नवीन लेखन...
विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

हौस – Part 3

कामिनीच्या रखवालदाराने दरवाजा उघडला. मी घाबरत घाबरत त्याच्याकडे बघितले. बायको एकदम रुबाबात शिरली, रखवालदार जणू तिच्या दृष्टीने एखादे झुरळच! मी गुपचूप त्या भव्य आणि पॉश दुकानात, केविलवाणे पणाने इकडे तिकडे पांढरे कापड शोधीत होतो. सौ. ने आपला मोर्चा भरजरी साड्यांच्या काऊंटरकडे वळवला! मी घाबरत घाबरत म्हणालो, “अग, आपल्याला पांढरं कापड घ्यायचंय ना?” “गप्प बसा हो! तुम्ही […]

हौस – Part 2

घरी आल्यावर बायकोने कपाळावर हात मारला! “अहो, या दोन किलो जिलब्या मी काय माझ्या डोक्यावर थापून घेऊ का? जा, जा, परत करा त्या मी दोनशे ग्रॅम सांगितल्या तर दोन किलो घेऊन आलात? खाणारे आपण तिघं त्यात मला डायबेटीस. तुम्ही एखादा तुकडा खाणार, मग याचं काय करायचं?’ “अग, असू दे आता. मी मुद्दामच आणल्यात जास्त. तुला हव्या […]

हौस – Part 1

संध्याकाळची वेळ, बाहेर अंधारून आलेले. जोरात पाऊस पडेल अशी हवा. अशावेळी मला काम करायला खूप आवडते. उद्या कॉलेजमध्ये द्यायच्या लेक्चरची तयार करत होतो. बशी भरून चिवडा आणि चहाचा मग भरून ठेवून, आमची ही बाहेर गेली होती. चिरंजीव राहूल ऑफिसमधून यायला अजून दोन एक तासांचा वेळ होता. त्यामुळे तास दोन तास निवांतपणे मला माझ्या भाषणाची तयारी करता […]

संधीचं सोन! – Part 3

‘अग, पण हे चांगलं आहे का? मतदानासाठी लाच? छे, छे, मला नाही पटत.’ ‘अहो, आपण काही फुकट नाही घ्यायचं, पैसे देऊ त्यांना. आपल्याकडे मनुष्यबळ नव्हते म्हणून तर आपण घरच्याघरी करणार होतो ना? मग त्यांना संधी द्यायची तशी आपणही थोडी संधी साधली तर का बिघडलं?’ ‘चल, तूम्हणतेस तर घेऊ संधी. पण काही ओळख ना पाळख, काही घोटाळा […]

संधीचं सोन! – Part 2

‘आई, सांगा काय काय कामं आहेत? किती वाजता आहे साखरपुडा? कोणता हॉल घेतला आहे? मला एकदा सगळं सांगा, मग तुम्ही फक्त इथं खुर्चीवर बसून ऑर्डर सोडायची.बाकी सगळं मी बघतो.काय? आलं का लक्षात?’ बाळा. ‘अहो बाळाभाऊ, कसला हॉल? अहो या हॉलमधेच होणार आहे साखरपुडा. अगदी साधा घरगुती मामला आहे. आमच्या घरची माणसं आणि व्याह्यांची घरची माणसं, बस […]

संधीचं सोन! – Part 1

गोविंदरावांनी तायडीच्या साखरपुड्याच्या कामांच्या यादीवरून अखेरची दृष्टी फिरवली. पायात चपला सरकावल्या आणि आत राधाक्कांना म्हणजे त्यांच्या पत्नीला आवाज दिला, ‘बरं का हो, मी जाऊन येतो बाहेर.’ ‘सगळं नीट लक्षात ठेवा. ती यादी घ्या बरोबर. ‘राधाक्कांनी बजावले. आज तायडीचा म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीचा साखरपुडा. मोठी म्हणजे मुलीत मोठी. दोन मुली, त्यात तायडी मोठी. बबडी छोटी. दोन मोठे […]

लग्नाची बेडी – Part 2

पंधरा-वीस दिवसांनी एके दिवशी पहाटे पाच वाजताच राहुल आणि विभा येतात. विभा जीन्स आणि टॉपमध्ये, बॉबकट, तिचे स्वागत जरा नाराजीनेच होते. दोघेही चहा घेतात. थोडा आराम करून नऊ वाजता सगळे डायनिंग टेबलवर जमतात. थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर राहुल म्हणतो, “आई-बाबा ही विभा. विभावरी कुलकर्णी आमच्या ऑफिसमधली माझी कलिग नुकतीच आमच्या कंपनीत जॉईन झाली आहे. हिचे आई […]

लग्नाची बेडी – Part 1

“राहूल?” “हां, बोल आई.” “अरे बोल काय? काय ठरवलंयस?” “कसले?” “कसले? अरे लग्नाचे आणि कसले? तू तिकडे लांब एकटा, परदेशात, आता शिक्षणही पुरे झाले, चांगला जॉब आहे, घर आहे. चांगला सेटल झाला आहेस मग आता लग्नाचे कधी मनावर घेणार आहेस? अरे सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळी झाल्या म्हणजे बरं. आम्हाला इकडे खूप काळजी वाटते, बरं. चटकन […]

रेशीमगाठी – भाग ४

पाच-दहा मिनिटांतच एक उंचीपुरी, गौरवर्णी, तरतरीत मुलगी आत आली. वेळेवर पोचतो की नाही यामुळे येणारा एक प्रकारचा अस्वस्थ भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला होता. ती घाईने क्लार्ककडे आली आणि तिने विचारलं, “का हो, कुणी केदार देशपांडे आले आहेत का?” […]

रेशीमगाठी – भाग ३

“देशपांडे साहेब, तुमची बॅग माझ्याकडे आलीय. त्यात तुमचा जेवणाचा डबा होता. त्यावर तुमचं नाव आहे किशोर देशपांडे म्हणून. त्यावरून मी हा टेलिफोन नंबर शोधला. ती बॅग आणि डबा घेऊन तुम्हाला भेटायला येतो साहेब!” […]

1 5 6 7 8 9 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..