नवीन लेखन...

मतांची पोतडी सत्तेची गोधडी : खांदणी

आमचं नांव खंडेराव मते. आम्ही पक्षातले ‘चुनावी-महत्व’ असलेले नेते.      १   इलेक्शनचं ओझं आमच्या खांद्यावर होतं. त्यासाठी खूऽप खूऽप खपलो. विरोधकांचा खडक फोडायचा, मतांच्या खुरटल्या रोपट्याला पाच वर्षं खतपाणी घालायचं, मतं खांदायची, आपल्या पक्षाच्या बांधावर मांडायची, सांधायची, मनं जोपासायची, तण खुरपायचं, मतदारांना खिलवायचं-पिलवायचं, तन-मनानं, पण मुख्य म्हणजे धनानं मळा शिंपायचा, फळ येईल याची खात्री करायची, आपला […]

वाट

दाटे विचारांत ओसंडून सैरभैर व्याकुळलेली वाट वाटेवरी भग्न स्वप्ने उरी घेउनी जन्मली ही पहाट पहाटे अखेरीस सर कालचा दिस, रेंगाळला सुन्न घाट घाटावरी पाय ओढीत ही घट्ट धरली पुन्हा वहिवाट   धागे कसे जोडले हे असे सांधताना रुतोनी बसावे तिथे तिथे वाटते सर्व संपून जावे फिरोनी पुन्हा नेमके आठवे आठवांची ठेव गळकी जणु मनी मेघांचे काजळ […]

गझल

वृत्त :- मानसी लगावली :- गागालगा लगागा गालगा लगागा* आगीत पेटलेले गाव पाहिले मी चोरास साथ देण्या साव पाहिले मी ++++++++++++++++++ गावात श्वापदांची वाढली मुजोरी डोळ्यात पेटलेले भाव पाहिले मी +++++++++++++++++++ भूकेजला कसा आत्ताच गाव माझा धान्यास फेकणारे राव पाहिले मी ++++++++++++++++++ हास्यात आज होते दु:ख गोठलेले ह्रदयात लपवलेले घाव पाहिले मी +++++++++++++++++++ थाटात आज होते […]

भावना

गलेलठ्ठ झाले ठेकेदार उंदीर मारणारे अवकाळी फाशी चढत आहे शेतात राबणारे दिनरात राबतो घामात न्हाहतो शीवारात तो मिळवीत आहे नफा तक्क्यास टेकून लोळणारे कसे रे मिटावे कर्ज हे सातबाऱ्यावरचे आज सभागृहात कमी माझ्या हक्कांसाठी भांडणारे पुराव्याच्या फाईली सगळ्या कुरतडल्या उंदरांनी होतील मुक्त सारेच आता घोटाळे करणारे मिळावा अधिकार मलाही उंदीर हे मारण्याचा मारील आनंदाने चारदोन बाँम्ब […]

दोन क्षणिका : सुगंध

वासंतिक सुगंध वार्‍यासवे आला बंद दरवाज्या  समोर दम त्याने तोडला. एसीच्या वार्‍यात कृत्रिम सुगंध रोग केंसरचा असा पसरला. टीप: बंद दरवाजा, घरात एसी. मातीचा सुगंध असो किंवा फुलांचा सुगंध  घरात येऊ शकत नाही.  रासायनिक कृत्रिम सुगंध, केंसरला कारणी भूत आहे.

वातावरण आयुष्याचे

छान चाललंय सगळं आपलं, फक्त थोडंसं वातावरण तापलं, गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं, हळूच स्मृतींच गाठोड मापलं… इतभर सुख गोड मानलेलं, पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं, सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं, गुपीत तरी कोणी जाणलेलं? झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं , आयुष्य भूरर्कन निघून गेलं, रेसलींगच्या या वाटेवरती, नेहमी भेटलं सारख्यास वारखं… तूं तू – मी मी करता करता, नात्यांचा धागा झीजुन […]

नशा

“नशा” नशा नशिली तूझ्या प्रेमाची, अंग अंग सरसरली, शृंगारले मन हे माझे, जेव्हा तू घट्ट मिठी मारली ! मोहरुन सर्वांग आले, तूझ्या एका स्पर्शाने, ऊर दाटून आला, तूझ्या रोमांचित गंधाने ! दिवानी मी तुझीच प्रियकरा, पूर्णत्वाने वेडावलेस, बांध फुटला भावनांचा, कुशीत तुझ्या विसावले ! कवेत तू माझ्या अथांग, मी तुला घट्ट कवटाळले, ‘ मिलन ‘ पीयुष […]

मतदार

झालो मी अठरा वर्षांचा म्हणुन मिळे अधिकार नामी. मत देण्याचा. या दिवशी मी आहे राजा ताजा ताजा. उलथिन मी नेत्यांची तख्तें बदलिन मी नावांचे तक्ते. – तख़्त  – सिहासन — सुभाष स. नाईक

सत्कारणी वेळ

करू नकोस विचार त्याचा,  करणे नाही जेंव्हां तुजला मोलाचे हे जीवन असता,  व्यर्थ दवडशी वेळ कशाला….१ दोन घडीचे जीवन सारे,  क्षणा क्षणाने जाईल निघूनी कुणासाठी हा काळ थांबला,  उत्तर याचे घे तू शोधूनी….२ लहरी उठतील विचारांच्या,  आघात होता जेंव्हां मनी विवेक बुद्धीने शांत करावी,  भाव तरंगे त्याच क्षणी….३ मर्यादेचे आयुष्य असता,  वाहू नकोस विचार प्रवाही भगवंताचे […]

जगाचा निरोप

काळ येतां वृद्धपणाचा,  विरक्तींची येई भावना निरोप घेण्या जगताचा,  तयार करीत असे मना वेड्यापरी आकर्षण होते,  सर्व जगातील वस्तूंवरी नाशवंत त्या, माहित असूनी,  प्रेम करितो जीवन भरी जीवनांतील ढळत्या वेळीं,  जेव्हां वळूनी बघतो मागें मृगजळासाठीं धावत होतो,  जाणून घेण्या सुखाची अंगे प्रयत्न केले जरी बहूत,   हातीं न लागे काहीं पूर्ण कल्पना येई मनीं,   जगण्यात आंता तथ्य […]

1 270 271 272 273 274 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..