ग़ालिब म्हणतो, ख़्याल उनका सुख़न मेरा, ज़बाँ उनकी दहन मेरा बहार उनकी, चमन मेरा गुल उनके, गुलिस्ताँ मेरा ! (विचार त्याचे पण भाषा माझी, त्याचा स्वर,पण माझे मुख; त्याचा वसंतऋतु, बगिचा माझा; त्याची फुलं नि वाटिका माझी.) “कोसला”कार भालचंद्र नेमाडेंच्या शब्दांत सांगायचे तर उदाहरणार्थ मी आज मिलिंद शंकर नेरुरकरवर लिहिणार आहे. तुम्हाला पहलेछूटच सांगून टाकतो की […]
एक एवढासा, पिटुकला, तुच्छ व काहीसा किळसवाणा जीव उंदीर! तो एकटाच आणि त्याच्या विरुद्ध आम्ही दोन माणसं. गनिमीकाव्याने आमचे युद्ध सुरू होते. प्रश्न त्याच्या जीवन-मरणाचा होता. अस्तित्वाची लढाई तो निकराने लढत होता. आम्ही आमची बुद्धी पणाला लावून त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो आमचे सर्व प्रयत्न शिताफीने धुळीला मिळवत होता. […]
सर्जेरावांनी लेखन करताकरता गेल्या काही वर्षात रंगांशी खेळता खेळता त्यांचे हात इतके सरावले की आज पर्यत त्यांनी केलेल्या पेंटिंग्सपैकी सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून जयवंत पाटलांच्या या चित्रांची गणना होईल, हे नक्की. संस्थेच्या लोभापोटी, आपली संस्था आपुलकीच्या नात्यांसवे सौहार्दपूर्ण कलाकारांच्या उन्नतीचे व्यासपीठ आहे. […]
आता हेच बघा नं…. Tag आणि लोकमत आयोजित, नातं खास.. नृत्य झकास..स्पर्धेची ad हर्षदानी मला पाठवली. मी आणि गीतानी हिंमत करुन भाग घेतला. फक्त २ दिवस जमके practice केली. जमेल नं या वयात? असं मनातही आणलं नाही. […]
‘उत्तानपणे प्रणयराधना करण्यात आम्ही सर्वांच्या पुढे’ अशी माणसाने बिलकुल बढाई मारायला नको! सेरेंगेटीच्या अरण्यवनात देखण्या प्रियेच्या भोवती पिंगा घालणारे रंगेल नर पहा म्हणजे खात्री पटेल. जंगलचा राजा प्रियेची अशी मनधरणी करतांना कधी दिसला की समजेल. […]
जगातले शीतयुध्द आता संपले. झपाट्याने बदलत असलेल्या शासकीय नीतीनुसार झांझीबारला जगभरच्या व्यापार-शर्यतीत बेधडक उडी घेण्यासाठी सज्ज राहावे लागेल याची जाणीव या अहवालात प्रकर्षाने सादर होते. तसे पाहिले तर आफ्रिकेच्या पंचावन्न देशातही लोकांची निदर्शने, संघर्ष होत असतात. मात्र विकास आराखड्यांना होणाऱ्या विरोधाचे प्रमाण जवळजवळ नाहीच. आता झांझीबारमध्ये आहे प्रतिक्षा समृध्दीची. सध्या चालू आहे आराखड्याची कार्यवाही. यामुळे जागतीकीकरणाबरोबर […]
1942 मध्ये ‘बसंत’ नावाच्या चित्रपटात तिने पहिली भूमिका केली. नंतर काही चित्रपटात काम केल्यावर 1947 साली आणखी एका महान कलाकाराबरोबर तिला काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे नाव होते, ‘राज कपूर’. या चित्रपटानंतर मधुबालेची विजयी दौड सुरु झाली. मात्र 1949 मध्ये एक अलौकिक घटना घडली. आख्या हिंदुस्तानाला आणि शेजारच्या देशांना जन्मभर भक्ती करायला दोन स्त्री-दैवते मिळाली, ‘महल’ चित्रपटातल्या ‘आयेगा आनेवाला’ या गीतानंतर, – ‘लता मंगेशकर आणि मधुबाला’. […]
सन १९९० ला लग्न झालं आणि सुविद्या पत्नी म्हणुन वृषालीनं संसाराची गोडी वाढवली. कठीण प्रसंगात पोलीस खात्यात काम करणाऱ्या एका कलंदर माणसाबरोबर अपेक्षा न करता ती माझ्या मागे ठामपणे उभी राहिली. अनेक संकटं आली पण ती कधी घाबरली नाही. म्हणुन यशस्वी वाटचालच नाहीतर मी उत्तुंग भरारी घेतली. कधी मागं पाहायला लागलं नाही. लग्नानंतर तिनं संसारवेल फुलवली. एका मागोमाग एक दोन फुलं बहरली. […]