नवीन लेखन...

अथांग ज्ञानाचा सागर (गीत)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अथांग ज्ञानाचा सागर।। अविरत कष्ट करूनी ठरती दलित तारणहार ।।धृ।। घेउनी अतीउच्च शिक्षण,झाले तुम्ही विद्याविभुषित।। भारतरत्न पुरस्कार मिळे हो आपणा मरणोत्तर।। आपणास भुषविले पहा ना संविधानाचे शिल्पकार।। अविरत कष्ट करूनी ,ठरती दलित तारणहार।।१।। भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री हे बोधिसत्व।। मुकनायक,प्रबुद्ध भारत यातून ज्वलंत अस्तित्व।। दलितांप्रती आपुल्या मनी माया ममता अपरंपार।। अविरत कष्ट करूनी,ठरती दलित […]

निसर्गाचा चमत्कार

सोळा वर्षांचा ज्ञानोबा महाकवी झाला गीतेंवरी टिपणी लिहून मुकुटमनी ठरला गजाननाचा आशिर्वाद लाभला त्याला ज्ञानेश्वरीचा प्रवाह हातून वाहूं लागला अष्टावक्र दिसे विचित्र परि महागीता रचिलि अकरा वर्षाच्या मुलानें मान उंचावली विटी दांडू खेळत असतां काव्य करुं लागला शारदा होती जिव्हेवरती ज्ञान सांगू लागला निसर्गाची रीत न्यारी चमत्कार तो करितो भव्य दिव्यता दाखवूनी आस्तित्व त्याचे भासवितो डॉ. […]

हवेत हा गारवा

वाढता हवेत हा गारवा बाजारी चिंच,बोरे,आवळा ऊस नी हिरवा हरबरा खाण्या हा जीव होई बावळा सांजवात होताच शेकोटी पेटवू उब मिळविण्यास फड रंगे गप्पांचा भोवती चहा रिचवावा हाच ध्यास पहाटे चला जाऊ शेतात भरित मेजवानी जोमात जोडीला हुरडा असावाच हवेत हा गारवा झोकात — सौ. माणिक (रुबी)

मला जगायचंय तुझ्यासाठी

गेलास ना परदेशी लेकरा भेट आता आपली होईल का? दिर्घ आजाराने देह पिडीत या त्रास मला रे सोसवेल का? जिव गुंतला माझा तुमच्यात आशा जागते इथे काळजात या झडकरी तुम्ही भारतात हितगुज साधुया आपसात तुझ्या वडीलांनी गाठली साठी लहान बहिण आहे रे पाठी जीव तळमळतो भेटीसाठी मला जगायचंय तुझ्यासाठी — सौ. माणिक (रुबी)

सर्व जीवांना जगूं द्या

जाळी जळमटे वाढूं लागली, घरा भोवती  । किडे नि मुंग्या झुरळे,  यांची रेलचेल होती  ।। चिवचिव करीत चिमण्या,  येती तेथे  । काड्या-कचरा आणूनी,  घरटी बांधत होते  ।। झाडून  घेई हळूवारपणे, तो कचरा  । भिंती आणि माळ्यावरी ठेवी,  तसाच पसारा  ।। स्वातंत्र्याची मुभा होती,  झुडपांना तेथे  । स्वच्छंदानें अंगणी वाढती,  सर्व दिशांनी ते  ।। जगणे आणि जगू […]

सुखी रहा तू लाडके

सुखी रहा तू लाडके,दिल्या घरी मोद हा मनी दाटला,जा सासरी।।धृ।। कन्यारत्न जन्मताच,आनंदलो वाढवले ना लाडात,धन्य झालो बालक्रीडा सुखविती,हो संस्कारी मोद हा मनी दाटला,जा सासरी।।१।। आला हो राजकुमार,नेण्या परी नववधू दिसे कशी,ही गोजिरी माय तुझी मालत्यांनी,ओटी भरी मोद हा मनी दाटला,जा सासरी।।२।। येता दाटुनी कंठ हा,काय करू पाठवणी करतो,कसा सावरू जा निवांत तू,वळू नको माघारी मोद हा […]

क्रौंच पक्षाला मुजरा

कारूण्यामधूनी उगम पावला   आद्य काव्याचा झरा वदन करितो क्रौंच पक्षा तुज घे,  मानाचा मुजरा….१, गमविले नाही व्यर्थ प्राण ते,  व्याध बाणा पोटीं टिळा लावला काव्यश्वरीने,  मानाने तुझ्या ललाटी…२, हृदयस्पर्शी जी घटना घडली,  तडफड तव होता कंठ दाटूनी शब्द उमटले,  पद्य रूप घेता….३, उगम पावता काव्य गंगा ही,  वाहू लागली भूलोकी वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा, तुका,  अशांचे आली […]

मन माझे बावरे

आई अंबाबाई तू दर्शनाला ये गं तुझ्या भक्तित लिन मी मन माझे बावरे गं सातपुडा डोंगर रांगा तिथेच तुझी वस्ती गं थकला हा जीव माझा दर्शना मी कशी येऊ गं नवस मला फेडायचा जोगवा मला मागायचा गोंधळ तिथे घालायचा जागर मला करायचा मन माझे बावरे गं चुकलं का ,ही भिती गं आशिर्वच घेण्या तुझे मनोमनी आतुर […]

चारोळी – भाकरी साठी वणवण

भाकरी साठी वणवण फिरलो दाही दिशा चंद्र -तारे चमकती डोळ्यासमोर अशी झाली माझी दशा — सौ. माणिक दिलीप शूरजोशी 

1 172 173 174 175 176 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..