नवीन लेखन...

अभिनेता सिद्धार्थ जाधव याची स्वाक्षरी

अभिनेता सिद्धार्थ रामचंद्र जाधव याचा जन्म २३ ऑक्टोबर १९८१  रोजी झाला.

सिद्धार्थचे शालेय शिक्षण सरस्वती विद्यालय , नायगाव , भोईवाडा येथे झाले तर तो मुंबईच्या रुपारेल कॉलेजमध्ये जात होता. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक एकांकिकेमधून कामे केली. सिद्धार्थने आज जे यश मिळवले आहे ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे कारण अभिनय आणि लोकांचे प्रेम या जोरावर तो उभा आहे.

माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याचे खरे असणे किती म्हणवाचे असते हे सिद्धार्थच्या यशावरून आणि त्याच्या माणूसपणावरून दिसून येते. सिदार्थ जाधव याला खरा हात दिला तो केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे ‘ या नाटकाने. अभिनेते संजय नार्वेकर यांना सिद्धार्थ खूप मानतो. केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे …’ या नाटकांनंतर खऱ्या अर्थाने त्याला ब्रेक मिळाला असे म्हणता येईल. सिद्धार्थ जाधव यांची पत्नी तृप्ती जाधव यांचाही त्याच्या आयुष्यात महत्वाचा वाटा आहे असे तो नेहमी म्हणतो. सिदार्थ जाधव यांच्या आयुष्यात खरा टर्निग पॉईंट ज्या चित्रपटाने दिला तो ‘ दे धक्का ‘ या चित्रपटाने. पाहिलं तर या चित्रपटात कुणीच नायक नाही किंवा नायिकाही नाही तर परिस्थिती आणि त्याभोवती असलेली पात्रे, त्याच्यामध्ये घडणारे विनोद , कारुण्य, आणि जबरदस्त महत्वाकांक्षा हे वातावरणच महत्वाचे होते. सामान्य प्रेक्षकापासून अगदी साठीनंतरच्या माणसांनादेखील हा चित्रपट अजूनही आवडतो कारण सगळ्यांना त्यांचे कथानक आपलेसे वाटते , घरातले वाटते . आणि अशाच पद्धतीने सिदार्थ आपल्या अभिनयाच्या रूपाने जो सगळ्याच्या घरात आणि मानत शिरला तो कायमचा. ‘ रझाकार’ हा सिदार्थाचा एक वेगळा चित्रपट होता , किंवा ‘ मी शिवाजी राजे भोसले बोलतोय ‘ ह्या चित्रपटातील उस्मान परकारचे काम अत्यंत वेगळे होते आणि ते अनेकांना आवडले देखील.

सिदार्थ जाधव याला अनेक एकांकिकातून पाहिले होते. मला आठवतंय एका एकांकिकेत त्याला स्टेजवर प्रचंड जलद हालचाली कराव्या लागत होत्या. मी विगमधून पहात होतो त्याच्या घशाला कोरड पडायची , त्याच्यासाठी विगमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवलेल्या होत्या. जलद हालचाली , उड्या मारणे ह्यामुळे त्याला सतत तहान लागायची. भूमिका करताना तो अक्षरशः झोकून देऊन भूमिका करतो ,कधीकधी त्याला जखमाही होतात त्याची तो पर्वा करत नाही.

सिद्धार्थ जाधव याने ‘ जागो मोहन प्यारे ‘ ह्या नाटकात केलेले काम आजही अनेकांना आठवते आहे. ‘ जागो मोहन प्यारे ‘ चे त्याने सुमारे ८५० प्रयोग केले . ह्या नाटकालाही प्रेषकांनीही उचलून धरले. सिदार्थ जाधव याने हिंदी रियालिटी शो मध्ये पदार्पण केले हे त्याचे महत्वाचे पाऊल आहे. कारण तो म्हणतो की हा शो करताना माझ्यावर कितीही विनोद झाले तरी चालतील परंतु तो मराठी रंगभूमीवर होणारे विनोद किंवा जी टिगल केली जाते ती तो कधीच खपवून घेत नाही. या अशा शोज मुले त्याला जगभर चाहते मिळाले , अमराठी भाषिकदेखील जे परदेशात वास्तव्य करतात ते देखील त्यांचे चित्रपट बघू लागले. माझा एक कलकत्याच्या मित्र आहे त्याने माझ्याकडे सिदार्थंची स्वाक्षरी मागितली , माझ्याकडे त्याच्या काही स्वाक्षऱ्या होत्या त्यातली एक पाठवली.

