सर्व वेळ प्रभूसाठी

लक्ष आपले जात असते, सदैव प्रभूकडे

मार्ग सारे ठरलेले, जे मिळती तिकडे….१,

‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो, प्रथम मुखातून

जन्मताच तो प्रश्न विचारी,  “मी आहे कोण?”….२

मार्ग हा तर सुख दु:खाने,  भरला आहे सारा

राग लोभ मोह अंहकार,   याचा येथे पसारा…३,

वाटचाल करिता यातून,  कठीण होवून जाते

जीवन सारे अपूरे पडून,  अपूर्ण ज्ञान मिळते….४

आयुष्य तुमचे थोडे असूनी,  काळ वेळीच जाणावा

मिळेल जो क्षण तुमचे हातीं,  प्रभूसाठी तो असावा….५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1601 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…