नवीन लेखन...

बंद खिडकी

चालताना त्या रस्त्यावर आज का अडखळली मम पाऊले तोच रस्ता मीही तोच परी का सर्व अनोळखी भासले । त्याच रस्त्यावरील तेच घर परी आज अपरिचित वाटले बंद खिडकी ती पाहून घराची मम नयनी अश्रु का दाटले । अजूनही वाटते कधीतरी ऊघडेल ती खिडकी कुणीतरी पुन्हा तो ओळखीचा चेहरा पाहील वाकून त्या खिडकीतूनी । सुरेश काळे मो.9860307752 […]

पक्षी भाषा

बराच काळ चिवचिव करीत एक दिसे चिमणीं काय बरे तिज लागत असावे विचार आला मनी…१, तगमग आणि उत्सुक दृष्टीने बघे चोंहिकडे परि लक्ष वेधी ती हालचालींनीं आपल्याकडे….२, शिकवतेस कां ? तूझी चिवचिव भाषा मजला मदत करिन मी शक्तीयुक्तीने दु:ख सारण्याला…३, बघूनी मजकडे चिमणी ओरडे मोठ्या रागानें समर्थ आहे मी माझ्या परि ती नको मदत घेणे…४, मानवप्राणी तूं एक […]

हिशोबातील शिल्लक

हिशोबाची वही घेवूनी बसलो,  हिशोब करण्यासाठीं जमाखार्च तो करित होतो,  जीवनाच्या सरत्या काठीं घोड दौड ती चालूं असतां,   सुख दु:खानी भरले क्षण प्रसंग कांहीं असेही गेले,  सदैव त्याची राही आठवण कष्ट करूनी जे कमविले, थोडे धन या देहाकरिता उपयोग नव्हता त्याचा कांहीं,  जग सोडूनी देह जाता कधी काळचा निवांतपणा,  घालविला होता प्रभू सेवेत पुण्य राहिले शिल्लकीमध्ये, […]

सर्व वेळ प्रभूसाठी

लक्ष आपले जात असते, सदैव प्रभूकडे मार्ग सारे ठरलेले, जे मिळती तिकडे….१, ‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो, प्रथम मुखातून जन्मताच तो प्रश्न विचारी,  “मी आहे कोण?”….२ मार्ग हा तर सुख दु:खाने,  भरला आहे सारा राग लोभ मोह अंहकार,   याचा येथे पसारा…३, वाटचाल करिता यातून,  कठीण होवून जाते जीवन सारे अपूरे पडून,  अपूर्ण ज्ञान मिळते….४ आयुष्य […]

आई माझी रूसली…

गोष्टी ऐकायला कोणी नाही म्हणुन आई माझी रूसली माझ्याकडे पाहून तेंव्हा अगदी उदास कोरडं हसली. नंतर माहित नाही कसे तिने हात पाय गाळले खचली ती अन् तिने कायमचे अंथरुण धरले. जणु तिची जगण्याची ईच्छाच होती मेली मरणाकडे डोळे लावून वाट पहात राहिली. एका रात्री बाबा येऊन माझ्या अगदी जवळ बसले अस्वस्थ मला बघून त्यांचे डोळे दूःखाने […]

दिलासा

ज्योतिष्याची चढूनी पायरी,   जन्म कुंडली दाखवी त्याला  । अडले घोडे नशिबाचे,   कोणते अनिष्ट ग्रह राशीला  ।।१।।   नशिबाची चौकट जाणूनी,    आशा त्याची द्विगुणित झाली  । मनांत येतां खात्रीं यशाची,   जीव तोडूनी प्रयत्ने केली  ।।२।।   प्रयत्नांती असतो ईश्वर,    म्हणूनी मिळाले यश त्याला  । आत्मविश्वास जागृत करण्या,   ‘भविष्य’ शब्द  कामी आला  ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

उपकार

उपकार करुन त्याने   मन माझे जिंकिले परि वेळ गेला निघूनी   आभार ना मानले   ।१। केली नाही परतफेड   उपकाराची मी कामाचे होते वेड   सतत मग्न कामी   ।२। कामाच्या मार्गांत   चालता पाऊल वाट प्रयत्न करुन कार्यांत   यश साधले अर्धवट    ।३। खंत वाटली मनां   आठवोनी उपकार पश्चाताप सांगु कुणा   उशीर झाला फार    ।४।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   […]

जीवनाची उपयोगिता

दहा पंधरा तीं वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची मना वाटते आगळे करावे,  उरली वर्षे जी जीवनाची….१, वृधत्वाचा काळ गांजता,  साथ न देयी शरिर कुणाला, मना मारूनी बसावे लागे,  ईश्वरी नाम घेत सर्वाला….२, निसर्गरम्य स्थळ निवडूनी,  मर्यादेत जगावे जीवन दुजास कांहीं येईल देता   हेच ठरवावे आजमावून…३, बरेच केले स्वत:साठीं,  समाधान परि नाहीं लाभले दुजास मिळतां आनंद येई,  खरे […]

चंद्रडाग

हे शशिधरा तूं प्रेमळ सखा    साऱ्या विश्वाचा सौंदर्याचे प्रतिक असूनी    राजा तूं नभाचा   लागूं नये तूज दुष्ट म्हणूनी    काजळ लावी तुला काही वेडे त्यास समजती    तू डागाळला   डाग कसला तुम्ही मानतां    प्रेमामध्ये तो दोन मनांतील पवित्र नाते   हे आम्हीं विसरतो   समजूं शकतो नीती बंधन    समाज रचनेचे बळजबरीच्या कृत्यास तुम्ही    म्हणावे पापाचे   गुरू […]

आमचे ध्येय व दिशा

कोठे चाललो आम्ही,  जसे वाहती वारे, दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे   ।।१।। धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा, कोठे चाललास? विचारतां  हासत राहतो बावळा   ।।२।। नाही कुणा ध्येय  निश्चित असे एक, परिस्थितीच्या ओघांत, वाहत चाललो अनेक ।।३।। जीवन कशासाठीं कळले नाही कुणां जन्मलो म्हणून जगावे  हेच वाटते सर्वांना ।।४।। तशातच तरले कांहीं  उध्दरुन ही गेले […]

1 258 259 260 261 262 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..