नवीन लेखन...

प्रतारणा

वाटते पाहू नयेच स्वप्न ना ते भंगण्याची भिती करु नये प्रेम कुणावर ना प्रेमभंगाची ही भिती । घेऊनी स्वप्ने ऊराशी तव जीवनी मी आले स्वप्न ते सत्य करण्या रात्रंदीन मी एक केले । वाटले तुझ्या समवेत नाही कठीण काही जगात मिळता साथ तुझी मजला काय आहे कठीण जगात । परी फसगत अशी जाहली मम स्वप्ने ती […]

मनाच्या नदीने वाहतच रहावं

मनाच्या नदीने कसं वाहतच रहावं झाले गेले सारे ते विसरून जावं वाटेवरच्या वळणावर थोड्यावेळ थांबावं अपरिचित काही मनांना प्रेमानं जोडावं मनाच्या काठावर कधी शांत बसावं चिंता विवंचनांना अलगद पाण्यात सोडावं येणाऱ्या साऱ्या प्रवाहांना आपल्या पोटात घ्यावं जिवलगांच्या दूःखांना कसं प्रेमाने सहावं मनाच्या नदीने कसं वाहतच रहावं मनाच्या नदीने कसं संयमाने वहावं संतापाच्या परिणामांना शांत प्रेमानं भरावं […]

अहो सुरांच्या गुरुराया

(गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर यांच्या एका कवितेचा स्वैर भावानुवाद ) अहो सुरांच्या गुरुराया, द्या मला तुम्ही दीक्षा ।। बनुन सुरांचा दीन भिकारी, गुरुराया, आलो मी दारीं सरितेच्या लाटांना तुम्ही शिकवलेत जें गान स्वरलहरींचें कोकिळास जें दिलेत तुम्ही ज्ञान त्या ज्ञानाची घाला माझ्या झोळीमधिं भिक्षा ।। द्या मला तुम्ही दीक्षा ।। पसरवीन मी तुमचे सूर जगीं अशान्ती करीन […]

गुरुला नसते जात

गुरुला नसते ज़ात गुरुला नसतो धर्म गुरु, फक्त जाणतो ज्ञानदानाचें मर्म ।। – – – सुभाष स. नाईक.

जुळे

दोघे मिळून आलां               हातात घेऊन हात हाताळूनी परिस्थितीला      करण्या त्यावर मात   दोघांची मिळूनी शक्ति         दुप्पट होत असे सहभागी होतां, युक्ति           यशाची खात्री दिसे   एकाच तेजाची तुम्ही बाळे        बरोबरीने आलां जगती रवि-किरण होऊन जुळे                 प्रकाशमान बनती   ओळखुनी जीवन धोके            यशाच्या मार्गांत गाडीची बनूनी चाके              सतत रहा वेगांत   एकाचे पाठी जाता दुसरा      यश अल्पची […]

ध्यान स्थिती

जेव्हां मजला कळत होते,  निद्रेत आहे मी जागृत स्थिती असूनी मनाची,  शरीर होते निकामीं  ।।१।। निद्रेमधल्या स्थितीत जाता,  जाग न राही तेथे जागेपण आणि निद्रा दोन्हीं,  एकत्र न येते  ।।२।। निद्रावस्था नि जागेपणा,  याहून दुजे कोणते ? ध्यान स्थिति ही आगळी असूनी,  मध्य बिंदू साधते  ।।३।। देह मनाला विश्रांती देई,  ध्यान अवस्था ही ध्यानामधली ऊर्जा सारी, […]

भावनेच्या आहारीं ।

नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी   ।।धृ।।   प्राणीमात्राच्या जगती   श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी   यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी   ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी   प्राण्यास असे भावना   साथ नसे विचारांची विचार आणि भावना    साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी   ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी   बरे वाईट यांची जाण   घ्यावीस तूं ओळखूनी राहूं […]

प्राण्याचे मोल समजा

खरेदी केला सुंदर पक्षी,   दाम देवूनी योग्य असे ते नक्षीदार तो पिंजरा घेवूनी,   शोभिवान मी केले घरातें…१, प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं पक्षानें त्या मान टाकली,  पडला होता तळात मरूनी…२, क्षणभर मनी ती खंत वाटली,   राग आला तो स्वकृत्याचा अकारण ती हौस म्हणूनी,   खरेदी केला पक्षी याचा…३, किती बरे ते निच मन हे?    निराशा […]

थोर गुरुजन

भाग्य असे अती थोर अमुचे असे गुरुजन आम्हा लाभले जन्म जन्मीचे सार्थक की हो या एकाच जन्मी जाहले । दिले विविध ग्रंथातील ज्ञान भाषा इतिहास भुगोल शिकविला विविध कला शास्त्रे शिकविता गणीत जिवनाचे समजाविले । पारंपारीक शिक्षण देऊनी शिक्षीत आम्हाला बनविले आदर्श स्वतःच्या आचरणाने सुसंस्कृत आम्हांला घडविले । करीतो नमन त्या थोर गुरुजना ज्यांनी स्वातंत्र्यवीर बहू […]

क्षमस्व

‘आम्ही क्षमस्व आहो’ , मोबाइल बडबडताहे ‘तुम्ही क्षमस्व आहां , मग मीही क्षमस्व आहे’. ‘क्षमस्व’ म्हणजे काय , कुणां हें नक्की ठाउक नाहीं करतां वापर हास्यास्पद , तिरकस प्रतिसादा मीही ! ‘चूकच नाहीं’, अन् ‘सोऽ व्हॉऽट्’हि, भलता चढला पारा क्षमस्व ; खून करुन भाषेचा, खुशाल माथीं मारा. – क्षमस्व : (संस्कृत) : क्षमा कर ( अशी […]

1 260 261 262 263 264 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..