नवीन लेखन...

नवीन व्रत

एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुंदर स्त्री रहात होती. घरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत होती. परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती. जबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव, या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या गुंताड्यात फसली बी.पी., शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद, खुशी, हसू यांची उडाली धूळधाण.

तशातच एके दिवशी तिच्या लेकीनं दिला स्मार्टफोन भेट आणि what’s app मुळे मित्र मैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट काहि दिवसांतच रिपोर्ट येऊ लागले नॉर्मल. चिकटून बसलेले बी.पी. शुगर वागू लागले फॉर्मल.

ती आनंदली,what’s app व्रताची यशवार्ता आल्यागेल्याला सांगू लागली.

तिची एक सखी निर्मळ मनाची ! ती म्हणाली, मला पण सांग ना ग, हे व्रत ! उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही.

स्त्री म्हणाली, बघ, रोज सकाळी उठताक्षणी ह्या देवाचे दर्शन करावे. GM, GNचा वेळोवेळी जप करावा.

यथासमय देवाच्या देव्हार्‍यात डोकवावे, मन मोकळे करावे.

एका ग्रुपने what’s app ला वाहिलेले सर्व काही दुसऱ्या ग्रुपला यथाशक्ती मनोभावे अर्पण करावे.

रुसू नये, रागवू नये, आपला ग्रुप सोडू नये. सखीने मनोभावे केले व्रत आणि आश्चर्य, चारच महिन्यात मिळाले फळ. शुगर कमी होऊन रडक्या मना येऊ लागले बळ.

तुम्हीही व्रत हे धरावे,कामकाज काळवेळ सांभाळूनी त्रिकाळ what’s app ला पुजावे.

जसा हा देव त्या दोघी सखींना पावला, तसा तुम्हासही पावो. व्रत सर्व बंधुभगिनींनी करावे. साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ….मन लाऊन वाचणाऱ्याला एक लाभ,फॉरवर्ड करणाऱ्याला अनेक लाभ.!!

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..