नवीन लेखन...

विठ्ठल विठ्ठल

अवघ्या जगाचा संसार पेलून, विटेवरी उभा तू कमरेवर हात ठेवून, समाधान दिसे डोळ्यात, दिसे स्मित हास्य तूझ्या ओठी, काळा सावळा विठू तू माझा, कीर्ती अथांग तुझी मोठी…. – श्वेता संकपाळ.

भारतीय

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लीहलेल्या काही ओळी….. भारतीय ! (१५-०८-२०१८) नको हो माण, नको हो पैसा, नको तो वायफळ जातीवाद, कानी पडावी एकच गोष्ट, भारतीय असल्याची तीक्ष्ण साद…!! जो तो उठतो लढत बसतो, वैयक्तिक वाद कुठेच नसतो, सोडता ठिणगी राजकारण्यांनी, हल्लाबोल कसा अंगी सळसळतो?!! थोडातरी विचार करावा, समजून उमजून निर्णय घ्यावा, एकजात उरात आम्ही भारतीय, अंती भारत […]

प्रेमाचा चकवा

वय होतं ते अल्लड आणि मन होतं कोवळं चंचल स्वभाव तिचा पण ह्रुदय होतं सोवळं अगदी उगाच सहज ती बघुन हसली होती त्याच्या खोट्या शपथेला पूरती फसली होती निरागस तिला निर्मळ प्रेमाची तहान होती त्याची प्रेमाची भाषा अगदीच वेगळी होती त्याचा तो स्पर्श हीन हिस्त्र वाटला तिला तिच्यातल्या स्त्रीनं तत्पर तो ओळखला नाजूक एकांतात तिनं स्वतःला […]

मराठी गझल – तुझ्या-विना

तुझ्या विना सखे अता रिते रिते जगायचे तुझ्याच आठवात मी कसे किती झुरायचे मला नकोच वाटते जिणे असे उदास पण तुझा सुगंध भासतो म्हणून श्वास घ्यायचे दुखावल्या मनावरी हळूच फुंकरीन मी सुखावतील वेदना असे मला लिहायचे नभात माळल्यास तू असंख्य तारका जरी तयांस दाखवायला मलाच रात्र व्हायचे तुलाच शोधतात ही अधीर तीव्र स्पंदने तुला लिहीत गात […]

गझल – नको वागणे आज झाडाप्रमाणे

*गझल* *वृत्त :- भुजंगप्रयात* *लगावली :* लगागा लगागा लगागा लगागा नको वागणे आज झाडाप्रमाणे तया लोटते जग कवाडाप्रमाणे धनाचेच लोभी ,महाराज काही किती वागती ते ,लबाडाप्रमाणे सगेसोयरे फार लाडावले तू तरी वार त्यांचेच भ्याडाप्रमाणे तुझे दु:ख आहे, जरी फार मोठे नको वागवू ते , बिऱ्हाडाप्रमाणे कशाला कुणाशी ,अबोला धरावा नसे जिंदगी जर, पहाडाप्रमाणे तुला कर्ण कोणी, […]

गझल – प्रार्थना ही तिला भावली शेवटी

गझल वृत्त :- स्त्रग्विनी *लगावली* :- गालगा गालगा गालगा गालगा प्रार्थना ही तिला,भावली शेवटी साथ देण्यास ती,धावली शेवटी पोसली मी जिला रक्त पाजून ती; नागिणी सारखी,चावली शेवटी शोधली मी दया गावखेड्यात पण माझिया अंतरी , घावली शेवटी कोण येणार अंती बरे सोबती साथ येणार ती,सावली शेवटी सोडली साथ मी,काल तीची जरी हाक देताक्षणी पावली शेवटी © […]

अंगठी बोटातली फेकून गेला

*गझल* *वृत्त :- व्योमगंगा* *लगावली* :- गालगागा गालगागा गालगागा गालगागा अंगठी बोटातली तो,अंगणी फेकून गेला साक्षगंधाची समाधी,अंगणी बांधून गेला आवडीची ना मिळाली,कार त्याच्या ती म्हणोनी; स्वप्न जे मी पाहिले ते ,अंगणी गाडून गेला ” प्रेम माझे फार आहे “, भेटला तेव्हा म्हणाला मात्र आता सोबतीला,तू नको सांगून गेला दु:ख माझे वाहणारा,भेटला आता मलाही स्पर्धकाला त्याचिया तो,चोरुनी […]

फक्त एका दिवसासाठी : Independence day

मित्रांनो, स्वातंत्र्य दिनानिमित्त “फक्त एका दिवसासाठी” हि कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका. “माझी डायरी ” या आपल्या youtube चॅनलला अवश्य Subscribe करा. “माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.

शुभेच्छा बाळाला…

जीवनात सदैव तू पुढे बघून चालशील अडखळलेल्या खड्ड्यांची   जाणीव ठेवुन वागशील कर्तव्यापासून तू कधी दूर नको पळू तुटलेल्या त्या स्वप्नांसाठी आसु नको ढाळू सर्व काही मनासारखे होइल अशी अपेक्षा नको धरूस पण तुझ्या आवडी निवडींना कधी नकोस पुरूस संसार हि तारेवरची कसरत नंतर तुला कळेल इतकी ही तडजोड नको करूस कि मन तुझं जळेल माहित आहे […]

आठवणीतील प्रेम

गंध तव केसांचा आजही तसाच येत आहे जरी डोकावतीय रुपेरी छटा त्यात कधीतरी मस्ती आपल्या प्रेमाची आजही तशीच आहे । चाल आपुली जराशी झालीय मंद जरी ऊमेद चालण्याची ती आजही टिकून आहे गजरा केसात माळण्याची हौसही तशीच आहे । फेसाळणारा सागर किनारा आजही तोच आहे सागराच्या लाटांचा आवाज अजूनही तोच आहे प्रेमलाटेतील आवेश तुझा आजही तसाच […]

1 269 270 271 272 273 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..