नवीन लेखन...

‘चार’ असतात ‘पक्षिणी’ त्या ! रात असते ‘कायमची’ वादळी !!

कुसुमाग्रजांनी “वीज म्हणाली धरतीला ” (१९७०) मध्ये लखलखणाऱ्या झाशीच्या राणीचे आणि तिच्या विस्तवाला प्राक्तन बांधलेल्या सहेल्यांचे हे घायाळ करणारे वर्णन लिहिलंय. आमचे गुलज़ार महोदय ” नमकीन ” (१९८२) मध्ये असेच तीन निखारे (शर्मिला, शबाना आणि किरण वैराळे) उशाला घेऊन निजणारी वहिदा रंगवितात, पुन्हा चार पक्षिणी ! […]

ठाण्यातील बालरंगभूमी

व्यक्तिमत्त्व विकासासाठी बालनाट्याचा साधन म्हणून उपयोग करून मनोरंजनाबरोबरच संस्कार करण्याचे कार्य ठाणे शहरातील मंडळी करीत आहेत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे व भविष्यातही बालरंगभूमीला उज्ज्वल भविष्य आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही ही खात्री आहे! […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – नाट्याभिमानी

सुरुवातीला ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘काका किशाचा’, ‘मुंबईची माणसे’ अशा लोकप्रिय नाटकांचे प्रयोग केल्यानंतर 16 जानेवारी 1965 रोजी डॉ. मधुसूदन शंकर जोशी लिखित आणि श्री. दत्तोपंत काणे दिग्दर्शित ‘हरवले ते गवसले का?’ ही पहिली नवीन नाट्यकृती सादर केली. 1971 साली शशी जोशी लिखित ‘त्रिकोणी प्रेमाची पॉलिसी’ या नाटकाच्या निमित्ताने संस्थेचा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर करण्यात आला. […]

एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)

मी ठाण्यात जन्मले हे माझं अहोभाग्य. कारण मला कलाकार न होण्याला एकही कारण ठाण्याकडे नव्हतं, उलट ही कलावंत कशी होत नाही हे पाहणारेच अवतीभवती होते. कथ्थक नृत्यगुरू डॉ. राजकुमार केतकर. अगदी हाकेच्या अंतरावर यांचे नृत्यवर्ग. गडकरी रंगायतनसारखी वास्तू दोन मिनिटांच्या अंतरावर आणि कलासरगम, मित्रसहयोग यांसारख्या नाट्यसंस्था संधी द्यायला उत्सुक. […]

अस्सल नाट्यधर्मी वि. रा. परांजपे

वेगवेगळ्या निमित्ताने ठाण्यातील हौशी, उत्साही नाट्यवेड्यांना एकत्र आणून त्यांचे नाट्यप्रवेश बसविणे, त्यांना अभिनयाचे मार्गदर्शन करणे हा जणू परांजपेसरांचा ध्यासच होता. 1996 साली नटवर्य मामा पेंडसे यांच्या स्मृती जागविताना परांजपेसरांनी स्वत ‘खडाष्टक’ आणि ‘भाऊबंदकी’मधला जो प्रवेश सादर केला, तो पाहून ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांनी ‘अविस्मरणीय’ अशी दाद दिली होती. […]

‘३८, कृष्ण व्हिला’ – सुघड साहित्यिक गुंतागुंत !

मराठी रंगभूमीला देखण्या, भारदस्त पुरुष नटांची परंपरा तशी क्षीण ! माझी यादी सुरु होते- सतीश पुळेकर, त्यानंतर जयराम हर्डीकर (दुर्दैववश अपघाती निधन झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आपण एका बलदंड अभिनेत्याला मुकलो) आणि आता डॉ गिरीश ओक !बालगंधर्वच्या बाहेर डॉ गिरीश ओकांचे हे ५० वे नाटक आहे असा सार्थ आणि गौरवास्पद बोर्ड होता आणि सगळ्या ५० नाटकांची यादीही ! माझ्यासारख्याने त्यातील बहुतांशी पाहिलेली आहेत. […]

खळखळू हसणारा अवलिया पडद्याआड गेला

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. […]

फॅण्टासी आणि रोमॅण्टीक बाजी…

दमदार कथानक आणि संवाद असलेल्या प्रोमोजने एखाद्या चित्रपटाचं मार्केटींग करुन प्रेक्षकांना स्वत:च्या चित्रपटाकडे खेचुन आणायचे आणि “तगडी स्टारकास्ट” च्या बळावर सिनेमात काहीतरी वेगळेपण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केल्यावर प्रेक्षकांना एनकॅश करायचे हे ट्रेंड आता जुने झालेत. श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, इला भाटे यांची मुख्य भूमिका असलेला बाजी हा चित्रपट मसालेदार आणि स्टारडम झालाय.हे वेगळ्या शब्दात सांगायचे […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..