नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

गोमुत्राचे फायदे

भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच […]

‘दीर्घायु’चे रहस्य…आयुर्वेद !!

कोणाही थोरामोठ्यांना वाकून नमस्कार केला की; ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद कानावर पडत असतात. दीर्घायुची आस नसलेला मनुष्य विरळाच. आपल्याकडे चार युगे सांगितली असून प्रत्येक युगात १/४ आयुर्मानाचा ऱ्हास होतो असे आयुर्वेद सांगतो. हा ह्रास होत होत; कलियुगात १०० वर्षे ही सरासरी आयुर्मानाची परिभाषा आहे. मात्र प्रत्यक्षात आपल्या देशात काय परिस्थिती आहे? भारत सरकारच्या जनगणना विभागाने जाहीर […]

आहारातील बदल भाग ४३ – चवदार आहार -भाग ४

आहारामधे बदल झाला, चवीमधे बदल होत गेला, परिणाम बदलले. बदल हा होतच असतो. आपण त्याला नाकारू शकत नाही. आमच्या आधीच्या पिढीने हा बदल अनुभवला नव्हता का ? होता. म्हणजे आता जे ऐशी नव्वदीत आहेत, त्यांनी त्यांच्या लहानपणी चटपटीत नाश्ता खाल्लाच नव्हता. पण त्यांच्या पिढीने महाराष्ट्रामधेच उत्तप्पा, डोसा, इडल्या, पनीर मख्खनवाला, तंदुरी रोटी, उपीट, खाल्लेच ना. म्हणजे […]

संतुलित आहार

कोणत्याही माणसाची आयुष्यात माफक अपेक्षा असते कि, माझे जीवन सुखी, आनंदी असावे. मग सुखी जीवनासाठी निरोगी शरीर अतिमहत्वाचे ! […]

आहारातील बदल भाग ४२ – चवदार आहार -भाग ३

आंबट आणि तिखट या मिश्र चवीचा एक पदार्थ म्हणजे लोणचे. पानातील डाव्या बाजूला वाढलेल्या लोणच्याला डाव्या बाजूचा राजा म्हटलं तरी चालेल, एवढा मान या लोणच्याला भारतीय जेवणाच्या दुनियेत आहे. आणि पानामधे स्थान पण अगदी वर. राजाचेच. भारतीय म्हणण्याचे कारण, हा अस्सल भारतीय प्रकार आहे. कारण त्यात वापरले जाणारे मसाले, हे मूलतः भारतातीलच आहेत. एकेकाळी भारत हाच […]

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस : एक आत्मचिंतन

आंतरराष्ट्रीय योग दिनापाठोपाठच भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने उचललेले कौतुकास्पद आणि अभिमानास्पद पाऊल म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून घोषित करणे हे होय. आपल्या मातीतल्या या वैद्यकशास्त्राला स्वतंत्र असा दिन जाहीर होण्यास सुमारे सत्तर वर्षे वाट पाहावी लागणे ही अतिशय दुःखद घटना म्हणावी लागेल. त्यामुळे हा निर्णय घेतल्याबद्दल सर्वप्रथम मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय […]

आहारातील बदल – चवदार आहार – भाग २

चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. पानातली डावी बाजू ही चवींनी भरलेली असते. हे पदार्थ किती खावेत, याचे प्रमाण लक्षात घेणे, महत्वाचे असते. म्हणून ते किती वाढावेत, हे पण ठरलेलेच असते. लिंबामधे व्हिटामिन सी असते म्हणे. पण रोज किती लिंबे खावीत याचे काही ठरलेले प्रमाण ? माहिती नाही. ते आपल्याला ताट वाढण्यातून आपसूकपणे […]

कॅन्सरच्या नवीन उपचार संशोधनांतील आयुर्वेदीय सिद्धांत !!

कॅन्सर; नाव घेताच धडकी भरवणारा रोग. जगभरात या रोगावरील उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालते. विशेष म्हणजे आशिया आणि त्यातही भारतात या रोगाने अन्य देशांच्या तुलनेत अगदी नजीकच्या काळापर्यंत जोर धरलेला नव्हता. पचनसंस्थेचे कॅन्सर तर आपल्याकडे आजही तुलनेत नगण्य आहेत. डीन ऑर्निश सारखे जगप्रसिद्ध आहारतज्ज्ञ याचे श्रेय आयुर्वेद आणि भारतीय पाकशास्त्राला देतात. खरंच आयुर्वेद या दुर्धर रोगाच्या […]

आहारातील बदल – चवदार आहार – भाग १

शाकाहारी आहारात जी विविधता आहे, ती मांसाहारामधे नाही. मीठापासून ते अगदी लिंबू, लोणचे, कोशिंबीर, चटणी, सोलकढी, पापड, कुरडया, भजी, वडे, दही, हे सर्व पदार्थ शाकाहाराची शान आहे. आणि भारतीय मांसाहारात वर्ज्य नाहीत. डाव्या बाजुला असणारे हे चटकमटक पदार्थ जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण एखादा मुख्य पदार्थ जर ढेपाळला तर, पूर्ण जेवणाला सांभाळून घ्यायचे महत्वाचे कामही करतात. […]

1 124 125 126 127 128 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..