नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

लेखकांची व्यथा…

लेखकांची व्यथा एक लेखकच बर्‍यापैकी मांडू शकतो पण त्यासाठी तो हाडाचा लेखक आणि किंचित साहित्य वेडाच असायला ह्वा ! श्रीमंतीत जन्माला येऊन चांदिच्या ताटात सोन्याच्या चमच्याने पंच पक्वान खाऊन लेखक झालेला लेखक लेखकांची व्यथा कशी मांडू शकणार ? लेखक म्ह्णून जन्माला आलेला आणि प्रसिद्धीसाठी लेखक झालेला यांची व्यथा वेगवेगळी असते. लेखकांच्या घरातील लोकांच्या नजरेत दारुड्या आणि […]

साहित्याचा जनमानसावर परिणाम

साहित्याचा जनमानसावर परिणाम ‘जो वाचेल तो वाचेल’ ही म्ह्ण आपल्या मराठीत वारंवार वाचायला ऐकायला मिळते. साहित्य मग ते कोणत्याही भाषेतील का असेना जनमानसावर त्याचा परिणाम हा दिसतच असतो. अगदी अशिक्षीत माणसावरही त्याचा परिणाम होत असतो कारण अज्ञानी निरक्षर माणूसही सल्ला मागायला कोणाकडे जातो ? ज्याला साहित्याची जाण आहे ज्याचा प्रचंड अभ्यास आणि वाचन आहे अशा माणसाकडे. […]

दुजातील ईश्वर

दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर । ‘अहं ब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार ।। देह समजून मंदिर कुणी, आत्मा समजे देव । त्या आत्म्याचे ठायी वाहती, मनीचे प्रेमळ भाव ।। आम्हा दिसे देह मंदिर, दिसून येईना गाभारा । ज्या देहाची जाणीव अविरत, फुलवी तेथे मन पिसारा ।। लक्ष केंद्रीतो देहा करीता, स्वार्थ दिसे मग […]

अगम्य ‘शिक्षित’ पालक..!

हिंदीत ‘शिक्षा’ चा अर्थ शिक्षण. आणि शिक्षा शब्दाचा मराठी अर्थ काय? हे सांगण्याची अजिबात गरज नाही. कारण अनेक पालकांनी त्यांच्या लहानपणी ‘शिक्षा’ या शब्दाच्या अनेक अर्थछटा अनुभवल्या आहेत, चाखल्या आहेत, गिळल्या आहेत, अंगावर मिरवल्या आहेत आणि कपड्याखाली लपवल्या पण आहेत. आणि मग उगाच परंपरा खंडित होऊ नये म्हणून याच कल्पक पालकांनी शिक्षेत काळानुरुप बदल करुन त्या […]

मित्र पालक

रात्री आईजवळ झोपण्यावरुन लहान मुलांमधे होणारी भांडणं ही तर प्रत्येक घराची खासियतच आहे. प्रत्येक घरातील मुलांचा आणि आयांचा प्रकार वेगवेगळा असला तरी भांडणं मात्र तीच. प्रत्येक मुलाला वाटत असतं आईने आपल्याच जवळ झोपावं आणि झोपताना फक्त आपल्याशीच बोलावं. समजा, घरात दोन मुलं असली आणि आई जर दोन मुलांच्या मधे झोपली, तरी प्रत्येक मुलाला वाटतं आईने माझ्याचकडे […]

उपदेश सिंचन

‘ताठ बस. पोक काढू नकोस. बसल्यावर पाठीचा मणका ताठ हवा.’ ‘अरे असा काय चालतोस पोक्या सारखा? जरा छाती पुढे काढून चाल.’ ‘साधं जेवता येत नाही तुला. चार नव्हे पाच बोटांनी घास घे.’ ‘पुस्तकाला पाय लागला तर नमस्कार करावा,इतकी पण तुला अक्कल नाही?’ वरील वाक्ये कुणी कुणास म्हंटली असतील? हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मुलांवर उपदेशांच्या […]

नाही ला नाही

लहान मुलांमधे उपजतच कुतूहल आणि जिज्ञासा असते. जसजशी मुले मोठी होऊ लागतात तसतशी त्यांची जिज्ञासाही वाढते.आणि त्यातूनच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ही मुले प्रेरित होत असतात. मुलांच्या जिज्ञासेला,कुतुहलाला खतपाणी घालणं हे तर पालकांचं प्रथम काम आहे. किंबहुना मुलांची जिज्ञासा चेतवणं हे सुजाण पालकत्वाचं व आदर्श शिक्षकाचं पहिलं लक्षण आहे. अनेक पालकांना मुलांच्या जिज्ञासेचा मनोमन धसकाच असतो. प्रश्न […]

मूल मित्र..

मूल मित्र.. घरातली मुलांची भांडणं हा काही नवीन प्रकार नाही. पण त्यातला विशेष प्रकार म्हणजे पालकांची मुलांसोबत भांडणे. या सेक्शन मधे अनेक उपप्रकार आहेत. आज त्यातलाच एक पाहू. काहीवेळा पालकच मुलांशी भांडण उकरुन काढतात. मुलांशी मस्त भांडतात. पण नंतर त्यांना असं वाटतं की मुलेच आपल्याशी भांडत होती. अशावेळी त्या मुलांची फार पंचाईत होते. कारण आपल्या मनातील […]

नाद

आता कळ्तय त्याच्या भोवती भिरभिरणार्याो त्या फुलपाखरांच रहस्य ! प्रतिभाला स्वतःचाच अधिका अधिक राग येत होता. पण ! आता तिचा अहंकार अभिमान थोडा- थोडा दूर होऊ लागला होता. विजयच्या वेळेची किंमत प्रतिभाला कळू लागली होती. विजयने तिच्यासाठी जो वेळ खर्च केला होता त्या वेळेत तो कित्येकांच्या वेदनेला वाचा फोडू शकत होता. त्यांच्य वेदना जगापर्यत पोहचवू शकत होता. त्यांच्या वेदनेवर औषध शोधू शकत होता. तिच्यासाठी त्याने खर्च केलेल्या वेळेची किंमत अमूल्य होती हे तिच्या लक्षात आल होत आणि आता तर तिला खरोखरच त्याचा नाद लागला होता. […]

सावरकरांच्या कविता आणि लीलाताई जोशीबाई !!!

जोशीबाई आम्हाला इंग्रजी खूप समरस होवून शिकवत असत. त्याच्या शिकवण्याच्या हातोटी वर आम्ही सारे खुष होतो. एकदिवशी आम्ही काही मुले जोशीबाई यांना भेटलो आणि तुम्ही आम्हाला मराठी कविता शिकवा ही विनंती त्यांना केली. जोशीबाई थोड्याश्या तापट होत्या त्यांनी मला वेळ मिळणार नाही म्हणून आम्हाला परत पाठवून दिले. आम्ही हिरमुसले झालो. काही दिवसांनी जोशीबाई स्वतःहून म्हणाल्या तुम्ही […]

1 468 469 470 471 472 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..