नियतीची चाकोरी

अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार  ।
कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार  ।।

खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी  ।
वादळ वारा ऋतू बदले,  चूक न होई त्यांत जराशी  ।।

घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत  ।
हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत  ।।

प्रत्येक कालक्रमणाच्या आखून,  दिल्या मर्यादा  ।
ठेवी अडकवून त्यामध्ये, सर्वाना नियती सदा  ।।

जरी भासे नवीन कुणा,  नाविन्य सारे त्याचेसाठी  ।
बघत नाही जूनेपण तो,  येई नंतर त्याचे पाठी  ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1528 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…