मुंबईतील बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांना स्वतःचा असा इतिहास आहे.. मुंबईवर राज्य केलेल्या (आताच्या नाही, पूर्वीच्या) राज्यकर्त्यांप्रमाणेच मुंबईतील काही रस्त्यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यात अहं भूमिका बजावलेली आहे..या रस्त्यांच्या निर्मितीची एक स्वतंत्र कथा आहे तश्याच याच्या शेजारी असलेल्या वास्तुंच्याही कथा-कहाण्या आहेत.. आपल्याला व्यवसाय-धंद्यानिमित्त अनेक ठिकाणी फिरावं लागत..आपण ज्या रस्त्यावरून रोज ये-जा करतो त्या रस्त्याचे ऐतिहासिक महत्व […]
प्राचीन काळापासून मानव शहर वसवत आलाय..बरीशी जागा, आजूबाजूला पाण्याची सोय बघायची आणि वसती करायची हा पुरातन परिपाठ आहे..प्राचीन हरप्पा किंवा मोहोन्जादारो शहर असतील किंवा अगदी आता-आता पर्यंत वसलेली शहर असोत, अगदी याच पद्धतीने त्यांची निर्मिती झाली आहे..या सर्व शहरात आणि मुंबई शहरात एक जमीन अस्मानाचा फरक आहे आणि तो म्हणजे मुंबईला वसण्यासाठी तिची, स्वतःची अशी जमीनच […]
हा पत्ता रोज या ठिकाणाहून जा-ये करणार्यालाही लक्षात येणार नाही. पण ‘ र्हिदम हाऊस’ म्हटलं की चटकन, ‘च्यायला हा ऱ्हिदम हाऊसचा पत्ताय होय’ असे उद्गार ऐकू येतील..! […]
एक काळ होता की हिची भारीच ऐट असायची. भलेभले हिला ‘एंगेज’ करायचा जीवापाड प्रयत्न करायचे..हिच्या मागे धावत सुटायचे आणि ही मात्र त्यांना वाकुल्या दाखवत म्हणजे ‘हमको नय आना’ म्हणत आपल्याच तोऱ्यात फणकऱ्याने निघूनही जायची..असतात बाबा असतात एकेकाचे दिवस..हा हा म्हणता काळ बदलला. हीच्या तरुण, देखण्या, शिडशिडीत बांध्याच्या ‘कूल’ बहीणी रस्त्यावर अवतरल्या आणि मुंबईकर नादावले..आता वय गेलेल्या […]
‘हलवलेल्या व हरवलेल्या पुतळ्यां’च्या तिसर्या भागात ‘लॉर्ड कॉर्नवॉलीस’ या भारताच्या तत्कालीन गव्हर्नर जनरलच्या पुतळ्याची माहिती आहे..हा ‘पुतळा’ त्याच्या नांवा-ठिकाणासकट लोकांच्या विस्मृतीत गेला आहे.. तरी या पुतळ्यांने जी धमाल त्या काळी उडवली होती त्यातून हिन्दू समाजाच्या मानसिकतेचं चांगलंच दर्शन होतं.. त्याची माहिती मी पुढच्या चौथ्या व शेवटच्या भागात देणार आहे. आपल्या एशियाटीक सोसायटीच्या समोर असलेलं ‘हॉर्निमन सर्कल’ […]
मुंबईच्या इतिहासासंबंधीत किंवा इतरही जुनी पुस्तकं वाचताना फोर्ट मधील ‘एस्प्लनेड मैदान’ हा शब्द बर्याच वेळा भेटायचा.. फोर्टमधील एस्प्लनेड मैदान म्हणजे नक्की कोणतं, हा माझा गोंधळ नेहेमी व्हायचा..पुढे मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात आलं, की ‘एस्प्लनेड मैदान’ म्हणजे कोणतंही एक मैदान नसून कुलाबा-नरिमन पॉईंटच्या फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या कुपरेज मैदानापासून ते सीएसटी-मेट्रो नजीकच्या आझाद मैदान-क्रॉस मैदानापर्यंतचा पसरलेला सपाट […]
मुंबईची हार्बर रेल्वे लाईन पश्चिम व मध्य रेल्वेवर राहणाऱ्या मुंबईच्या पांढरपेशा समाजाच्या दृष्टिनं काहीशी दुर्लक्षितच..या हार्बर लाईन मुळे आपल्याला दाना-पाण्याची रसद मिळत असते याची जाणीव फार थोड्या मुंबईकरांना असते. अशा या हार्बर रेल्वे लाईनवरचं ‘कॉटन ग्रीन’ हे एक सर्वसाधारण रेल्वे स्टेशन. या स्टेशनात काही खास आहे याची जाणीव न होणारं..अशा या ‘कॉटन ग्रीन रेलवे स्टेशन’ या […]
मुंबईत अजुनही तग धरून असलेल्या ब्रिटीशकालीन ‘माईलस्टोन्स’ची माहिती माझ्या वाचनात आली आणि त्यांचा शोध घेण्यास मी सुरुवात केली. माईलस्टोन्सचा माग काढता काढता अचानक ‘मुंबईच्या किल्ल्या’बद्दल वाचनात आलं आणि मी थेट प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहोचलो. दरम्यान माईलस्टोन्स मागे पाडले. आता मला माझ्या वाचनातून सापडलेल्या व मी पाहिलेल्या त्यापैकी काही माईलस्टोन्स बद्दल माहिती इथे देत आहे. मुंबईत असे एकूण […]
आज बारा जुलै : पानशेत धरण फुटीच्या आधीचे अर्थात बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ पूर्वीचे पुणे ! पुणे येथील पानशेत धरण फुटलेल्या घटनेला आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली ! बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ, त्यादिवशी दिव्याची आवस होती ! एवढा काळ लोटला, तरीही माझ्यासारख्या जुन्या पुणेकरांच्या मनात पानशेत धरणफुटीच्या त्या भयानक आठवणी अजुनीही विस्मुतीमध्ये […]