नवीन लेखन...

शिशिर

आहे मी ऋतू लयाचा शहारता शिशिर सांगतो हिरव्या ओल्या श्वासांना मातीशी जोडून पांगतो… सुस्तावल्या रात्रीस अस्ताव्यस्त पांघरतो आभासी धुक्याचे अस्तर दिवसावर अंथरतो… स्त्रोत चैतन्याचे सारे कवेत घेत..आकसतो भुंड्या झाडदिठ्यांना बोचऱ्या गारव्यात डसतो उत्पत्ती ला आहे इथे शाप लयाचा तो कोसतो रुक्ष देहीच्या गर्भात बीज वसंताचे पोसतो…!!! -सौ विदुला जोगळेकर

अशी कशी कार्टी

अरे राजा ही “कार्टी काळजात घुसली.” चल गड्या बघूया फसली तर फसली “ओळखं ना पाळख” नाही ना रे तिच्याशी कावली तर विचारु तुच ना “मोरूची मावशी” लाजुनी म्हणालीचं “चल तुझं काही तरीच “ सांगेल तिला अजुन “ब्रम्हचारी “आहे मीच नाहीं मी “बहुरूपी “मी तर तुझाच “पाहुणा “ प्रेमवीर तुझा,सांग ना, तू माझी होशील ना “जादु तेरी […]

तो परत आलाय्

तो परत आलाय केरळातून. मान्सून सारखा! मान्सून मित्र म्हणून येतो, हा परत आलाय- आपले यापूर्वीचे सर्व आयुध पचवून, शत्रू म्हणून! … .. आम्ही असतो सरकारी दवाखान्यात रांगेत उभे. तिथला वैद्यकीय अधिकारी देतो आम्हाला ‘ऑगमेंटीन’लिहून. अमॉक्सिसिलीन हे प्रतिजैवक जेव्हा थकतं तेव्हा देण्याचे हे एक उच्चतम प्रतिजैवक -ॲण्टीबायोटिक्स. ( ऑगमेंटीन खरंतर एक मुद्रा नाम. मूळ औषध अमाॅक्सिसिलिन + […]

दृष्टी

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली वैभव दळवी यांची हि कविता रोज देतसे पुन्हा पुन्हा मी, मनास खमकी तंबी; नकोत कुबड्या आधारा वा, जगणे परावलंबी पाय नीतीचे, पाऊल हे ना, कधी पडो वाकडे; हेच घालतो लीन होऊनि, शुभंकरा साकडे हात राबूनी नम्र जुळावे, माणुसकीवर भक्ती; साथ द्यावया त्या बाहुना, ज्ञान-तुक्याची शक्ती धमन्यांमधुनी अखंड […]

आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती…

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली प्रतिभा सराफ यांची हि कविता जुन्या पुस्तकातून शिकते नवीन खूप काही भावाच्या शिक्षणासाठी कधी सोडते शाळाही जे मिळते, जसे मिळते, घेते ती… आत्मनिर्भर ती, स्वावलंबी ती का तरीही मग दुःखीकष्टी ती ? चार भांड्यातही चालवते छान संसार बाई ना उरले खाण्यास तरी तिची तक्रार नाही कोंड्याचा मांडा […]

भाषाभगिनी

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली गीतेश शिंदे यांची हि कविता १ ॥ गीत वाहते नसानसांतून तुझ्या ऋतूंचे गीत घेते रंग रूप नवे माझे झडलेले जिवित रुजते माझ्या डोळ्यांत तू पेरलेले आकाश जसे किरणांचे कोंब फुटे पालवी मनास धरतात दाही दिशा छप्पर माझ्या माथ्यावर तुझ्या दिठिचे क्षितिज नेते मला दूरवर रक्ताच्या थेंबातून माझे […]

चरखा

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली स्व. सौ. गंगूताई वैद्य यांची हि कविता गरगर गरगर फिरवू चरखा दीन जना जो देईल तनखा।।धृ।। चरख्याचा हा मंजुळ नाद दशदिशांतुनी घालीत साद स्वदेशी खादीचा जणू प्रसाद परसत्तेचा सोडवी विळखा गरगर गरगर फिरवू चरखा ।। १ ।। निघती भरभर कोमल धागे सुबक गुंफुनी विणुया तागे देश आपुला […]

तिरंगा स्वाभिमानाचा

अभिमान अम्हा देशाचा विश्वास असे ज्ञानाचा, तो क्षणही दूरवर नाही नव उदय महासत्तेचा आव्हान संकटे आली ना मानली कधिही हार, त्वेषात पेटुनी लढलो उघडले कीर्तीचे दार संघर्ष जरीही केला पण हात पसरले नाही, अडखळलो पडलो उठलो परि इमान विकले नाही बुद्धीच्या जोरावरती श्रम जिद्द आणि शांतीने, उत्तुंग भरारी घेता यश आले आनंदाने त्यागाची लावुनी ज्योत आत्मनिर्भर […]

जाग

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली नितीन प्रवीण शिंदे यांची हि कविता थांग पाणावून गेला सागराचा तीर जेथे, दूर तेथे जावयाचे. चांदण्यांचे पंख लाभो, वा न लाभो काजव्यांना सोबतीला घ्यावयाचे. तूच नाही एकला मार्गस्थ येथे जात आहे जन्म ओलांडीत जो तो. पैल जायाचे कुठे ? ठाऊक नाही गात आहे आसवे सांडीत जो तो. […]

स्वातंत्र्य

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली मंदाकिनी पाटील यांची हि कविता मुलांना ठाऊकही नसतो जेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ तेव्हाच खरेतर ती स्वतंत्र असतात वरवर आज्ञाधारक वाटली तरी ती त्यांच्या आतल्या हाकांना ओ देत असतात आपण शिकवत रहातो यांना धुरकटलेले अर्थ निरअर्थ मुले तेव्हा असतात त्यांच्या गुहेतल्या वाटा खोदण्यात मग्न आपण गिरवून घेत असतो धुळभरल्या […]

1 2 3 4 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..