नवीन लेखन...

भारत चीन जल युध्द: सद्द्य परिस्थिती आणि उपाय योजना

Bramhaputra - Indo-China water war

सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि त्यामुळे अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याचप्रमाणे इशान्य भारतासाठी हे वर्ष पाण्याच्या दृष्टीने दुष्काळी समजले जाते. यावर टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण आपल्या देशात दुसर्‍या देशातून येणार्‍या नद्यांच्या पाण्याची होणारी चोरी याबद्दल मीडियामध्ये फ़ारशी चर्चा होत नाही. या लेखाद्वारे चीन ब्रम्हपुत्रेचे भारतात येणारे पाणी कसे पळवायचा प्रयत्न करत आहे याबद्दल चर्चा करू.

ब्रम्हपुत्रा नदीला चीनमध्ये सँगपो यॉरलॉग असे म्हटले जाते. ज्यावेळी ही नदी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते त्यावेळी तिचे नाव सियांग होते. अरुणाचल प्रदेशमधून ही नदी आसामच्या पठारावर येते त्यावेळीस तिचे नाव ब्रम्हपुत्रा असे होते. भारतामधून ही नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते, तिथे तिला मेघना या नावाने ओळखले जाते. ब्रम्हपुत्रा नदीचा उगम तिबेटमध्ये थांगलूंग ग्लेशियर म्हणजे थांगलूंग हिमनदीतून ५,३०० मीटर उंचीवर होतो. त्यानंतर ही नदी १६२५ किलोमीटर अंतर चीनमधून वाहाते आणि ग्रेड बेंड या पर्वताशी वळण घेऊन भारतात प्रवेश करते. त्यानंतर ९१८ किलोमीटरचे अंतर ती भारताच्या अरुणाचल प्रदेश व आसाम या प्रदेशातून वाहते आणि ३३७ किलोमीटरचे अंतर बांगलादेशातून वाहून ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या नदीचे महत्त्व इशान्य भारताकरता आणि बांगलादेशकरता फार मोठे आहे.

तिबेटमध्ये ब्रम्हपुत्रेच्या पाण्याची गरज नाही

“स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप” या थिंक टँकने केलेल्या संशोधनावरून असे जाहीर झालेले आहे की, पुढच्या वीस वर्षामध्ये हिमालयातून वाहणार्या नद्यांमधील पाण्यात २५ टक्के कमतरता येणार आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या आणि हिमकडे हे वितळत आहेत आणि त्यामुळे येणार्या काळात पाण्याचा दुष्काळ वाढत जाणार आहे.

एका पाहणीत असे समोर आले आहे की, ब्रम्हपुत्रा नदीतून भारतात येणार्या पाण्याचे प्रमाण हे १९९९ पासून कमी कमी होत आहे आणि आता ते जवळजवळ १५ ते २० टक्क्यांनी कमी झालेले आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तिबेट हे भारत, बांगलादेश तसेच दक्षिण-पूर्व आशियामध्ये वाहणार्या अनेक नद्यांचे उगमस्थान आहे. तिबेट मध्ये खूप ठिकाणे कायमस्वरूपी बर्फाच्छादीत असल्यामुळे अनेक नद्या येथे उगम पावतात. चीनमध्ये २०३० पर्यंत २५ टक्के पाणी कमी होणार आहे. चीनचा फार मोठा भाग वळवंटी आणि डोंगराळ आहे. यामुळे इथे पाण्याची नेहमीच कमतरता असते. यामुळे चीनने त्यांच्या प्रदेशात वाहणार्या यांगसे या नदीवर जगातील सर्वांत मोठे थ्री गॉर्जेस नावाचे धरण बांधले आहे. त्यानंतर यलो या नदीवरदेखील त्यांनी मोठे धरण बांधले आहे आणि आता चीनमध्ये कोणतीही नदी धरण बांधण्यासाठी शिल्लक राहिलेली नाही व आता चीनमध्ये पाण्याची कमतरता आहे. यामुळे २००२ साला पासून चीनने आपले लक्ष ब्रह्मपुत्रा नदीकडे वळवलेले आहे. तिबेटमध्ये जिथे ब्रम्हपुत्रा नदी उगम पावते तेथील लोकसंख्या फार विरळ आहे. तिबेटची लोकसंख्या २० ते २५ लाखापर्यंत आहे.तिबेटमध्ये शेती करता येत नसल्याने व कारखानेही नसल्यामुळे तिबेटमध्ये असणार्या ब्रम्हपुत्रेच्या पाण्याची गरज तिबेटी जनतेला नाही.

