नवीन लेखन...

शैक्षणिक

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

गणपतीच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्याने पर्यावरणाची हानी होते, या मुद्द्यावर न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे सांगितल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे पण हे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी अगदी जुन्या काळापासून मूर्ती व चित्रकृती तयार करण्यासाठी वापरले जात होते. […]

पुदिन्यातील औषधी घटक

पुदिन्याच्या तेलातील मेंथॉल आणि मेंथाईल अॅसिटेट यांमुळे पुदिन्याला तीव्र वास येतो. मँगनीज, तांबे आणि जीवनसत्त्व ‘क’ यांचा पुदिना हा उत्तम स्रोत आहे. याशिवाय पुदिन्यात इतर बाष्पनशील तेलेही असतात. पुदिन्यामुळे कॅन्सरची, विशेषतः जठराच्या कॅन्सरची संभाव्यता कमी होते. मेंथॉल हे एक कार्बनी संयुग आहे. ते पाण्यात विरघळत नाही, पण अल्कोहोल आणि इथरमध्ये विरघळतं. […]

भारताचे सातवे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग

झैल सिंग यांना ब्रिटिश शासनाने तुरुंगात डांबले. सुटका झाल्यानंतर ते भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात समांतर शासन स्थापन करून शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळही उभी केली. […]

प्लास्टिक

प्लास्टिक हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, त्यामुळे त्याच्यापासून सुटका नाही. प्लास्टिकमुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या तसेच यूज अँड थ्रो साधनांना चालना मिळाली. […]

प्लास्टिकला घटकद्रव्यांमुळे मजबुती

ॲक्रिलोनायट्रिल ब्युटाडाइन स्टायरिन या मिश्र प्लास्टिकचा शोध १९४८ साली यामध्ये असलेल्या लागला. अॅक्रिलोनायट्रीलमुळे त्याला उच्च ताण सहन करण्याची शक्ती, रसायनांना विरोध करण्याची शक्ती व उष्णतेला टिकून राहण्याची शक्ती हे गुणधर्म प्राप्त झाले. यामध्ये आलेल्या ब्युटाडाइन या रबरामुळे त्याची आघात सहन करण्याची शक्ती व मजबुती वाढली व स्टायरिन या घटकद्रव्यामुळे प्लास्टिक अधिक चकचकीत दिसते आणि त्यापासून वस्तू बनवणे सोपे झाले. […]

आबेल पारितोषिक २०२२

प्रसिद्ध परंतु अल्पायुषी नॉर्वेजिअन गणितज्ञ नील्स हेन्रिक आबेल (१८०२-२९) यांच्या नावाने एक पारितोषिक, २००३ सालापासून दरवर्षी आहे. एका अर्थाने हे पारितोषिक गणिती जीवनगौरव या स्वरूपाचे असून त्या विजेत्याचे एकूण कार्य विचारात घेते, न की एखादे प्रमेय, सिद्धांत किंवा प्रश्न सोडवण्याची पद्धत. पदक आणि ७५ लक्ष नॉर्वेजिअन क्रोनर्स (सुमारे भारतीय रुपये ६,४८,००,०००) असे या पारितोषिकाचे स्वरूप असून, नॉर्वे सरकारच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली जाते. […]

टेफ्लॉन

पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरातील तवा किंवा कढया एकतर लोखंडी, पितळी वगैरे धातूंच्या असायच्या पण आता हे जुने तवे किंवा कढयांची जागा अतिशय आधुनिक अशा नॉनस्टिक तवे व फ्राइंग पॅन्सनी घेतली आहे. […]

प्लास्टिकच्या डब्यात खायचे पदार्थ

प्लास्टिकच्या डब्यात खायचे पदार्थ किंवा औषधे ठेवली तर ती शरीराला अपायकारक ठरतात का? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. असे डबे पॉलिथिलिनपासून बनवले जातात. पॉलिथिलिन दोन प्रकारे बनवले जाते. हे दोन्ही प्रकार मुळात बिनविषारी प्रकारात मोडतात. पॉलिथिलिनचा मानवी शरीरावर अजिबात परिणाम होत नाही हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पॉलिथिलिन हे एकमेव प्लास्टिक असे आहे की, ज्यावर कोणत्याही द्रावकाचा (सॉल्व्हंट) परिणाम होत नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर पॉलिथिलिन कोणत्याही द्रावात विरघळत नाही. […]

भिती – एक भयंकर गोष्ट

भिती माणसांच्या विचारांमध्ये असते, ती जगात कुठेही अस्तित्वात नाही. भितीग्रस्त माणूस ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट सर्वात मोठी समजतो, ज्या गोष्टीला तो घाबरत नाही त्या गोष्टीला तो तुच्छ समजतो. भितीग्रस्त माणूस ज्याची भिती वाटते अशा गोष्टींच्या सूचना अंमलात आणतो, भीतीदायक माणसांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो आणि ज्या गोष्टीची भीती वाटत नाही त्यांना अक्षरशः नजरअंदाज करतो. […]

सनग्लासेस

सनग्लासेस म्हणजे गॉगल हे सूर्याच्या प्रखर किरणांपासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करणारे एक साधन आहे. प्रदूषणापासूनही त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. सनग्लासेसमुळे स्त्री-पुरूषांचे व्यक्तिमत्त्वही खुलून दिसते. […]

1 9 10 11 12 13 155
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..