वाट

दाटे विचारांत ओसंडून सैरभैर व्याकुळलेली वाट

वाटेवरी भग्न स्वप्ने उरी घेउनी जन्मली ही पहाट

पहाटे अखेरीस सर कालचा दिस, रेंगाळला सुन्न घाट

घाटावरी पाय ओढीत ही घट्ट धरली पुन्हा वहिवाट

 

धागे कसे जोडले हे असे सांधताना रुतोनी बसावे तिथे

तिथे वाटते सर्व संपून जावे फिरोनी पुन्हा नेमके आठवे

आठवांची ठेव गळकी जणु मनी मेघांचे काजळ दाट

दाटले प्रेम सर्वत्र आहे चालती आंधळे ना ही वाट

 

मनोरंजनी गुंतलो असे कि कुठे जायचे भान उरले कुठे

कुठे घ्यायची भरारी पंख विखरून हाती नुसती पिसे

पिसे राहिले ना कशाचे तरी कशी पायात येते वहिवाट

वहिवाट प्रसवते बीज मर्मबंधात प्रेम, पाउलेच होती वाट

— सुहास तांबेमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…