पुढील दहा वर्षांत ४०,००० मेगावॉट वीजनिर्मिती

चीनला असे वाटते की जर ब्रम्हपुत्रेचे पाणी आपण चीनच्या इतर दुष्काळी भागात वळवले तर चीनला याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे ब्रम्हपुत्रा नदीवर चीनने धरणे बांधण्यास सुरूवात केली आहे.
ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्याकरिता जागतीक पातळीवर कोळसा जाळून वीजनिर्मिती करण्यासाठी हळूहळू आता बंदी टाकण्यात येत आहे. त्यामुळे चीनने आता नद्यांवर मोठी धरणे बांधून त्यापासून वीजनिर्मिती करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.याचसाठी त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ब्रम्हपुत्रेवर चार मोठी धरणे बांधलेली आहेत. डागु या जागी बांधलेले धरण ६४० मेगावॉट वीज निर्माण करते, जिक्सू या गावात आणि थांगमू गावामध्ये बांधलेल्या धरणांपासून ५१० मेगावॉट वीज तयार करत आहेत. जिगच्या भांगात बांधलेले धरण हे ३२० मेगावॉट वीज निर्माण करते. ही सगळी धरणे ब्रम्हपुत्रा नदीवर बांधली गेलेली आहेत. पुढील दहा वर्षांत तिबेटमध्ये ४०,००० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे नियोजन चीनने केले आहे.

ब्रम्हा चे्लानी यांचा ‘कमींग वॉटरवॉर्स, पुस्तकातुन इशारा

ग्रेट बेंड या पर्वतापाशी वळण घेऊन ब्रम्हपुत्रा नदी भारतात प्रवेश करते. मिळालेल्या माहितीवरून ग्रेट बेंडवर चीन जगातील सर्वांत मोठे धरण बांधण्याच्या प्रयत्नांत आहे, कारण ही जागा धरण बांधण्याकरिता अतिशय उत्कृष्ट आहे. चीनमधील झांगमू हे धरण भारतीय सीमेपासून केवळ २०० किलोमीटर दूर आहे. तसेच ब्रम्हपुत्रानदीवर पुढील दहा वर्षांत आजून २८ धरणे बांधण्याचे चीनचे नियोजन आहे. याबाबत चीन जगाला सांगत आहे की, हे जे पाणी अडवले जात आहे ते वीज निर्मितीसाठी तात्पुरते अडवण्यात येत आहे आणि वीज निर्मितीनंतर ते पुन्हा ब्रम्हपुत्रेच्या पात्रात सोडण्यात येईल. त्यामुळे ब्रम्हपुत्रेच्या पात्रात येणार्या पाण्यात कमतरता येणार नाही. पण हे अर्थातच खोटे आहे. ब्रम्हा चे्लानी या भारतीय तज्ज्ञाने अशी धरणे बांधली गेली तर भारताचे किती मोठे नुकसान होईल या विषयावर भारताचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रम्हा चे्लानी यांचे ‘कमींग वॉटरवॉर्स, बिवेअर द फ्युचर या पुस्तकाचा अभ्यास भारत सरकार करत असावे अशी आशा आहे. अनेक पश्चिमी तज्ज्ञांनी लिहिलेल्या लेखांवरून धक्कादायक बातमी पुढे येते. चीनला अतिप्रचंड प्रकल्प उभारायची सवय आहे. चीनने बांधलेले यांगसीकॅग नदीवर बांधलेले थ्री गॉर्जेस धरण हे जगामध्ये असलेल्या धरणापेक्षा चारपट मोठे आहे. अनेक भारतीय तज्ज्ञ हे सांगायचा प्रयत्न करतात की ब्रम्हपुत्रेवर गे्रड बेंड सारखे किंवा त्याहुन ही मोठे प्रकल्प चीन उभारू शकतो.

चीनला अतिप्रचंड प्रकल्प करण्याची सवय

हे धरण बांधल्यानंतर या धरणाचे पाणी यांगसीकॅग आणि यलो नदीच्या पात्रात सोडता येईल का? तज्ज्ञांच्या म्हणण्या प्रमाणे हे पाणी कमीत कमी २०० मीटर वर उचलून खाली सोडावे लागेल. त्यानंतरच ते कालव्यांच्या माध्यमातून या दोन नद्यांच्या प्रवाहात नेण्यात येऊ शकते. यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च येईल जो कालवे बांधण्यासाठी असेल. काही तज्ज्ञांच्या मते २०० मीटर पाणी वर चढवणे इतके सोपे नाही. कारण त्याकरिता प्रचंड वीज निर्मिती करावी लागेल आणि यासाठीच चीन ब्रम्हपुत्रेवर धरणे बांधून ४०,००० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहे. या विजेचा वापर हे पाणी वर उचलण्यासाठी केला जाणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर तिबेट मधे वीज निर्मिती करण्याची काहीही गरज नाही कारण तिबेटमधील लोकसंख्या अतिशय विरळ आहे.

काही तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की चीन एवढे पाणी वर उचलण्यापेक्षा डोंगरात बोगदा तयार करून त्यांच्या दुष्काळी भागात पाणी घेऊन जाऊ शकतो. यासाठी ३० ते ४० किलोमीटर इतका लांब बोगदा त्यांना तयार करावा लागेल.जगात आजून इतका मोठा बोगदा निर्माण झालेला नाही. पण चीनला असे अतिप्रचंड प्रकल्प करण्याची सवय आहे. म्हणूनच भारताने या सर्व हालचालींवरती सॅटेलाईटद्वारे लक्ष ठेवायला हवे. अन्यथा चीन आपल्याला गाफील ठेवून मोठे धरण बांधून मोकळाही होईल.

