नवीन लेखन...

आपल्याला अनेक बाबतीत कुतुहल असतं. अशा प्रश्नांची उत्तरं देणारं हे सदर

शुद्धतेची गोडी

आपण चव चाखतो ती ग्लुकोजची किंवा फ्रुक्टोजची. नुसत्याच लांबलचक माळेची चव आपल्याला घेता येत नाही. म्हणूनच तर साखरेचा दाणा हा केवळ ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचाच बनलेला असतो आणि त्यात इतर कसलीही भेसळ नसते तेव्हाच आपल्याला ती चांगली गोड लागते. एरवी तिची गोड कमीच होण्याची शक्यता असते. […]

घटक तेच, माळा अनेक

सर्व पदार्थांचा मूलभूत घटक म्हणजे अणू. सर्व सजीवांचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. तसाच सर्व शर्करामय पदार्थांचा मूलभूत घटक म्हणजे मोनोसॅकराईड. हे दोन प्रकारचे असतात. पहिला ग्लुकोज. […]

वाढत जाणारी गोडी

गहू, तादूळ, मका यांची पीठं म्हणजेही कर्बोदकच. पण ती नुसती किंवा उकडून शिजवून खाल्ली तरी गोड लागत नाहीत. गव्हाच्या पिठापासून तयार केलेला पाव, किंवा चपाती, किंवा तांदळापासून बनवलेला भात किंवा उकड ही काही गोड लागत नाहीत. […]

गोडाचा वरचष्मा

कोणत्याही यंत्राला आपलं काम पार पाडण्यासाठी ऊर्जेची गरज लागते. विजेवर चालणार्‍या यंत्राना वीज ती ऊर्जा पुरवते. पेट्रोलवर चालणार्‍या यंत्रांना पेट्रोलच्या ज्वलनापासून ती मिळते. आपलं शरीर हे एक अतिशय गुंतागुंतीचं तरीही अत्यंत कार्यक्षम असं यंत्रच आहे असं म्हटलं जातं. […]

निगोड साखर ?

नावडतीचं मीठ अळणी असं म्हणतात. तसंच मग आणखी कुणाचीशी साखरही निगोड का असू नये? वरवर हा थट्टेचा प्रकार वाटेल. पण खरं पाहता साखरेची गोडी सगळीकडे सारखीच असते असं नाही. अशी ती का बदलते हे समजून घ्यायचं असेल तर आधी साखर म्हणजे काय हेही समजावून घ्यायला हवं.
[…]

सक्रांतीचं अढळपद

वास्तविक आपले सण असे नियमितपणे एका ठराविक तारखेला कधीच येत नाहीत. त्यांच्यात वर्षागणिक बदल होत असतात. मग ती गणेश चतुर्थी असो, दसरा असो, गुढी पाडवा असो की दिवाळी असो. […]

ढगांची पळवापळवी

एक दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये त्या पूर्वीची दोन वर्षं कोरडी गेली होती. अवर्षणाचा तडाखा त्या भागाला बसला होता. खरं तर हा प्रदेशच मुळी पर्जन्यछायेतला आहे. […]

मतदानाची किंमत

ती दूरचित्रवाणीवर एक जाहिरात आजकाल दाखविली जाते. एरवी या जाहिराती फारशा कल्पक असतात असं नाही. काही तर हास्यास्पदच असतात. पण ही मात्र विचार करायला लावणारी आहे. कोणाच्या तरी नावाचा जयघोष करत लोकांचा एक समूह एका तरुणाकडे येतो. त्यातलाच काळा चष्मा घातलेला एक मध्यमवयीन माणूस पुढं होतो. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा मग्रूर आत्मविश्वास आहे. […]

चिकित्सा करा

आजकाल सतत एक उपदेश ऐकवला जातो. वैज्ञानिक दृष्ठिकोन बाळगा. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची आत्यंतिक गरज आहे. समाजधुरीण, रातकीय नेते, शिक्षणमहर्षी, एवढंच कशाला पण गल्लीतल्या सत्यनारायणाच्या पूजेला पाहुणा म्हणून बोलावलेला एखादा अभिनेता किंवा असाच पेज थ्रीवरचा सेलिब्रिटीही आपल्याला ते सुनावून जातो. […]

पडत्या फळाची आज्ञा

वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दप्रयोगातल्या वैज्ञानिक या शब्दामुळं थोडीशी दिशाभूल होते. वैज्ञानिक आपल्या संशोधनकार्यासाठी जी प्रणाली वापरतात ती या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात अभिप्रेत आहे. वैज्ञानिक आपलं काम कसं करतात? तर ते कोणतंही विधान तसं सहजासहजी किंवा कोणाच्याही दबावाखाली मान्य करत नाहीत. […]

1 31 32 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..