजळ ! मना मनाच्या साखळ्या गुंतता गुंती गुंता, सोडविण्या त्या सगळ्या हैराण जीव पुरता ! मना मनाचे द्वैत भांडते आतल्या आत, भांड भांडूनिया भूस नकळे कशात अंत ! होण्या मन मोकळे फिरे गरगरा भोवर्यावाणी, पळे इकडून तिकडे, मग भटके रोनोमाळी ! मन गेले बुद्धीकडे विचाराव्या […]

आठवावे मृत्यूसी

निसर्गाची रचना, जन्म मृत्यृची योजना, गती देई जीवन चक्रांना,  ईश्वरी शक्ती  १ उत्पत्ती लय स्थिती, या त्रिगुणात्मिक शक्ती याच तत्वे निसर्ग चालती,  अविरत   २ ईश्वरी योजना महान, खेळ जीवनाचा चालवून घडवी शक्तीचे दर्शन, निसर्ग रूपाने   ३ वस्तूचे निरनिराळे आकार,  चेतना देवूनी करी साकार यास जीवन संबोधणार,  आपण सारे   ४ मातीची भांडी असती, विभिन्न रूपे मिळती वापरून […]

कावळा म्हणाला.. माणसाला..

माणूस म्हणाला.. कावळ्याला’.. एकदा माणूस म्हणाला.. कावळ्याला’.. कसे सांगायचे रे यांना, बाहेरचे खाऊ नका… पितृपक्ष चालू झाला, घरच्या शिवाय जेवू नका.. ‘कावळा म्हणाला.. माणसाला’.. ‘कावळा म्हणाला.. माणसाला’.. अरे हे बुद्धीमान मनुष्या.. पंधरवडाच फक्त आठवणीने, नैवद्य खिडकीवर असतो… ! बाकीचे ३५० दिवस मात्र आम्ही, उकिरड्यावरचं बसतो रे .. ! पुण्य मिळवायच्या आशेवर.. ठेवलास तू घास छतावर.. जिवंतपणीच […]

कोण ती स्फूर्ती देवता ?

मजला नव्हते ज्ञान कशाचे,  पद्यामधल्या काव्य रसाचे  । कोठून येते सारी शक्ती,  काव्य रचना करूनी जाती  ।। अवचितपणे विचार येतो,  भावनेशी सांगड घालीतो  । शब्दांचे बंधन पडूनी,  पद्यरूप जातो देऊनी  ।। सतत वाटते शंका मनी,  हे न माझे, परि येई कोठूनी  । असेल कुणी महान विभूती,  माझे कडूनी करवून घेती  ।। तळमळ आता एक लागली,  जाणून […]

शृंगार मराठीचा

शृंगार मराठीचा नववधू परी, अनुस्वाराचं कुंकू भाळावरी. प्रश्न चिन्हांचे डूल डुलती कानी, स्वल्पविरामाची नथ भर घाली. काना काना जोडून राणी हार केला, वेलांटीचा पदर शोभे तिला. मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल वेणीत माळता पडे भूल उद् गारवाचक छल्ला असे कमरेला अवतरणाची लट खुलवी मुखड्याला उकाराची पैंजण छुमछुम करी पूर्णविरामाची तीट गालावरी. — WhatsApp वरुन 

सुखाची १७ पाऊले

जाग येता पहिल्या प्रहरी हळुवार डोळे उघडावे… १ मग पाहून हातांकडे कुलदेवतेला स्मरावे… २ अंथरुणातून उठताक्षणी धरतीला नमावे… ३ ध्यानस्थ होऊ भगवंताला आठवावे… ४ सर्व आन्हिके झाल्यावर देवाचरणी बसावे… ५ काही न मागता त्यालाच सर्व अर्पावे… ६ घरांतून निघता बाहेर आई वडिलांना नमावे… ७ येतो असा निरोप घेऊन मगच घर सोडावे… ८ क्षणभर दाराबाहेर थांबून वास्तूला […]

देवाचिया दारीं

देवाचिया दारीं, मनाचा मुजरा, झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।   जाई जेव्हां मंदिरी, घेतां प्रभू दर्शन, आनंदानें नाचते, हर्षित चंचल मन, नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।१।।   नदीनाले धबधबा, उंच उंच वृक्ष वेली, कोकीळ गाती, मोर नाचे, इंद्रधनुष्याच्या खाली, रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  […]

काळ व कार्याची सांगड

  मानव जीवन तुम्हां लाभले,   महत् भाग्य ते समजावे कर्म दिधले पाठी तुमच्या,  सद्उपयोगी यांसी करावे….१, जीवन रेखा मर्यादेतच,   ठेवली असती तुमचे हातीं जाणीव त्याची मनीं असावी,  कर्म कार्ये जेव्हां करिती…२, हाती घेतल्या कार्यामध्ये,  एकचित्त तो प्रयत्न व्हावा काळ केवढा तुमचे जवळी,  याचा विचार सतत यावा…३, कार्ये राहता अपूर्ण अशी,  वेळ न उरे तुमचे हाती अभाव […]

सोड मागणी

मागत होता प्रभूला    हात जोडूनी कांही भक्तिभाव बघूनी त्याचे     मिळत ते जाई एका मागून एक मिळे    मागणी होता त्याची निराश करणे न लगे     इच्छा होता भक्ताची जे जे बघे भोवती       घेतले होते मागुनी कशांत दडले सुख     उमज येईना मनीं देरे बुद्धि देवा मजला    योग्य मागण्यासाठी समाधानी मी होईन      तुझ्या कृपे पोटी ज्ञान झाले गंमतीचे    सांगे सोड […]

1 289 290 291 292 293 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..