Articles by सौ. आराधना अनिल कुलकर्णी
वर्तुळ एक मुक्त चिंतन
हिंसा परमो धर्म: नावाची, डोळ्यात अंजन घालणारी एक सुंदर कथा मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिली आहे. एका प्रसंगी नीचवृत्ती मौलवीच्या तावडीतून एका हिंदू युवतीला साधाभोळा जामीद वाचवतो व घरी सुखरुप पोहचवतो. या उपकाराची परतफेड कशी करु असे तिचा पती विचारतो. त्यावर जामीद म्हणतो, ” संकटात सापडलेल्या कुणाचीही मदत कर. तीच माझी परतफेड असेल.” या कथेतून माझ्या विचारचक्रास गती मिळाली. […]
पानगळ
पानामागून पाने गळावीत तसे दिवस गळत जातात. मनात पाय रुतवून ..ओल्या खुणा ठेवून. नवी पालवी फुटते पुन्हा, पुन्हा दिवसही येतच राहतात, तशी माणसेही येतात आणि जातात…तीही एक पानगळअसते. कोणी कोणासाठी थांबायचं? कशाशी एकनिष्ठ राहायचं? झाडांनी गळालेल्या पानांशी की नव्या पालवीने झाडाशी? एका ऋतूत किती बदल होतात! तेव्हा नुकत्याच झालेल्या ओळखी आता दृढावलेल्या, तर तेव्हा दृढ आलेले […]
असं असतं का प्रेम?
रात्री उशिराचा एक रेडिओ कार्यक्रम ऐकत होते. श्रोत्याने फोनवरुन आपली समस्या सांगणे,त्यावर निवेदकाने सल्ला देणे, मग एक चित्रपट गीत. पुन्हा पुढची समस्या. पुष्कळसे इंग्लिश शब्द मिश्रित असलेल्या हिंदी भाषेतील त्या कार्यक्रमाचे स्वरुप असे होते. फोनवर एका मुलाने सांगितले की त्याची ‘गर्लफ्रेंड’ सतत काही ना काही कारणाने व परत करण्याच्या बोलीवर पैसे मागते. […]
माकड,माणूस आणि संवेदनशीलता!
नुकतीच एक अस्वस्थ करणारी बातमी मी वाचली. प्रसंग असा घडला. मोठ्या शहरातील एका कचराकुंडीजवळ एक वृद्ध माणूस निपचित पडला होता. काही लोकांनी त्याची विचारपूस करीत त्याला मदतीची तयारी दाखवली.परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या माणसाने लोकांच्या दयेस स्पष्ट नकार दिला. […]
एकला चालो रे!
एक एवढासा, पिटुकला, तुच्छ व काहीसा किळसवाणा जीव उंदीर! तो एकटाच आणि त्याच्या विरुद्ध आम्ही दोन माणसं. गनिमीकाव्याने आमचे युद्ध सुरू होते. प्रश्न त्याच्या जीवन-मरणाचा होता. अस्तित्वाची लढाई तो निकराने लढत होता. आम्ही आमची बुद्धी पणाला लावून त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो आमचे सर्व प्रयत्न शिताफीने धुळीला मिळवत होता. […]
मला माणूस हवंय
मोठ्या शहरातील मोठं हॉस्पिटल. त्यातील डायलिसिस विभाग. एकदा माझे तिथे जाणं झाले. रांगांमध्ये बरेच बेड्स व त्यावर आडवे पडलेले पेशण्ट्स. बाजूला डायलिसिसचं मशीन.कोणी शांत पडून होते, कुणी जवळच असलेल्या आपल्या सोबतीला आलेल्याशी थोडेफार बोलत होते. […]