नवीन लेखन...

सरोवरी पाहिले मी

सरोवरी पाहिले मी, तुला अल्लद उतरताना, राजहंसी होऊन डुंबताना, देखणी जशी मासोळी, पाण्यात विहरताना, सुळकन् मारे उड्या, वरखाली हालताना, चपळ तुझ्या हालचाली , पाण्याचा वाटे हेवा, ठिकठिकाणी स्पर्श त्याला, रुबाब त्याचा पहावा, तुझी कमनीय तनू , जशी असावी हरणी, आनंदाने जणू हिंडते, इकडून तिकडे वनी, टपोरे मोठे डोळे,— पाणीदार काळे काळे, अगदी सरल नासिका, केशसंभार मोठे, […]

असे जगावे, तसे जगावे

असे जगावे, तसे जगावे, मला वाटते मुक्त जगावे, कधीही कुठले बंधन नसावे, ताणतणाव चिंता समस्या, अगदी त्यांना कोळून प्यावे,–!!! जीव टाकत स्वच्छंदाने, मुक्त विहरत मस्त रहावे, फुलपाखरू होऊन सगळे, जीवनाचे मर्म लुटावे,–!!! कधी कस्तुरी व्हावे वाटे, सुगंध फैलावण्या सारे, वाऱ्याने त्याचेच गान गावे, घेऊन जग तृप्त व्हावे,–!!! कधी वाटते डोंगरदरीत, हरणउड्या मारत हिंडावे, स्वैर आपुले आभाळचआपण, […]

फुलझाडाचे स्वातंत्र

उगवले होते जंगलात ते उंच माळावरी रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी || जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी || वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें || वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा || कुणीतरी आला वाटसरु तो […]

विठूमाऊली

चंद्रभागेतीरी भक्तीचा मळा, झाले वारकरी गोळा, आंसुसले सारे विठ्ठल दर्शना, एवढीच ना मनोकामना, विठूमाऊली, घरदार सोडून इथवर येता पावसापाण्यां न जुमानता, तुम्हा कारणे देह झिजवतां, पतितपावन झालो आता, रखुमाई,–!!! तुम्ही आमुचे आई- बाप, जगाचेच आहात साऱ्या, विनंती एवढी विठुराया, लेकरांवर करी कृपा, झडकरी,–!!! घेऊन आलो भक्ती, दुःख, आणखी व्यथा, अडकलो संसारा जाणा हो,पंढरीनाथा, लवकरी,–!!! नको आम्हा […]

  नियतीची चाकोरी

अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार  । कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार  ।। खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी  । वादळ वारा ऋतू बदले,  चूक न होई त्यांत जराशी  ।। घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत  । हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत  ।। प्रत्येक कालक्रमणाच्या आखून,  दिल्या मर्यादा  । ठेवी […]

चाफा आणि मोगरा

चाफा आणि मोगरा गंधर्व कुठले हे, धरातलावर येऊन, सर्वांस मोहवती खरे, शापित म्हणू त्यांना तर सुगंधाच्या राशी, जो तो कुरवाळे त्यांना, घेऊन थेट हृदयाशी, –!!! हिमगौरी कर्वे ©

असाच पाऊस झिम्माड

असाच पाऊस झिम्माड वाहते रस्ते गळकी झाडं पक्षी घरट्यात माणसं बिऱ्हाडात सगळं शांत निवांत … अंतरात.. आसमंतात तू म्हणालास… एक आठवण जगावी कोसळणाऱ्या पावसाची चिमटीत धरून सोडावी तशीच बोट कागदाची हातावर थेंब झेलत गोल गोल राणी म्हणावं तसंच लहान होऊन गोधडी गुरफटून झोपावं पाऊस तुझ्या मनात पाऊस माझ्या डोळ्यात झरत होता झरझर उलगडत अंतर अचानक तू […]

मुंगी

मग्न राही सतत   आपल्याच कामीं अन्नासाठी तूं    फिरे दाही दिशानी जमवितेस कणकण    एकत्र करुनी दूर द्दष्टीचा स्वभाव    दिला तुज कुणी सुंदर तुझी वास्तूकला   वारुळ केले छान सहस्त्रांच्या संखे     राहतेस आनंदानं कष्ट करण्याचा गुण    दाखवी साऱ्याना कष्टाला पर्याय      नसे ह्या जीवना डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

तुझे माझे नाते

तुझे माझे नाते, दुःखाचे दुःखाचे,— पोळलेल्या जिवांचे, व्यथित अशा हृदयांचे,–!!! तुझे माझे नाते, एकाच अखंड बंधाचे, अगदी जन्मोजन्मीच्या, गोड ऋणानुबंधाचे, विचरशी तू सहचरे, पण वेगळेच हे धागे, काळजाच्या विणींचे समसुखाचे, समदु:खाचे,–!!! ओघळलेल्या अश्रूंचे, आत लपलेल्या समुद्राचे, खोलवरच्या भोवऱ्याचे, उसळणाऱ्या लाटांचे, तुझे माझे नाते, दुःखाचे दुःखाचे,—!!! कधी भरतीओहोटीचे, दोघातल्या ओढीचे, वाचणाऱ्याला बुडवणारे, बुडणार्‍याला वाचवणारे, पाण्याशी जीवनाचे, निष्ठूर […]

अनाहता, अनादि-अनंता

अनाहता, अनादि-अनंता, वाहिले तुज मी चित्ता , व्हावी तुझी मजवरी कृपा, हीच उरी आंस बाळगतां,–!!! शरण तुज आले रे दयाघना, तनमन मस्तक नमवितां, तुजकारणी देह पडावा, आठवते तुज कृपाकरा,–!!! तुज पायी वाहिल्या मी, अनेक अरे वेदना, काय सांगावे दुःख, किती भोगाव्या यातना,–!!! शरीर, मानस झिजवतां, नच मिळे सुख पण वंचना जावे कुठे सांगावे कोणा, देव मानती […]

1 193 194 195 196 197 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..