नवीन लेखन...

गोडाचा वरचष्मा

कोणत्याही यंत्राला आपलं काम पार पाडण्यासाठी ऊर्जेची गरज लागते. विजेवर चालणार्‍या यंत्रना वीज ती ऊर्जा पुरवते. पेट्रोलवर चालणार्‍या यंत्रांना पेट्रोलच्या ज्वलनापासून ती मिळते. आपलं शरीर हे एक अतिशय गुंतागुंतीचं तरीही अत्यंत कार्यक्षम असं यंत्रच आहे असं म्हटलं जातं. या शरीराच्या यंत्रालाही जी वेगवेगळी कामं पार पाडावी लागतात त्यासाठी लागणारी ऊर्जा मुख्यत्वे शर्करामय पदार्थांच्या किंवा कर्बोदकांच्या ज्वलनातून मिळते. निसर्गानही या बाबतीत चोख व्यवस्था केलेली आहे. जे पदार्थ अशी शक्ती देतात ते मूळचेच सारे गोड असतात. आज आपण अन्न शिजवून खातो. पण माणूस पूर्वी रानावनात राहत असताना झाडांची फळं आणि कंदमूळं वगैरै खाऊनच राहायचा. आता आसपास दिसणार्‍या असंख्य खाद्यपदार्थापैकी चांगले कोणते वाईट कोणते हे कसं ओळखायचं? तर बघा पिकलेली रसाळ फळं नेहमीच गोड असतात. रताळी, बटाटे वगैरे कंदमूळंही तशी गोडच असतात. उलट जे पदार्थ विषारी किंवा शरीराला घातक ते बहुतेक कडू असतात. म्हणूनच आपल्या जीभेला गोडाची अधिक चटक लागत असावी. कोणाचाही पाहुणचार करायचा तर गोडाधोडाच्या, पुरणावरणाच्या स्ययंपाकाशिवाय चालत नाही. आपली पक्वान्नं सगळी गोडच. सणासुदीलाही नेहमी गोडाच्याच पदार्थांची चलती असते. या गोडाचा एवढा वरचष्मा फक्त आपल्या जेवणावरच आहे असं नाही. आपल्या एकंदरीत संस्कृतीवरच त्याचा पगडा आहे. लहान मूल गोड असतं. सुखांत नाटकाचा शेवट नेहमीच गोड होतो. कोणीही भांडणतंटा न करता राहू लागले की ते गोडीगुलाबीनं राहू लागले असंच म्हटलं जातं. मुलांवर संस्कार करणार्‍या कथा साने गुरुजींनी लिहिल्या त्यांचं नावच मुळी त्यांनी ’गोड गोष्टी’ असं ठेवलं. मैत्रीचा तिळगूळ देतानाही ’गोड बोला’ अशीच विनवणी केली जाते.

आणि ती गोडाची चव आपल्याला देणारे संवेदकही जीभेच्या पुढच्या भागातच जास्ती असतात. म्हणजे पदार्थ तोंडात घातला रे घातला की तो गोड आहे की नाही याची चाचपणी केली जाते. तो पासपोर्ट जवळ असला की त्या पदार्थाला मग बिनबोभाट आत प्रवेश मिळतो.

— डॉ. बाळ फोंडके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..