सिद्धार्थने हिंदी मराठी वाहिन्यांवर अनेक स्पर्धातून भाग घेतला आहे आणि अजूनही घेत आहे . त्यामुळे त्याचा अभिनय , त्याचे नाव नॅशनल स्तरावर आणि पर्यायाने इंटरनॅशनल स्तरावर जात आहे हे महत्वाचे. स्वस्थ बसणे त्याच्या स्वभावातच नाही. ‘ जत्रा ‘ चित्रपटात त्याने आणि भरत जाधव यांनी जी धमाल उडवली आहे त्यास तोड नाही. एक पाहिले तर सिद्धार्थ जाधवच्या भूमिका सामान्य माणसाचे मन खऱ्या अर्थाने रिफ्रेश करतात . सामान्य माणूस जो सतत आपल्या विचनेत असतो त्याला थोडा त्याच्या विवंचना विसरायला लावतो ही साधी गोष्ट नाही. सिद्धार्थने गंभीर भूमिकाही केल्या कारण त्याच्यात ती क्षमता आहे. पण आज प्रेक्षकात गंभीर चित्रपट बघण्याची क्षमता आहे का याचा शोध घेतला पाहिजे. त्याची अनेक कारणे आहेत सतत स्ट्रेसचे प्रमाण वाढत आहे , त्यामुळे हास्य क्लबचे प्रमाणही वाढत आहे , माणूस हसणे विसरेल की काय असा कालखंड आ वासून उभा असताना सिद्धार्थ जाधव सारखा विनोदी अभिनेता खळखळून हसवत आहे हे महत्वाचे. म्ह्णूनच त्याला फुटपट्या लावणे कितपत योग्य आहे हा प्रश्न व्यक्तीसापेक्ष आहे असेच म्हणावे लागेल. सिद्धार्थ जाधव याचे हेच म्हणणे आहे माझ्या कामातून लोकांना आनंद मिळतो हे महत्वाचे .

आज एका रियालिटी शोसाठी तो आणि त्याची पत्नी तृप्ती कसून मेहनत करत होते. म्हणजे त्याला कुठल्याही सुयोग्य माध्यमाचे , संधीचे वावडे बाही. , ह्याचा असाच अर्थ आहे त्याला सतत नवीन , चांगले करायचे आहे ,तो सतत काहीतरी वेगळे करत आहे. व्यसनापासून तो चार हात दूरच आहे हे फार महत्वाचे आहे , सतत काम करत असताना आपल्या घरच्यांसाठी वेळ देणे महत्वाचे असते ते तो करत आहे .

आज सिद्धार्थ जाधवने आपले स्थान कठोर परिश्रमाने मिळवले आहे आणि ते तो टिकवून आहे . सिद्धार्थ जाधव याने खो-खो , कुटूंब , टाईम प्लिज, फक्त लढा म्हणा , गोलमाल रिटर्न्स , गोलमाल फन अनलिमिटेड , बकुळा नामदेव घोटाळे , हुप्पा हुर्या , त्याचप्रमाणे आउटसोर्स या इंग्रजी चित्रपटात काम केले आहे. सध्या त्याचे ‘ गेला उडत ‘ हे नाटक चालू आहे. सिद्धार्थचे रंगभूमीवर विलक्षण प्रेम आहे , आणि रंगभूमीविषयी त्याच्या मनात आस्था आहे. त्याच्या मनात एकच इच्छा आहे की त्याच्या नाटकाचे एक हजार प्रयोग झाले पाहिजेत. त्याच्याशी बोलून मेकअप रूमच्या मी बाहेर आलो , नाटक संपलेले होते , सेट्स काढत होते अचानक तो रिकाम्या सेटवर गेला , नमस्कार करून घरी जायला निघाला. तेव्हाच कळले की सिद्धार्थ जाधव हा मोठा कलाकार आहेच परंतु त्याचे पाय आजशी जमिनीवर आहेत.

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 37 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..