नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

चवीची अनुभूती

बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो . . . बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के […]

ताकद पुस्तकाची

योग्य वेळी हातात पडलेलं एखादं पुस्तक, खरंच, आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकतं! […]

दो घडी वो जो पास आ बैठे…

“चार दिवस आधी राहायला येशील ना ग?” माझ्या जवळ जवळ बाराव्यांदा विचारल्या गेल्या प्रश्नाला “होय” असे दोन बहिणींकडून ठाम उत्तर मिळाले ,मग माझा जीव भांड्यात पडला.हि भांड्यात पडण्याची आयडिया कुणाची कुणास ठाऊक? आम्ही आपले सासूबाईंची भांडी जीव पडायला वापरतो..एरवी घरात टपरवेअर. .. असो …एकूणच काय माझा जीव नाॅनस्टीक पातेल्यात पडला. दोघी आल्या आणि घराचे लग्न घर […]

‘आई’चा संप..

आता सध्या सुरू असलेला संप. ह्या संपात मुळात शेतकरी किती आणि राजकारणी किती हा संशोधनाचा विषय आहे. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे ‘शेतकरी आई’ कष्टाने कमावलेलं लेकरांच्या, झालंच तर घरच्या कुत्र्या-मांजरांच्या घशात घालते, पण असं माज आल्यासारखं रस्त्यावर कधीही फेकून देत नाही. आज रस्त्यावर फेकलं गेलेलं अन्न व दुध खऱे शेतकरी बाजारात विकायला निघाले होते व काही झुंडशहांनी […]

शिक्षणाच्या आयचा घो..!!

दि. ३० मेला १२वी एचएससी बोर्डाचा निकाल लागला. त्या अगोदर काही दिवस आयसीएसई बोर्डाचा निर्णय आला व त्याही अगोदर काही दिवस सीबीएसई बोर्डाचा रिझल्ट लागला. एकाच १२वीचे तिन तिन वेगळे रिझल्ट तिन वेगवेगळ्या दिवशी लागले. ‘बोर्डों के विविधता मे एकता’ ही घोषणा भारताच्या विविधतेच्या तालावर बोलण्याचे माझ्या कंठापर्यत येते पण मी ही राष्ट्रप्रेमाची उबळ मोठ्या कष्टाने […]

लज्जा..

लाजेची कल्पना कालसापेक्ष असते. म्हणजे वेगवेगळ्या काळात ती वेगवेगळी असते. अजंठा-वेरूळ अथवा खजुराहो येथील शिल्प पाहीली असता, शिल्पातील स्त्रीया बऱ्याचश्या नग्न अथवा अर्ध-नग्नानस्थेत दिसतात. ‘टाॅपलेस’ असणं किंवा उरोभाग अनावृत्त असणं ही त्यातील बहुसंख्य शिल्पांत समानता आहे. कोणत्याही काळातली समाजाचे प्रतिबिंब त्या त्या काळातील लेखन-चित्र-शिल्पकलेत लख्खपणे पडलेलं दिसतं. कलाकार समाजातूनच येत असल्याने त्या त्या काळातील प्रचलित इष्ट-अनिष्ट […]

कुंकू..

लेखाचं शीर्षक कुंकू असलं तरी मला त्यात कुकवापासून टिकली, बिंदी, टिका, मळवट वैगेरे कुंकवाच्या सर्व प्राचिन-अर्वाचिन पिढ्या अपेक्षित आहेत. लिहीताना मी फक्त ‘कुंकू’ असाच उल्लेख करणार आहे. आणखी एक, या लेखात फक्त’ हिन्दू स्त्री’च्या कपाळावर त्या मोठ्या अभिमानानं धारण करत असलेल्या ‘सिंदूरी सुरज’ बद्दलच बोलायचंय, पुरूषांच्या कपाळाबद्दल नाही. एक हिन्दू धर्म सोडला तर स्त्रीयांनी कपाळावर काहीही […]

1 435 436 437 438 439 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..