नवीन लेखन...

मी महिलादिन साजरा केला

सकाळी रोजच्या प्रमाणे अाँफीसची तयारी केली पत्नीने चहा केला, डबा केला रोजप्रमाणे मी  ओफिसला ती घरी मुलींचा अभ्यास बघितला, शाळेसाठी तयारी केली परत अाणायला घाई केली रोजप्रमाणे मी घरी आलो तिने पाणी दिलं चहा केला रोजप्रमाणे महिलादिनानिमीत्त सोसायटीत कार्यक्रम आहे म्हणाली माझ्यासाठी जेवण तयार करुन ठेवलं ……….नंतरच ती गेली कार्यक्रमाला मी तिला शुभेच्छा दिल्या रोजसारखीच आजही […]

विश्व पसारा

विश्वामध्ये वावरतां भोंवती विश्व पसारा रमतो गमतो खेळतो जीवन घालवी सारा, संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित प्रत्येक ती निर्माण करी आपलेच विश्व त्यांत जीव निर्जीव विखूरल्या वस्तू अनेक आगळ्या त्या परि ठरे एकाचीच  घटक, विश्वामध्येच विश्व असते राहून बघे विश्वांत समरस होता त्याच विश्वाशी प्रभूमय सारे होत डॉ. भगवान नागापूरकर 9004079850 bknagapurkar@gmail.com

रात्र बहरली चंद्रप्रकाशे

रात्र बहरली चंद्रप्रकाशे, पाण्यावर तरंगती रजतकण, फांदी फांदी झुकुनी त्यावरी, धरते सावली रक्षण्या कणकण,-! अंधार प्रकाशी खेळे कसा, चंद्रमा ढगां–ढगांत विराजे, पानापानातून रजत नक्षी, सृष्टीवर रुपेरी‌ प्रकाश पसरे, कधी लपे सुधांशू हा, या मेघातून त्या मेघात, वातावरण जिवा वेड लावे, जादूच फैलावे प्रेमीयुगलांत,-! दूरवरीचे डोंगर बघती, संथ शांत पाणी कसे, कधी काळे कधी पांढरे, कधी म्हणावे […]

पायांचे बिल

मी  थोडा  चाललो तर  पायानी  बिल  दिले  लगेच फुटाप्रमाणे  दर  लावून आता मी  हाताला आधीच  विचारतो कविता  लिहु  का  म्हणून ? — श्रीकांत पेटकर कौशल 

नाहीं विसरलो देवा ।

नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो संसारात अडकलो, वेळ ना मिळाला   ।।१।। तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत   ।।२।। तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले   ।।३।। तुझ्याच साठीं, गुंतविले मन बनोनी सोंगटी, फिरे पटावरी   ।।४।। काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं   ।।५।। डॉ. […]

चाळीशीच्या उंबऱ्यावर

चाळीशीच्या उंबऱ्यावर, पुन्हा नवथर होऊ थोडे, जग सारे विसरुन आपण, एकरुपतेची पाहू स्वप्ने, तुझ्यात मी अन् माझ्यात तूही, विरघळून जाऊ रे असे, दुग्धशर्करा होऊनी जीवन, पुन्हा एकदा जगू तसे, तू माझी छाया आणि मी तुझी अशी सावली, छायेने सावली व्यापते, सावलीच छायेच्या हृदयी,–!!! हिमगौरी कर्वे

खरी पूजा

गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती  । श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती  ।१। भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी  । शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई  ।२। प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती  । विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती  ।३। भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर  । पवित्रता भासे तेथे, बघता […]

निळ्याशार समुद्री

निळ्याशार समुद्री, चालली कुठे नाव, पुढे पुढे जाई अगदी, घेत जीवनाचा ठांव, -!!! जीवन आहे पसरलेले, असीम आणखी अथांग, निसर्गाची ,जादू सगळी, फेडावे कसे त्याचे पांग,-!!!! नाव चालली संथ अगदी, खाली पारदर्शी पाणी, सूर्यराजे उगवलेले वरती, निळ्या निळ्या नभांगणी, सोनेरी किरण त्यांचे, अंबरात मुक्त विहरती, पाण्याची सफर करायला, चटाचटा उतरून येती, सोनेरी रंगाची नक्षी, पाण्यावर रेखाटत, […]

मुक्तीसाठीं

रुजला पाहीजे    विचार मनांत सारेच प्रभुचे    असे ह्या जगांत जो वरी आहे मी   माझे येथे असे त्या क्षणापर्यंत  स्वार्थ मनीं वसे स्वार्थयुक्त मन   मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत   पुनर्जन्म असे बिंबता मनांत   माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता   आत्मा मुक्त होई डॉ. भगवान नागापूरकर 9004079850 bknagapurkar@gmail.com  

ऊन पडले कोवळे

ऊन पडले कोवळे, धरणीवर तरंगत आले, प्रकाशाचे खेळ सारे, किरण हवे तसे रमले,–!!! आकाशाचा गोल घुमट, कसा तापून गेला, किमया कशी तेजाची, धरतीवर जमली पसरट,–!!! दुपारचे ऊन,मध्यान्हाचे, उष्ण उष्ण निखार, मित्रराज” तळपता उभा, रोपट्यांना फुटले धुमार,–!!! वाढत गेला किरणांचा गरिमा, झाडे सारी शोषती प्रकाश, जीवन कसे तरारले, हा निसर्गाचाच महिमा,–!!! वाढे दुपारचे ऊन, हळूहळू कलंडू लागे, […]

1 223 224 225 226 227 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..