नवीन लेखन...

नियतीचा फटका

(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)   एक भयानक रात्र अशी,  सहस्त्रावधींचा घेई बळी  । नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी  ।। १ मध्यरात्र  होवून गेली, वातावरण  शांत होते  । गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते  ।। २ तोच अचानक विषारी वायू,  पसरला त्या वातावरणी  । हालचालींना वाव न देता, […]

विष्ठा

विष्ठा बघूनी थुंकलो, घाण वाटली मजला, अमंगल संबोधूनी, लाखोली देई तिजला  ।।१।।   संतापूनी मजवर , कान उघडणी केली, तुझ्याचमुळें मूर्खा मी, अमंगळ ती ठरली।।२।।   आकर्षक रूप माझे, लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी, केले सारे तूंच फस्त ।।३।।   परि मिळतां तुझा तो, अमंगळ सहवास, रूप माझे पालटूनी, मिळे हा नरकवास ।।४।।   डॉ. भगवान […]

रडणे

रडणे या साठी सुद्धा आवश्यक होते कारण प्रत्येक वेळी मी शस्त्र उचलू शकत नव्हतो, रडणे या साठी सुद्धा आवश्यक होते कारण प्रत्येक वेळी क्रांति होणार नव्हती, **** रडणे ऐकले की मन निश्चिन्त झाले प्रसव वेदनेने थकलेल्या शरीरात, रडणे ऐकले की चूल सारवताना बाळणअंतीच्या छातीतून दूध पाझरले ****** रडणे असते साक्षी संयोग-वियोग जीवन-मरण मान-अपमान दुःख-सुख ग्लानि-पश्चाताप करुणा-क्षमा […]

अर्पण

मी माझे सर्वस्व तुला अर्पण करून तुमचा निरोप घेईल मुलांनो, मी माझी विनम्रता गिळंकृत केली आहे मी माझी बनावट संपत्ती तुमच्या नांवे वारस ठेऊन जात आहे मी महाज्ञानी आहे मी नेहमीच गांभीर्य पांघरून फिरतो मला प्रत्येक भेटणारा माणूस मूर्ख वाटतो मी ही मुर्खता तुला स्वाधीन करून जात आहे मी तुला माझे भरजरी वस्त्र, माझे भाषा वैभव […]

काय मिळाले असते ?

स्त्रीच्या भावनेचा सिटी स्कॅन केला तर अपमानाच्या असंख्य घटनांचा धोकादायक साकाळलेला डोह मिळाला असता, निराशेच्या गंभीर जखमेतील वाहती वेदना दिसली असती, अगतिक बैचेनीची आकडेवारी लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसली असती ताटातुटीच्या भयाने वाढलेली गती अनेक रात्र जागलेल्या आसवांनी बेफाण पुरात वाहाताना, कंठात रुतलेले उत्तर दिसले असते सकारण हारलेले वादविवाद दयनीय अवस्थेत मिळाले असते उपेक्षेच्या डंखाचे निशान त्या […]

मातीमध्ये हात घालतो त्याला कळते (गझल)

मातीमध्ये हात घालतो त्याला कळते मातीची सल केवळ शेतकऱ्याला कळते प्रेमामध्ये पडतो अन् जो जळून जातो प्रीत खरी त्या वातीच्या धाग्याला कळते जगणाऱ्याला अशीतशी ती कोठे कळते ? जगण्याची किंमत तर मरणाऱ्याला कळते मोठा नाही घाव गड्या बघणारा म्हणतो किती टोचते हे त्या लढणाऱ्याला कळते दिशा एकही राहत नाही हातामध्ये तेव्हा कोठे वादळ नावाड्याला कळते ©®_ […]

पावन हो तू आई

पावन हो तू आई तव चरण शरण येई   ।।धृ।। संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई   ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही   ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी तव रुप […]

दयेची दिशा

निसर्ग नियमें दया प्रभूची,  सदैव बरसत असते  । दयेचा तो सागर असता,  कमतरता ही पडत नसते  ।। १ अज्ञानी ठरतो आम्हींच सारे,  झेलून घेण्या तीच दया  । लक्ष्य आमचे विचलित होते,  बघून भोवती फसवी माया  ।। २ उपडे धरता पात्र अंगणीं,  कसे जमवाल वर्षा जल  । प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी,   निघून जाईल वेळ  ।। ३ भरेल […]

पूर्णेच्या परिसरांत !

जेंव्हा ठरले गावी जाणे       हूर हूर होती  मनी बराच काळ गेला होता      आयुष्यातील निघुनी काय तेथे असेल आता          सारे गेले बदलूनी काळाच्या प्रवाहामध्ये        राहिलं कसे टिकूनी चकित झालो बघुनी         सारे जेथल्या तेथे उणीवता न जाणली      क्षणभर देखील मानते बालपणातील सवंगडी     जमली अवती भवती गतकाळातील आनंदी क्षण    पुनरपि उजळती आंबे चिंचा पाडीत होतो        झाडावरती चढुनी आज मिळाला तोच आनंद    झाडा खालती बसूनी मळ्यामधली मजा लुटली      नाचूनी गाऊनी विहिरीमधल्या पाण्यात      मनसोक्त ते डुबूनी ऐकल्या होत्या कथा परींच्या     तन्मयतेने बसूनी आज सांगे त्याच कथा मी     काका मुलांचे बनुनी वाडा सांगे इतिहास सारा    पूर्वज जगले कसे भव्य खिंडारी उमटले होते    कर्तृत्वाचे ठसे बापू, आबा, मामा, काका,     मामी वाहिनी जमती कमी न पडली तसूभरही       प्रेमामधली नाती […]

अवमूल्यन

उत्साहाने करित होता,  सारे कांहीं इतरांसाठी क्षीण होवूनी जाता शरीर,  आधार तयाला झाली काठी…१, धनाचा तो प्रवाह वाहतां,  गंगाजळीचे पाणी पाजले दुजाकरिता त्याग करूनी,  समाधानी ते इतरा केले….२, धन संपत्तीचे झरे आटतां,  प्रेमळपणाचे शब्द राहीले कालक्रमणाच्या ओघामधल्या,  दुर्बलतेस कुणी न जाणले…३, अपेक्षा ती सदैव असते,  मिळत रहावा सहयोग अवमूल्यन ते केले जाते,  दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग…४ […]

1 114 115 116 117 118 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..