नवीन लेखन...
विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

अकल्पित (भाग – 1)

मलबार हिलच्या नारायण दाभोळकर रोडवरच्या श्रीमंत वस्तीत ही वीस मजली इमारत. या इमारतीच्या विसाव्या मजल्यावरील पाचहजार चौरस फुटाचा हा अलिशान टेरेस फ्लॅट माझ्या मालकीचा आहे. मी आज एक तीस वर्षांचा तरुण उद्योजक आहे. संपूर्ण देशभर माझ्या उद्योगाचे जाळे पसरले आहे. हे सर्व वैभव मी माझ्या हुशारीने कमावले आहे. अर्थात माझ्या आईचा फार मोठा सहभाग आहे. नव्हे, […]

क्रोधः पापस्य कारणम् (कथा)

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू आहेत. त्यांच्या पासून सावध असावे असे नीती तत्त्व सांगते. पण प्रत्येक गुन्ह्यामागे ते दडलेले असतात. चांगल्या भल्या माणसांनाही ते कधी आणि कसे गाठतील सांगता येत नाही. म्हणूनच म्हटले आहे, ‘क्रोधः पापस्य कारणम्।’ […]

दौलतजादा (रहस्यकथा)

प्रवीण देसाई. इंपोर्ट – एक्सपोर्ट व्यापारी. नुसताच व्यापारी नव्हे तर त्या व्यवसायातला बादशहा. आता बादशहा म्हटला म्हणजे धनदौलत मजबूतच असणार हो. तसा पैसा बक्कळ होता. अगदी ऐषआरामात लोळतच होता तो! तर अशी दौलतजादा झाली म्हणजे काही लोकांना ती सत्कार्याला लावावी, गोरगरिबांना दानधर्म करावा, शैक्षणिक संस्थांना मदत करावी, विधायक कामाला लावावी असे वाटते. पण असं वाटणारे फार थोडे असतात. बहुतेक वेळा लक्ष्मी आली की सद् विचार आणि सरस्वती पळ काढतात. सरस्वती आणि लक्ष्मीचे पटत नाही म्हणतात. फार पुण्याई लागते तेव्हाच त्यांचे पटते. […]

रस्ता

कुठे जातो हा रस्ता कुठेच नाही इथेच पडून असतो नुसता ! कुठे नेतो हा रस्ता कुठेच नाही जागचा हलतही नाही नुसता ! अजबच म्हणायचा हा रस्ता भुईला म्हणायचा भार नुसता ! रस्ता कुठे जात नसतो रस्ता कुठे नेत नसतो रस्ता जागच्या जागीच असतो प्रवासी मात्र चालत असतो रस्ता जरी स्वस्थ असतो तरी त्याला शेवट असतो प्रवाशाने चालायचे असते रस्त्यारस्त्याची […]

कोटि कोटि ब्रम्हांडनायका

कोटि कोटि ब्रम्हांडनायका तूच जगाचा पालनकर्ता तूच विधाता रक्षणकर्ता श्री स्वामी समर्था गजानना … १ तू भयहारक तू भवतारक तूच आमुचा एक भरोसा तूच स्वामी तू एक  नियंता श्री स्वामी समर्था गजानना … २ तू ज्ञानदेव तू अवतारी चराचरामधी तू अविनाशी तूच सखा तू भाग्यविधाता श्री स्वामी समर्था गजानना … ३ मुक्ती देशी तू या भवपाशा अनंत तू फुलविशी आशा भक्ति मुक्तीच्या […]

श्री स्वामी समर्थ

पूजन चिंतन चरणी माथा गजानना श्री स्वामी समर्था गजानना श्री स्वामी समर्था तारिल भवसागर गाथा गजानना श्री स्वामी समर्था दीन हिनांचा एकच त्राता गजानना श्री स्वामी समर्था करिशी कृपाळू दृष्टी भक्ता गजानना श्री स्वामी समर्था चराचराचा पालनकर्ता गजानना श्री स्वामी समर्था भक्तिचा तू खराखुरा भोक्ता गजानना श्री स्वामी समर्था चिंता नच पाठिशी तू असता गजानना श्री स्वामी समर्था घेऊया नाम […]

वास्तुकलेचा जनक ग्रीस

जुन्या काळच्या पौर्वात्य आशियाई आणि पाश्चिमात्य युरोपीय जगाच्या मध्यावर ग्रीस हा देश येतो. या भौगोलिक स्थानामुळेत्याला अनन्यसाधारण व्यापारी महत्त्व होते. ग्रीसने जगात अनेक अनमोल देणग्या दिल्या त्यापैकी एक म्हणजे वास्तुकला. प्राचीन ग्रीक संस्कृतीचा रसायनात रुजून आजची पाश्चिमात्य संस्कृती घडली. […]

जरा विचार करा

पण ही खरंच हसण्यासारखी गोष्ट आहे का? इतक्या लहान मुलाने हा अविचार का केला असावा याचा विचार करण्याची आवश्यकता आहे असे नाही वाटत? कोणत्या परिस्थितीमुळे हा मुलगा गुन्हेगारी विचाराकडे वळला? […]

1 7 8 9 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..