नवीन लेखन...

कृष्ण बाललीला

चकित झाले गोकूळवासी बघून बाललीला सांगा कोण आहे तरी कृष्ण ? विचारी यशोदेला   ।।१।। प्रासादातील मोदक खातां तोंड ते उघडले मुखामध्ये मोदक नसूनी ब्रह्मांड ते दिसले   ।।२।। उच्छाद मांडूनी कालीयाने पाणी केले दुषित मर्दन करण्यासाठीं त्याचे उडी टाकी डोहात   ।।३।। पूतना असूनी राक्षसिण स्तनांत होते विष स्तनपान करुनी त्यानें तीला केले कासाविस   ।।४।। खोड्या बघूनी यशोदेनें […]

जन्म स्वभाव

गोड शब्द बोबडे, लकब मनास आवडे  । शब्दांची भासली जाण,  नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान   ।। १ भावनांचा उगम दिसला,  मनी व्यक्त होई हालचालीतूनी  । रागलोभ अहंकारादी गुण,  दिसून येती जन्मापासून  ।। २ देश-वेष वा जात कुठली,  सर्व गुणांची बिजे दिसली  । हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी  ।। ३ प्रसंग घडता अवचित ,  बाह्य […]

स्मरण असू दे

हे जगदंबे !  सदैव होते नाम मुखी गे लोप पावले आज कसे ते तू मज सांगे…..१ लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी….२ काही हवेसे वाटू लागले एके दिवशी विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी….३ आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती….४ तगमग करूनी तेच मिळविता आज […]

पुनर्जन्म

संघर्षाची बिजें जळतील,  जाणतां तत्व पुनर्जन्माचे  । आपसांमधील हेवे-दावे,  मिटून जातील कायमचे  ।। १ फिरत असते चक्र भोवती,  स्वार्थीपणाचे भाव आणिते  । त्यांनाच मिळावे सारे काही,  जाणता स्वरक्ताचे नाते  ।।२ उगम झाला जाती धर्माचा,  स्वार्थीपणाच्या याच कल्पनी  । वाटीत सुटतो प्रेम तयांना,  केवळ सारे आपले समजूनी  ।।३ कन्या जेव्हां सासरीं जाते,  नाती-गोती नवीन बनती  । वाटत […]

असुरक्षित जीवन

आज कुणाच काय भरवसा रडते जीवन ढसाढसा    // धृ //   प्रेम दिसेना जगांत कोठे ह्रदया मधले सरले साठे ओढ कुणाची कुणा न वाटे ओरड करुनी कंठ न दाटे सुकुनी गेला घसा रडते जीवन ढसाढसा  – – – १   बाप ना भाऊ इथे कुणाचा लोप पावला कढ रक्ताचा मायमाउली सहज विसरते काळ तिचा तो नऊ मासाचा फुटला नात्याचा आरसा रडते जीवन ढसाढसा – – – 2   सुरक्षतेचे कवच दिसेना शब्दावरी विश्वास बसेना दुर्मिळ झाली त्याग भावना कदर कुणाची कुणी करेना इथे लागतो केवळ पैसा रडते जीवन ढसाढसा – – – ३   डॉ. भगवान नागापूरकर […]

विश्रांती

धावपळीचे जीवन सारे, मिळे न कुणा थोडी उसंत विश्रांतीच्या मागे जाता, दिसून येतो त्यातील अंत ।।१।।   चैतन्यमयी जीवन असूनी, चक्रापरी ते गतीत राही चक्र थांबता क्षणभर देखील, मृत्यूची ते चाहूल पाही ।।२।।   थांबत नसते कधीही जीवन, अंत ना होई केंव्हां त्याचा निद्रा असो वा चीर निद्रा, विश्रांती ही भास मनीचा ।।३।।   थकून जाई […]

खेळण्या नसे पर्याय

दु:खाचे तूं देवूनी चटके,   सत्वपरिक्षा ही बघतोस प्रतिकूल ती स्थिती करूनी,  झगडत आम्हां ठेवतोस खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा खेळातूनि अंग काढतां,  जगण्याच्या मिटतील खुणा…२, खेळगडी तो असूनी तुम्हीं,  मैदानासम विश्व भासते तन्मयतेनें खेळत असतां,  खचितच यश तुम्हा येते…३, विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा बसू नका हतबल होवूनी,  गमवाल त्या […]

तो पुन्हा आलाय

तो पुन्हा आलाय पण तो गडबडलाय आणि गोंधळलाय थोडासा हिरमुसलाय त्याच्या स्वागताची तयारी नाही उत्साह तर कुठेच दिसत नाही उत्सवी वातावरण नाही कसलीच लगबग नाही नेहमी कशी जय्यत तयारी असते स्वागताची सर्वांनाच प्रतिक्षा असते त्याच्या आगमनाची महिला वर्गाला पर्वणीच नटण्यामुरडण्याची बालगोपाळांना मोदक पटकावण्याची कलात्मक आरासी केल्या जातात पानाफुलांनी मखरं सजवली जातात घराघरांतून पूजा अर्चा केल्या जातात […]

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३ झाकण उघडा,  दुःख दिसे आंत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

मी एकटी, मी एकाकी

अरे, एव्हाना ती यायला हवी होती ! अजून कशी उगवली नाही ती गवताची पाती ! ती आल्यावर प्रार्थनेचे सुर उमटतात. आसमंत उजळून निघतो, लता वेली डोलू लागतात. सुरू होते पूजा अर्चना आणि सरस्वतीची आराधना. मध्येच पोटात कावळ्यांचा कलकलाट. खाऊ झालाच समजा सफाचाट. कधी कधी ऐकू येतो गलका. माझ्या कानांना मस्त बसतो दणका. थोड्या वेळाने परतायची वेळ […]

1 115 116 117 118 119 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..