पाण्याच्या लढाईकरता दक्षिण पूर्व आशियामधील देशांची मोट बनवा

जसे भारताचे पाणी चीन पळवत आहे तसेच व्हिएटनाम आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांचेही पाणी चीन पळवण्याच्या प्रयत्नात आहे. चीनविरुद्ध जर पाण्याकरता लढाई झाली तर आपल्याला व्हिएटनाम आणि दक्षिण पूर्व आशियामधील इतर देशांची एक मोट बांधून या लढाईची तयारी केली पाहिजे. आपल्या शास्त्रज्ञांनी विचार केला पाहिजे की, जर ब्रम्हपुत्रेचे पाणी कमी झाले तर ईशान्य भारतात आणि आसाममध्ये पाण्याचा दुष्काळ पडू नये म्हणून आपण काय करू शकतो. ब्रम्हपुत्रा नदीला भारतात उगम पावलेल्या अनेक नद्या म्हणजे सीयोम, सुबानसीरी, लोहित, सरली आणि हुरी या नद्या आसामच्या पठारावर मिळतात. या नद्या सुद्धा आपल्याबरोबर पुष्कळ पाणी वाहून आणतात आणि ब्रम्हपुत्रा नदीत सोडतात. आपण खबरदारी म्हणून या नद्यांचे पाणी अडवण्याचे प्रकल्प आतापासूनच सुरू केले पाहिजेत. कारण कुठल्याही नदीवर धरणे बांधणे याला दहा ते पंधरा वर्षे इतका काळ लागू शकतो.

भारतातील चीनी प्रेमी तज्ज्ञ

भारतातील चीनी प्रेमी तज्ज्ञांना असे वाटते की आपण उगीचच या विषयाचा बाऊ करत आहोत. चीनला हे सगळे करण्याची गरज नाही. कारण त्यांना याशिवाय पाण्याचे अनेक स्त्रोत मिळू शकतील. चीनला भारताविषयी पुष्कळ राग आहे. कारण अशीया खंडामधे केवळ भारतच त्यांचा प्रतिस्पर्धी बनु शकतो.चीनला असे वाटते की भारताने फक्त भारतखंडातच अडकून राहावे आणि त्याकरिता चीन पाकिस्तानला आपला प्रतिस्पर्धी म्हणुन तयार करत आहे. ज्यावेळी भारतीय आपापसात भांडण्यात गुंतलेले असतात ,भारतीय संसदेत काहीच काम होत नाही, त्यामुळे भारताची आर्थिक प्रगती होत नाही, त्यावेळी चीनला नक्कीच आनंद होतो.

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वेग चीनपेक्षा जास्त वाढला

पण गेल्या वर्ष-दीड वर्षात आपल्या देशात लोकशाहीच्या नावाने चालणारा गोंधळ सुरू असूनसुद्धा आपण या वर्षी आपल्या देशामध्ये जगातिल सर्वांत जास्त थेट विदेशी गुंतवणूक आणू शकलेलो आहोत. याशिवाय भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वेग चीनपेक्षा जास्त वाढलेला आहे. यामुळे अर्थातच चीनला दुःख होत आहे. चीनचे पंतप्रधान झि जिंग पिंग जेव्हा पाकिस्तान भेटीला गेले होते तेंव्हा त्यांनी ४६ बिलियन डॉलर्स इतका मोठा इकॉनॉमिक कॉरिडॉर हा ग्वाडारपासून चीनपर्यंत निर्माण करण्याचे ठरवले आहे. पण हा काराकोरम रस्ता हा वर्षातील सहा महिने बंद असतो. सध्या नेपाळमध्ये चाललेल्या गडबडीमुळे नेपाळला चीनकडून पेट्रोलियम पदार्थ आणण्याची गरज आहे आणि यासाठीही चीनला फार मोठा प्रयत्न करावा लागेल. म्हणूनच भारताला काही ना काही त्रास द्यायचा म्हणूनच एखाद्या वेळी ब्रम्हपुत्रेचे पाणी वळवण्याचा मोठा प्रकल्प चीन हाती घेऊ शकतो. जर हे धरण बांधले गेले तर भारतात येणारे पाणी पावसाळ्याच्या काळात ३० टक्क्यांनी घटू शकते आणि उन्हाळ्यात ते ६० टक्क्यांपर्यंत घटू शकते.

वीसाव्या शतकामधील युद्ध हे जमिनीकरिता झाली, २१ शतकातील युद्धे ही तेलासाठी झाली आणि २२ व्या शतकातील युद्ध ही पाण्याकरिता होतील. म्हणूनच भारताने तयार राहिले पाहिजे. जर आपण सावध/ दक्ष असु तरच चीनने ब्रम्हपुत्रेचे पाणी वेगळ्या ठिकाणी वळवायच्या आतच आपण त्याच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय मत तयार करू शकतो. पण त्याकरिता आपल्याला जागरू्क राहण्याची गरज आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..