नवीन लेखन...

आयुर्वेदाचे ‘नोबेल’ कनेक्शन

 

रोसबाश, यंग, हॉल या तीन शास्त्रज्ञांना यावेळचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचा संशोधनाचा विषय होता; जैविक घड्याळ म्हणजेच biological clock. आपल्या शरीरातील सर्व क्रिया/ चयापचय होण्यामागे एक नैसर्गिक घड्याळ कार्य करत असते; ही मूलतः आयुर्वेदीय ग्रंथांत आलेली संकल्पना आहे.

‘वयSहोरात्रीभुक्तानां ते अन्तमध्यादिग: क्रमात्।’ हे या संकल्पनेचे मूळ सूत्र. शरीरातील त्रिदोष हे दिवस रात्र यांचा विचार करता खालीलप्रमाणे अधिक अंशी कार्यरत असतात;

६- १०  : कफ दोष
१०- २  : पित्त दोष
२-६     : वात दोष

थोड्क्यात या काळात त्या त्या दोषांशी संबंधित कार्य केल्यास त्यांचे परिणाम उत्तम दिसून येतात. उदाहरणार्थ; रात्री २ ते सकाळी ६ हा वाताचा काळ असल्याने या काळात उठून आन्हिके उरकण्यास आयुर्वेद सुचवतो. ब्राह्ममुहूर्तावर उठावे असे आयुर्वेदाचे मत आहे. हा मुहूर्त सूर्योदय होण्याआधी सुमारे ९७ मिनिटे असतो. सकाळी ६ ही भारतातील सूर्योदयाची सरासरी वेळ लक्षात घेता; पहाटे ४-४.३० वाजता उठणे आयुर्वेदाला अपेक्षित आहे. वाताचे प्राबल्य या काळात असल्याने शौचविधीला अडथळा निर्माण होत नाही. सकाळी ६ नंतर म्हणजेच कफाच्या काळात उठणाऱ्या व्यक्तींना मात्र या कालावधीच्या तुलनेत निश्चितपणे फरक जाणवतो. हे झाले सहज पडताळून येण्याजोगे उदाहरण. अशीच कित्येक उदाहरणे देता येतील. आणखी एक उदाहरण बघूया; वाताच्या काळात प्राण या वायूचे कार्य महत्वाचे असल्याने या काळात पाठांतर उत्तम होते. शिवाय हा प्राण शरीर सोडून बाहेर पडताना बऱ्याचदा हाच काळ निवडतो. अपघात होवून ICU मध्ये वगैरे दाखल झालेल्या बहुतांशी रुग्णांचे मृत्यू हे याच कालावधीत होतात. आपल्या परिचयाचीही अशी कित्येक उदाहरणे असतील. आयुर्वेदानुसार प्रसूती हे अपान या वायूचे कार्य आहे. अपान वायूचे कार्यही या काळात विशेषत्वाने होत असल्याने महिलांची; विशेषतः पहिलटकरणीची प्रसूती याच काळात होण्याचे प्रमाण लक्षणीय असते. हे आपल्या पूर्वजांनी अभ्यासलेले जैविक घड्याळच नव्हे काय?

वरील सूत्रानुसार त्रिदोष हे केवळ दिवसाच्या वेळानुसारच नव्हेत तर भोजन आणि वय यांच्याशीही संबंधित असतात असे आयुर्वेद सांगतो. उदा. जेवल्यावर सर्वप्रथम कफ मग पित्त व अखेरीस वात दोष विशेषतः कार्यरत असतो. वयाचा विचार करता लहानपणी कफदोष प्राधान्याने असल्याने शरीराची वाढ होणे, मजबुती निर्माण होणे अशी त्या दोषाची कार्ये होतात. तरुणाईचं ‘सळसळतं रक्त’ हे पित्ताच्या प्राधान्यामुळे तर म्हातारपणीची शरीराची झीज ही वाताच्या प्रभावामुळे होत असते. ही किती महत्वाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अभ्यासली आहे पहा.

आचार्य वाग्भट यांच्या वरील मूळ सूत्रातील वेळ व जैविक घड्याळ संबंधाचे संशोधनांती हाती आलेले रूप म्हणजे नोबेल पुरस्कारप्राप्त ‘molecular mechanism controlling circadian rhythm’ हा शोधनिबंध होय. कदाचित संशोधन करणाऱ्या या शास्त्रज्ञांना ही मूलतः आयुर्वेदीय संकल्पना आहे हे माहितीदेखील नसेल. अर्थात नुसती संकल्पना असून उपयोगाची नाही; अथक परिश्रम करून ती सिद्ध करून दाखवणे ही काळाची गरज आहे. वरील वाग्भट सूत्रातील वय आणि भोजन यांचा जैविक घड्याळाशी संबंध लावण्यास व सिद्ध करण्यास आयुर्वेदीय संशोधक प्रयत्न करतील का? तूर्त या नोबेल विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!

– वैद्य परीक्षित शेवडे; एम डी (आयु)
०२५१- २८६३८३५ 

Dr. Pareexit S. Shevde.

M.D. (Ayu.)


Infertility and Sexual disorders specialist. 

 
‘Shree Vyankatesh Aayurved’
Domblivli.
  

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..