नवीन लेखन...

जीवन आनंद

ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे,  ध्येय कोणते खरे  । उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे  ।। संतसाधू आणि ज्ञानीजन,  बहूत ते झाले  । समाधानी परि एक मताचे,  उत्तर नाही दिले  ।। खेळखेळणे उड्या मारणे,  अन् खाणे पिणे  । बालपणीच्या आनंदाला,  नव्हते काही उणे  ।। विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो  । यौवनाच्या उंबरठ्यावरी,  बहरून […]

 विजेचे दुःख

चमकत लपकत आली कडकडाट करुनी गेली प्रकाशमान केले जगासी सारुनी दूर अंधारासी भयाण होता अंधःकार लख्ख प्रकाश देई आधार घेई सर्वांच्या मनाचा ठाव भिती असूनही, प्रसन्न भाव करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन निर्माण झाला मनी अभिमान परि दुःखी होते तीचे मन ‘क्षणिक’  लाभले तिला जीवन डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

 वातावरण

विचारांची उठती वादळे  । अशांत होते चित्त सदा  ।। आवर घालण्या चंचल मना  । अपयशी झालो अनेकदां  ।।   विषण्णतेच्या स्थितीमध्यें  । नदीकांठच्या किनारीं गेलो  ।। वटवृक्षाचे छायेखाली  । चौरस आसनावरी बसलो  ।।   डोळे मिटूनी शांत बसतां  । अवचित घटना  घडली  ।। विचारांतले दुःख जाऊनी  । आनंदी भावना येऊं लागली  ।।   एक साधूजन ध्यान […]

धन्य ती महाराष्ट्र माऊली !

ती महाराष्ट्र माऊली अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली     //धृ//   ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली    //१// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली   तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली     //२// […]

 गर्भातील अभिमन्यू

श्रीकृष्ण सांगतो सुभद्रेला, चक्रव्युंहामधली रचना, हुंकार मिळे त्याला, सुभद्रा झोपली असताना ।।१।।   गर्भामधले तेजस्वी बाळ, ऐकत होते सारे काही, जाण आली त्याची कृष्णाला, वळूनी जेव्हा तो पाही ।।२।।   चक्रव्यूहांत शिरावे कसे, हेच कळले अभिमन्यूला, अपूरे ज्ञान मिळोनी, घात तयाचा झाला ।।३।।   गर्भामधला जीव देखील, जागृत केंव्हां होवू शकतो, खरा ज्ञानी तोच असूनी, सुप्तावस्थेत […]

वेळेची किमया

वेळ येता उकल होते,   साऱ्या प्रश्नांची  । जाणून घ्या तुम्ही,  रीत निसर्गाची…१, जेंव्हां यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी  ।। वेळ नसे योग्य आली,  हेच घ्यावे जाणूनी…२, प्रयत्न सारे चालूं ठेवतां,  यश ना मिळे  । कांहीं काळासाठी थांबवा,  प्रयत्न सगळे…३, काळ लोटतां प्रयत्न होती,  पुनरपि सारे  । उकल होऊन गुंत्यांची,  आख्खे निघती दोरे…४, कुणी म्हणती ग्रह अनूकुल, […]

सूर्योदय

प्रभात झाली रवी उगवला दाही दिशा उजळल्या रात्रीचा अंधार जावूनी नवीन आशा अंकूरल्या   १   बरसत आहे सूर्यकिरणे पृथ्वीच्या भूतली आनंदाने पुलकित होवून धरणीमाता शहारली   २   निघूनी गेला रात्रीचा गारवा त्याच्या आगमानाने उल्हासीत होवून प्राणी जीवन नाचत राही ऊबेने   ३   पुनरपि आता झाले सुरु चक्र जीवनाचे मिळवू आज काही तरी किरण चमकती आशेचे    ४ […]

 पक्षी – मुलातले प्रेम

स्वैर मनानें भरारी घेई,  पक्षी दिसला आकाशीं  । स्वछंदामध्यें विसरला ,  काय चालते पृथ्वीशीं  ।१। एक शिकारी नेम धरूनी,  वेध घेई पक्षाचा  । छेदूनी त्याचा एक पंख,  मार्ग रोखी उडण्याचा  ।२। जायबंदी होवूनी पडला,  जमीनीवरी  । त्वरीत उचलून पक्षाचे,  पाय बांधे शिकारी  ।३। ओढ लागली त्यास घराची,  भेटन्या मुलाला  । आजारी असूनी पुत्र त्याचा,  चिडचिडा तो […]

 भावनांची घरें

घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी   ।।धृ।। वास्तुकला सुंदर   रंग त्याचे बहारदार आकर्षक वाटणार  परी निवड करा जपुनी, घ्याहो निरखूनी   ।।१।। ही घरे भावनांची    त्यांत छटा विचारांची भर पडतां श्रद्धेची    जीवन जाईल तसेंच होऊनी, घ्याहो  निरखूनी   ।।२।। राग लोभ अहंकार   मद मत्सर हे विकार ह्यांची ती घरे असणार   शोधा विचार करुनी, घ्याहो निरखूनी    ।।३।। दया क्षमा शांति   […]

पोस्ट…

पोस्ट… काल मातृदिन झाला पोस्टचा पाऊस पडला बहुतेक फाँरवर्ड केलेल्या काही कविता नव्याने लिहीलेल्या काही जुन्याच नव्याने डकवलेल्या पोस्टखाली इमोजीही तेच ते अंगठे, नमस्कार, गुलदस्ते… आज त्याने मोबाईल उघडला तर पोस्ट आईचीच होती पण… चार दिवस चालत शहरातून गावात थकून घरी आलेल्या आपल्या एकुलत्याच मुलाला कोरोनाच्या भयाने घरात न घेणाऱ्या आईची… पोस्टखाली थोडे इमोजी होते काही […]

1 136 137 138 139 140 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..