नवीन लेखन...

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर

महामहोपाध्याय द. वा. पोतदार यांनी सावरकर यांचा  उल्लेख “खरा इतिहास संशोधक” असा केला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य समराला ब्रिटिशांनी सोईस्करपणे शिपायांच बंड असे संबोधून टाकले होते. व आजही शाळेतून तोच इतिहास शिकवला जातो. पण सावरकर इंग्लंडला गेल्यावर त्यांनी या विषयावर संशोधन करायचे ठरवले. त्यांनी के निमेलीस यांचा “सिपॉय म्युनिटी 1875” ह्या ग्रंथाच्या सहाही खंडाचा अभ्यास केला. त्यांना संदर्भ शोधायचे होते. “इंडिया ऑफिस “ ह्या सरकारी कार्यालयातले एक संबंध दालन १८५७ च्या ग्रंथ व फाइल्स यांनी भरलेले होते. सुदैवाने सावरकरांना याचा अभ्यास करायची परवानगी मिळाली. तिथे तासतास बसून महत्वाची टिपणे काढली. ते पाहून त्या ग्रंथपालला आश्चर्य वाटले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी गुप्त कागदपत्रेसुद्धा सावरकरना अभ्यासायला दिली. याचा उल्लेख त्यांनी “शत्रूच्या शिबिरात “ आत्मचरित्रात केला आहे. आणि त्यांनी १८५७ चे बंड नव्हते तर स्वातंत्र्य समर होते हे  सिद्ध केले.

ह्या ग्रंथाची दाहकता ब्रिटिश सरकारला समजली. ह्या पुस्तकाचा भारतात प्रसार झाला, तर अनर्थ होईल म्हणून त्यांनी या पुस्तकावर बंदी आणली. तरीही ते गुप्तपणे छापले गेले. लाला हरदयाल, भगतसिंग, सुभाषबाबू यांनी त्याच्या भारतीय भाषात आवृत्त्या गुप्तपणे  काढल्या. मॅडम कामा यांनी फ्रेंच तर सुभाषबाबू यांनी जर्मनीत काढली.

— रवींद्र वाळिंबे.

संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई)

 

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..