अन्नप्रतिष्ठा
जीवनाचे अध्यात्म समजून घेताना रोजच्या जगण्यातील प्रत्येक घटनेचा ऊहापोह चिंतनाच्या पातळीवर करणे आवश्यक असते. तेव्हाच दैनंदिन जीवनप्रवाहात अध्यात्म उतरू शकते. योग्यायोग्यतेचा निवाडा करून सुयोग्य मार्गावरून चालणे आणि आपल्यासह इतरांनाही त्या मार्गावरून घेऊन जाणे जमायला हवे. याची सुरूवात आपल्यापासून करून मग ते इतरांना शिकविले, तर ते आचरणशील होते. अलीकडे लग्न किंवा इतर उत्सवादी कार्यक्रमात अन्न टाकू नये, […]
