नवीन लेखन...

मातृभूमीच्या सर्व शहीद सुपुत्रांना विनम्र श्रद्धांजली व समर्पितही

झालो आम्ही *धन्य, मातृभूमीच्या कुशीत विसावलो, वीर मरणाचे स्वप्न पाहिले, अन् भाग्यवंतही ठरलो, देशासाठी लढणे एकच ध्यास, बालपणापासून आमची आंस, येतील कितीही संकटे,अडथळे प्यारी आम्हा भारतमाता, तिच्यापुढे खूप आव्हाने” ठाऊक हरेक वार्ता, तिलाजिवापाडजपणे सैनिकाचे असते ध्येय, कोणी काही म्हणो, ना कदर ना काळजी , नको फक्त श्रेय, जीवन तिलाच अर्पण, दुसरे नको काही, पुढील जन्मी होऊ […]

जीवन गुंता

दोन रिळाचे दोन धागे,  एकत्र ते आले एकमेकांत दोन्हीही,  गुंफून परि गेले….१, गुंता झाला होता सारा,  निर्मित नात्याचा शक्य होईल कसे आता,  वेगळे होण्याचा….२, खेच बसता वाढत गेला,  होता गुंता उकलून सुटणे शक्य नव्हते,  त्याला आता…..३, दोनच पर्याय होते,  त्याचे पुढती तुटणे वा एकत्र राहणे,   ह्या जगती….४, वेगळे होतील दोन धागे,  तुटून जाणारे अवशेष राहतील परि […]

गावातील  आईचे मागणे 

कळावे  लोभ असावा ,पत्र  मी केले पुरे कळेल ना खरोखरी , पत्ता कुठचा लिहावा  बरे ? सगळेच गुंग मोबाइलवरी ..मेसेज आणि कॉलवर मी अडाणी  अजून चिपकून ..जुन्याच पत्र चिट्ठीवर शब्द लेकराचे जपून ठेवले ….वाचते,हात लावते पुन्हा पुन्हा घड्या  करुनी  सांभाळते ….त्यात माझा दिसे कान्हा स्पर्श अक्षरांचा  जणू लेकराला थोपटते  मी झोपतो बाळ आन स्वप्न पाहत झोपते मी केवढा होता सहारा  पत्राचा …छान वेळ वाट बघण्यातही आता तर  विसरलाच पत्ता घराचा ..गावचा  पोस्टमनही मोबाईलवर थरथर  म्हणुनी  बोलणेही होतेच कट खरे तर नातसुनांना ..वाटते माझी का कटकट खोटेपणा, फसवेगिरी ..दिसतेच या  यंत्रात मला खास वेळ काढून लिही रे  लेकरा एक पत्र  मला / — श्रीकांत पेटकर

वेड !

सोबत तु असताना, तुझ्यात अथांग रमावं वाटतं…! हात हातात गुंतवूनी, बाहुत निजावं वाटतं…! नजरेस नजर मिळवताच , ओल्या पापण्यांत भिजावं वाटतं…! अबोल प्रीत खुलताना, घट्ट मिठीत शिरावं वाटतं…! बेधुंद बेभान होवूनी , कुशीत तुझ्या विरावं वाटतं…! वेड लावले तुझे मला तू, वेडं म्हणवुन जगण्यात गोड वाटतं …! — श्र्वेता संकपाळ (०६-०३-२०१९)

बुझगावणं

माणसाला वाटत राहतं पाखरं त्यांना घाबरतात म्हणून पिकात बुझगावणं उभारतात अाळशी माणसाच्या सवयी त्यांना माहीत होतात बुझगावण्याच्या अंगाखांद्यावर पाखरं मस्त खेळत राहतात. छानपैकी दोस्ती करतात…. — श्रीकांत पेटकर 

देह नश्वर

अंतर्मनात शोधण्या तुजला मन कधीचे आतुर डोकवावे आत खोलवर बाहेर पाहावे खूप दूरवर ठसवावे तुजला आतवर तुझ्यात मी, माझ्यात तू सर्वव्यापक एक तू तू तो ईश्वर तरीही मी एक ..देह नश्वर.. — अरुण वि. देशपांडे पुणे.

पुर्णविराम

एक वाक्य लिहिलं की पुर्णविराम देतो. दुसरं तिसरं वाक्य लिहून झालं की पुन्हा पूर्णविराम. अजून काही वाक्ये लिहत राहतो. पुर्णविराम देत देत. सगळं लिखाण संपतं पुर्णविरामानं. तरीही काही आठवलं की ताजाकलम म्हणून अजून वाढवत राहतो लिखाण. पुर्णविराम देवुन पुन्हा. या अपुर्णविरामांना दुसरं नाव शोधतोय मी. मधल्या सगळ्या पुर्णविरामाच्या टिंबाला वेगळं अन शेवटच्या खरोखरच्या पुर्णविरामाच्या चिन्हाचा आकारच […]

एकदा कवेत घे

एकदा कवेत घे, संपवून सारा अबोला, जीव तुझ्यासाठी राजा, बघ, कसानुसा झाला,–!!! स्पर्श तुझा होता सखयां, सर्व दु:खे नमून जातील, अडचणींचे डोंगर सारे, क्षणार्धात ते वितळतील, बाहूंत तुझ्या वेड्या जिवां, कधी मिळेल रे आसरां,–!!!! ओढ वाटे सारखीच, छळते मज रात्रंदिवसा, तू येतां, जवळी परंतू, मिठीत घेते आभाळां,–!!! प्रितीच्या रंगी रंगता, तुझ्याच रंगात रंगते, होऊन वेडिपिशी कशी, […]

एक आरजू- प्रभुकी खोज

मनमे एक आरजू थी   के प्रभु मिल जायेगा दिलकी धडकन कहती   के उसे अपनेमेंही पायेगा आंख सबतरफ ढूंडती है    हर एक कण में फिरभी दृष्टी असमर्थ हैं     उसे पहचाननेमें ध्वनी की लहरे    हर तरफ गुंज उठती कानोंके सहारे     आवाज उसकी ना सुनी जाती महक उठती हवा     खुशबूदार गंधोंसे पहचाने उसे कहां     बगीचेके फूलोंसे बीती कितनी जींदगीयां     […]

कधी असेही घडावे

कधी असेही घडावे, सुखाला परिमाण नसावे, भरभरून ओंजळीत त्यांस, घेऊन छान मिरवावे,–!!! कधी असेही घडावे, आपुले सगळे आपुलेच राहावे, परकेपणा सोडून देत, जिवां-शिवांचे नाते जपावे,–!!! ‌कधी असेही घडावे, सुंदरतेला सुगंध यावे, त्यांना एकदा कडेखांदी, दिमाखात घेऊन हिंडावे,–!!! कधी असेही घडावे, अपेक्षांचे ओझे नसावे, मुक्त स्वैर आनंदाने, खुशीचे विशाल पंख ल्यावे,–!!! कधी असेही घडावे, ताण-तणावांना निरोप द्यावे, […]

1 225 226 227 228 229 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..