नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

माओवाद संपवण्याकरता सुरक्षाविषयक उपाय योजना

निवडणुकीच्या काळामध्ये वाढलेला माओवादी हिंसाचार अजून वाढतच आहे. त्यामुळे 23 मेला मिळणाऱ्या नवीन सरकार पुढे माओवाद कसा संपवायचा हे एक मोठे आव्हान असणार आहे. या लेखामध्ये आपण माओवाद्यांच्या विरुद्ध सुरक्षात्मक उपाय अजुन मजबुत करता येतील यावर विचार करू. […]

भारतीय निवडणुका आणि माओवाद्यांचा वाढता हिंसाचार

भारतासारख्या बलाढय़, खंडप्राय देशाला मूठभर माओवादी आव्हान देतात, हवा तेव्हा हिंसाचार घडवून दहशत निर्माण करतात ही लाजिरवाणी बाब आहे. भारतीय लोकशाहीला माओवाद हा सर्वांत मोठा धोका आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक गाव दहशतीपासून मुक्त व्हावे, असा संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. माओवादाविरुद्धची लढाई ही अशी अनेक आघाड्यांवर आणि दीर्घकाळ लढावी लागणार आहे. […]

गोंदियाजवळील नवेगाव बांध व ईटीया डोह

नवेगाव बांध गोंदिया पासून ५५ किमी. अंतरावर, नागपूर गोंदिया हे अंतर १७० किमी. ही जागा भारतातील पक्षी व स्थलांतरीत पक्षांचे माहेरघर आहे. नवेगाव बांध म्हणजे ७५ फूट लांब मातीचा बंधारा ज्यामुळे मोठा जलाशय सात डोंगरांच्या कुशीत पसरलेला आहे,चोहोबाजुनी घनदाट झाडी. […]

वाघांचा प्रदेश – ताडोबातील तेलिया तलाव

जंगलातील मध्यात असलेल्या तेलिया तलावाचे पाणी इतके संथ, नितळ व निस्तब्ध पाहून आपण अवाकच होतो. समोरच्या डोंगराचे त्यात पडलेले प्रतिबिंब. वर शुभ्र निळे आकाश. दहा मिनिटे निस्सिम शांततेत जंगल न्याहाळण्याचा आनंद वर्णनातीत होता. […]

साल्व्हादोर, फोर्तालिझा

साल्व्हादोर पोर्ट मध्ये गेल्यावर जहाज लगेच जेट्टी वर जात नसे तीन चार दिवस जेट्टी पासून बाहेर समुद्रात नांगर टाकून उभे राहावे लागत असे. आजूबाजूला आणखी चार पाच जहाजे उभी असायची. ब्राझिल मध्ये असल्याने जहाजावरुन किनाऱ्यावर जायला लगेच बोट मागवली जायची बोटचा खर्च कमी असल्याने कॉन्ट्रीब्युशन वगैरे काढून केला जात असे . […]

भ्रमंती सरोवरांची

गावागावागणिक प्रत्येक तळ्याला, लेकला त्या गावाची परंपरा व इतिहास जोडलेला आहे, कोल्हापूरचा रंकाळा,  नागपूरचा शुक्रवार,  हैदराबादचा हुसेनसागर,  नैनितालचा नैनी या व अशा अनेक तलावांच्या सुंदर आठवणी मनाला आगळा वेगळा आनंद देतात. काही सरोवरे मात्र माझ्या अंतर्मनाला विलक्षण आनंद देत गेली ती त्यांच्या  निर्मितीचा छाती दडपून टाकणारा इतिहास, त्यांची अती भव्यता व निसर्गाच्या  वैविधतेमुळे ! सरोवरांच्या भटकंतीची मजा औरच आहे.  […]

ऑपरेशन सनराइज – एक यशस्वी मोहिम

भारतीय सैन्याने तिसरा सर्जिकल स्ट्राइक म्यानमारमध्ये केला ही बातमी १५ मार्चला मीडिया मध्ये दाखल झाली. परंतु देशांमध्ये चाललेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मध्ये मीडियाने या महत्त्वाच्या ऑपरेशनला काहीच महत्त्व दिले नाही. हे ऑपरेशन का महत्वाचे होते? यानंतर ईशान्य भारताला सुरक्षित करण्याकरता आपल्याला अजून काय करावे लागेल या सगळ्यावर  चर्चा गरजेची आहे. […]

हवाई दलाची युद्ध सज्जता – सद्य परिस्थिती आणि उपाययोजना

एका बाजूला भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर तणावाची स्थिती निर्माण होत असताना आपली युद्धसज्जता कायम ठेवणं महत्त्वाचं असतं. अशा स्थितीतून देश जात करताना भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्या अपघातामुळं या घटनेचं गांभीर्य वाढतं. वैमानिकांची व विमानांची सुरक्षा आणि हवाई दलाची युद्धसज्जता हे तिन्ही घटक एकमेकांशी संलग्न आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्या अपघाताचं विश्लेचषण करत असतानाच हवाई दलात सेवा करणाऱ्या सर्वच लढाऊ विमानांच्या अत्याधुनिकीकरणाचाही तितक्याच गांभीर्यानं विचार केला पाहीजे. […]

पाकिस्तानी अर्थव्यवस्था खिळखिळी करा

सध्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. सरकारी पगार भागवण्यासाठी इम्रान खान जगभरातून पैसे जमवून आणत आहे. अमेरिकन आर्थिक सहाय्यता केव्हाच थांबली आहे आणि सिपेक साठी काढलेलं चिनी कर्ज पाकिस्तानच्या गळ्यापर्यंत आलं आहे. अरब देशांनी दिलेलं कर्ज पाकिस्तानला आर्थिक सर्वनाशातून बाहेर काढायला अजिबात उपयोगाचं नाही.  […]

आपली लोकशाही कुठे चाललीय?

आपल्या देशात बहुपक्षीय पद्धतीची संसदीय लोकशाही आहे. गेली ७० वर्ष लोकशाहीचा हा गाडा चाललाय. लोकशाहीत दोन महत्वाचे भाग असतात. एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष. किंबहूना विरोधी पक्षाची भुमिका लोकशाहीत जास्त महत्वाची असते. सत्ता हा विषयच असा आहे की, ती मिळाल्यावर स्खलन होण्याची शक्यता जास्त असते, मग सत्तेवर कुणीही असो. […]

1 47 48 49 50 51 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..