नवीन लेखन...

जुन्या आठवणींना उजाळा देणारे लेखन

काळाआड गेलेली लाकडाची खेळणी…!

महाराष्ट्रात कोकण जसा खाद्यपदार्थांसाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच लाकडी खेळणी निर्मितीसाठीही आहे. कोकणातील सावंतवाडी आणि रायगड जिल्ह्यातील पेण येथे ही लाकडी खेळणी तयार केली जातात. सावंतवाडी या शहरात लाकडी वस्तू खूप चांगल्या आणि वाजवी दरात मिळतात. पालकांनी लाकडी खेळण्यांना प्राधान्य दिल्यास देशात मुख्यत्वे महाराष्ट्रात तरी नवीन झाडे लावली जातील आणि पर्यावरणाचा तोल सांभाळा जाईल अशी आशा आहे. […]

पळसाच्या पानाची पत्रावळ आता विस्मरणातच….

राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्‍यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न-मुंज-पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती. जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली. त्यानंतरच्या काळात पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. शहरांमधल्या जेवणावळींतून `आग्रह’ हा प्रकार हद्दपार झाला. आता तर आमंत्रणातच `स्वेच्छाभोजनाची […]

सर परशुरामभाऊ महाविद्यालय (S P College) – १०० वर्षांचा इतिहास

पुण्यातल्या प्रत्येकच रस्त्याला त्याची स्वतंत्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशी ओळख आहे. त्यातलाच एक रस्ता म्हणजे टिळक रस्ता. टिळक चौक आणि स्वारगेट यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूल, साहित्य परिषद, टिळक स्मारक, अभिनव कला महाविद्यालय, हिराबाग चौक, या वास्तूंच्या बरोबरीने एक वास्तू दिमाखदारपणे उभी असलेली दिसते ती म्हणजे सर परशुरामभाऊ महाविद्यालय. बाहेरून जाणारे काहीजण कुतूहलाने, काही जण नॉल्टेजिक होऊन आणि काही जण इथे येण्याच्या स्वप्नाळू नजरेने त्या दगडी इमारतीकडे बघतात. […]

गरिबांची गाडी – सिंहावलोकन

मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, परकीय आक्रमणे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले होते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागले. जमिनीवर होणाऱ्या समुद्राच्या लढाईला लगाम घालून ती थोपविण्याचे जमल्यावर शहरे वाढू लागली. नवीन रस्ते तयार केले गेले आणि पालखी हे वाहन पुष्कळच […]

आरती…. मोठी आरती वगैरे

पूर्वीच्या चाळ संस्कृतीत आरती म्हणजे एक मोठा इव्हेंट असायचा. त्यातही मोठी आरती म्हणजे कमालच. मोठी आरती म्हणजे विसर्जनाच्या आधल्या रात्री केलेली आरती. काही ठिकाणी तर ही मोठी आरती तब्बल तासभरच काय तर त्याहीपेक्षा जास्त वेळ चालायची.
[…]

पतंग

पण खंर सांगायच तर आता पतंग उडविता येईल की नाही याबद्दल आमच्याच मनात शंका असते कारण पतंग उडविणे ही ही एक कलाच आहे आणि कोणत्याही कलेला सरावची जोड ही हवीच असते. तरीही आजही संधी मिळाली तर एखाद्या समुद्र किणारयावरील वाळूत अनवाणी उभ राहून सोबतीला फिरकी पकडायला कोणी खास माणूस असताना अगदी अंधार पडेपर्यत पतंग उडविण्याचे लहानपणी अपूर्ण राहिलेल स्वप्न पूर्ण करायला मलाच काय ते स्वप्न पाहिलेल्या प्रत्येकाला नक्कीच आवडेल नाही का ? […]

खेळात रममाण बालपणीच्या…

१९९० च्या मध्यापर्यत एक गोष्ट आपल्या सर्वाच्याच जवळची होती किंबहुना ती प्रत्येक लहान-मोठ्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली, ती म्हणजे मैदानी खेळ; या खेळांमुळे बर्‍याच अशी मुला-मुलीचं व्यक्तीमत्व घडलं आणि आत्मविश्वास वाढीस लागला. […]

मौल्यवान नाणी

प्लास्टिक मनीचा (डेबिट कार्डस्, क्रेडिट कार्डस् ) चा वापरआपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनलाय, कारण शॉपिंग पासून, दैनंदिन बिलं भरण्यापर्यंत “क्रेडिट” अथवा “डेबिट कार्डस्” चा वापर करण्यात येतो; भली मोठी शॉपिंग असेल किंवा किराणा दुकानात सुद्धा सर्वत्र नोटाच नोटा पहायला मिळतात. […]

“पब्लिक कॉलिंग”

साधारणत: ७०-८० च्या दशकात जेव्हा टेलिफोनचं संभाषण सर्वांच्या आवाक्यात आलं त्यावेळी पीं.सी.ओ. बुथच्या बाहेर किंवा बुथ नसेल तरी पण स्वकीयांबरोबर बोलण्यासाठी रीघ लागायची, हे चित्र शनिवारी रात्री आणि रविवारच्या दिवशी हमखासपहायला मिळायचं
[…]

“हॅण्ड व्हिडिओ गेम्स”

१९९३-९४ च्या सुमारास भारतात डिजिटल क्रांती वाढू लागली घराघरात “इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे पेव फुटू लागले. खेळणी देखील याला अपवाद नव्हती. अर्थात चावी फिरवून डोलणार्‍या बाहुल्या, बाहुले, रॉबट्स तर एव्हाना खूप जुने झालेले, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सुद्धा अॅनिमेशन बर्‍यापैकी रुळलेली, त्यामुळे कार्टुन्सचा आनंद ही तेव्हांच्या लहानग्यांना घेता येत असे.
[…]

1 13 14 15 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..