माझं आजोळ लालबागचं. सुरुवातीची मुंबई कोकणातून उतरली ती भाऊच्या धक्क्यावर आणि मुंबैची नंतरची पिढी जन्मली ती परळच्या वाडीयात. माझा जन्मही वाडीयाचाच. पुढं जे काही लालबाग आणि लालबागेतल्या सणांचं वर्णन केलंय, ते माझ्या लहानपणी आई-मामाचं बोट धरून फिरताना मला त्यावेळी जे दिसलं आणि त्या वयात मला त्याचं जे आकलन झालं, तसंच लिहायचा प्रयत्न केलाय. आता हे सारं लिहीताना मी त्याच सात-आठ वर्षाच्या वयात आहे असं समजून लिहीलंय. […]
इंदिरा गांधी यांनी २५ जून रोजी देशात आणीबाणी लागू केली त्या घटनेला ४२ वर्षे होत आहेत. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ हा आणीबाणीचा २१ महिन्यांचा कालखंड तमोयुग म्हणून ओळखला जातो. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी निवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्यात इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून […]
मराठी माणसाच्या मराठी मुंबईत अस्सल मराठी पदार्थ किती हॉटेल्समध्ये मिळतात? खरंतर हा एक संशोधनाचाच विषय आहे. मराठी आणि महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ मिळणारी मराठी मालकीची हॉटेल्स किती आहेत? हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच…… […]
मुंबईतलं गिरगाव म्हणजे समुद्राच्या विरूद्ध बाजूला चर्नीरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतरचा परिसर. हा भाग तसा फोर्ट विभागापासून दूर म्हणजे अगदी सुरूवातीस पाहता इंग्रजांच्या दृष्टीने तसा गावाच्या बाहेरचा किंवा वेशीवरचा भाग. इथे इंग्रजांचं लक्ष दुरूनच असे. गिरगावचा परिसर हा वेगवेगळ्या वाड्यांनी बनलेला आहे. कांदेवाडी (खाडिलकर मार्ग), केळेवाडी (डॉ. भालेराव मार्ग), फणसवाडी, गायवाडी, खोताची वाडी, झावबाची वाडी वगैरे वाड्यांचा पुंजका मिळून गिरगाव बनलेलं आहे. […]
सेहचाळीस वर्षापूर्वी १२ मार्च १९७१ रोजी आनंद हा चित्रपट मुंबईत रिलीज झाला. एक संवादच संपूर्ण चित्रपटच आपल्यासमोर उभा करतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’. बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं… हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब […]
३ मार्च १९७२ हा दिवस…. बॉम्बे टू गोवा या चित्रपटाला चित्रपटगृहात लागून ४५ वर्षे पूर्ण झाली. एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं […]
आज साठीच्या जवळपासच्या मुंबईकरांना ट्रामचा प्रवास नक्कीच आठवत असेल. मुंबईत घोड्यांची पहिली ट्राम ९ मे १८७४ रोजी आली. तीन आण्यात कुलाबा ते पायधुणी आणि अर्ध्या आण्यात पायधुणी ते बोरीबंदर असा प्रवास करता येत असे. १८९९ सालच्या प्रारंभी ट्रामने एका आण्यात मुंबईत कुठेही जाता येत असे. सहा ते ८ घोड्यांनी ओढली जाणारी ही ट्राम एका तासात सुमारे […]
(डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला १८ जानेवारी २०१७ ला पस्तीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो. त्याची अपरिहार्यता, त्या काळातल्या घडामोडी, त्यावेळचं वातावरण आणि सरकारची भूमिका यांचा वेध घेत ते दिवस पुन्हा जागवणारा जयंत पवार यांचा लेख.) […]