नवीन लेखन...

स्टेट बँक माझी सखी

स्टेट बँकेत नोकरीला लागण्याआधी मी, सात वर्ष अनेक प्राईव्हेट नोकऱ्या केल्या. पण या काळातच आपण स्टेट बँकेतच नोकरीला लागायचे हे माझे ठरलेले होते. याला दोन कारणे होती एकतर माझा एस.के. नावाचा एक चुलत भाऊ स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेत नोकरीला होता, मी अनेकवेळा त्याला भेटायला स्टेट बँकेत जायचो आणि ही स्टेट बँक मला तेंव्हापासूनच आवडली होती. […]

मी बँकेमुळे घडलो

मी 80 च्या दशकामध्ये बँकेची परीक्षा दिली. 78 साली कला शाखेची पदवी उत्तीर्ण झालो आणि लगेचच दोन-तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेची परीक्षा द्यायचं ठरवलं. तेव्हा सर्वसामान्य व्यक्तीपुढे जे करिअरचे थोडेसे पर्याय उपलब्ध होते, त्यापैकी एकतर डॉक्टर किंवा इंजिनीयर किंवा एखादी सरकारी नोकरी! तशी माझी शिक्षणातील गती ही एव्हरेज असल्यामुळे मी आणि माझ्या काही मित्रांनी बँकेची परीक्षा देताना मुंबई केंद्र न निवडता लांबचं नाशिक केंद्र निवडलं. […]

प्रवासाला निघताना

पूर्वीच्या काळी प्रवास म्हणजे केवळ कामापुरता केला जायचा. पायी अथवा बैलगाडीने एका जागेतून दुसऱ्या जागी जाणं एवढंच होतं. मजल दरमजल केलेल्या या प्रवासात एक वळकटी, तांब्या, घोंगडी आणि सोबतीला बहु उपयोगी असा सोटा. प्रवास फक्त दिवसा करायचा आणि संध्याकाळी एखाद्या धर्मशाळेत किंवा देवळाबाहेर मुक्काम. तीर्थक्षेत्राला जाणं हा जीवनातला मोठा आणि किंबहुना शेवटचा आणि लांबचा प्रवास. […]

हसू आणि आसू

1978 साल, बँकेच्या काऊंटरवर एक नेहमी येणारा खातेदार येऊन उभा राहिला. त्यावेळी भारत-पाकिस्तान कसोटी मालिका सुरू होती. काउंटरवरील क्लार्क ट्रांझिस्टरवर कॉमेंट्री ऐकत होता. […]

सावरकर सदन आणि अहेवपण

सदनात आता आम्ही रूळू लागलो. इथूनच स्वारींनी हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून आपल्या ध्येयाच्या प्रचारार्थ हिंदुस्थानभर झंझावती दौरे काढले. प्रचार दौऱ्यासाठी जेव्हा भारतभर गरुडभरारी संचार व्हायचा तेव्हा, परत आल्यावर त्या दौऱ्यातील गोड अनुभव, लोकांशी बोलणं होत असताना मला ऐकायला मिळत. अगदी क्वचित मलाही सांगणं होत असे प्रत्येक गोष्ट मला कळावी अशी अपेक्षा मात्र मी कधीच केली नाही. आताही स्वातंत्र्यासाठी चाललेले स्वारींचे ते कष्ट पाहिले की मला अगदी गुदमरायला व्हायचं. […]

मेडिकल टुरिझम-वेलनेस टुरिझम

आरोग्य व आरोग्यसेवेचा हक्क हा मानवाचा जन्मजात अधिकार म्हणता येईल. जगण्याचा – नागरिकत्वाच्या अधिकाराबरोबर आरोग्यदायी वातावरण व पुरेशी – नियमित आरोग्य सेवा आवश्यक असते. […]

हास्यबँक (बँकेतील गंमती-जमती)

मी एकदा ठाणे पश्चिम शाखेच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत असताना एक विनोदी प्रसंग घडलेला आज ही आठवतो. तेव्हा टोकन नंबर दर्शवणारा बोर्ड बँकेत नव्हता. बहुदा कॅशियर टोकनचा किंवा नावाचा पुकारा करीत. तेव्हा आमच्याकडे डेक्कन लॉजचे खाते होते. बहुतेक ते लोक एक दिवसाआड पैसे काढायला येत. […]

कसोटी रक्कम हाताळणीची

बँकांमधील सर्व कार्यपद्धतीचा अनुभव घेण्याचे भाग्य मला लाभले ते 1984 साली जेव्हा मला  पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळाली तेव्हा. त्याकाळी क्लार्क-कम-टायपिस्ट आणि क्लर्क-कम-कॅशियर अशी वेगवेगळी पदे भरली जायची. कॅशियरचे काम करतांना विशेष भत्ता दिला जातो. मी टायपिस्टचे काम करत असताना रोखपालाचे काम करण्याची वेळ फारशी आली नाही, […]

लंडनचा पासपोर्ट

माणसांना काही तरी छंद असतोच. काहींना क्रिकेट बघण्याचा छंद असतो, काहींना सिनेमा बघण्याचा, नाटकाचा, काहींना लिखाणाचा तर वाचनाचा छंद असतो. काहींना टीव्ही बघण्याचा तर काहींना तासन् तास मोबाईलवर खेळण्याचा छंद असतो. मला देखिल वाचण्याचा व लिहिण्याचा छंद आहे. तसेच माझे पती ‘टॉनिक’ अंकाचे संपादक मानकरकाका यांना भारतातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा खूप छंद होता. […]

पैसा महात्म्य

‘गिरिजाकाकू! शरदची बिल्कुल चिंता करू नका! धन, कनक,  सुलक्षणी कांता नि अखंड लक्ष्मी भरभरून वाहणारी शुभयोगाची पत्रिका आहे त्याची…’ भविष्यवेत्ते दामले गुरूजी आईला सांगत होते… […]

1 16 17 18 19 20 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..