नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

गफूरभाई

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नारायण पेठेतील संस्कृती प्रकाशनच्या ऑफिसमध्ये काम करीत होतो. एके दिवशी दुपारी कुरळ्या केसांना भांग पाडलेला, सावळ्या रंगाचा, उंचापुरा माणूस समोर येऊन उभा राहिला. अंगात पांढरा झब्बा, त्यावर निळ्या रंगाचं जाकीट, खाली पांढरी सुरवार व पायात चपला. त्यांना मी ‘या, बसा’ म्हटलं. सुमारे सव्वीस वर्षांनंतर गफूरभाई पुणेकर मला भेटत होते. […]

हम सब ‘चोर’ है

साक्षात कृष्ण भगवान देखील लहानपणी ‘माखनचोर’ होते, मग सर्वसामान्य माणूस जर ‘चोर’ असेल तर त्यात नवल ते काय? फक्त चोरीचे प्रकार वेगवेगळे, उद्देश मात्र चोरीचाच. प्रत्येक चोरीला शासन होतंच असं नाही, काही चोऱ्यांकडे कानाडोळा केला जातो. […]

कस्टम शाॅपी

त्याकाळी वर्तमानपत्रात कस्टमने जप्त केलेल्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांच्या जाहिराती असत. काही जाहिराती ‘छोट्या जाहिराती’ सदरात येत असत. पहिल्या पानावर जाहिरात असायची ती ‘घरोंदा’ कस्टम शाॅपीची! त्या जाहिरातीत परदेशी घड्याळे, पर्फ्युम, कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, टेप रेकाॅर्डर, व्हिसीआर, खेळणी यांची यादी व किंमती दिलेल्या असत. […]

मराठी ‘माय’

मराठी चित्रपटांत ललिता पवार, अलका इनामदार, आशा पाटील, सरोज सुखटणकर, लता अरूण, वत्सला देशमुख, माई भिडे, हंसा वाडकर, सुमती गुप्ते, इत्यादींनी ‘आई’ साकारली आहे. नव्या पिढीनुसार मराठी चित्रपटांतील आजची आई बदललेली आहे. तिनं नवीन टेक्नॉलॉजी समजून घेतलेली आहे. आयटी क्षेत्रात काम करुन ती घर-संसार करते आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हाॅटसअप, ट्वीटर, ब्लाॅग ती लीलया हाताळते आहे. माॅड असली तरी ती काळाप्रमाणे चालणारी एक ‘आई’च आहे. […]

मारे गाम काथा पारे

१९७५ सालची गोष्ट आहे. हिंदी व्यावसायिक चित्रपटांच्या गर्दीत ‘अंकुर’ सारख्या कलात्मक चित्रपटाने सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेतले. शबाना आझमी, अनंत नाग, साधू मेहेर आणि आपली मराठी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर हिचा ‘अंकुर’ चित्रपट मी भानुविलास थिएटरमध्ये ‘मॅटिनी शो’ ला पाहिला. […]

‘गंध’ पुण्याचा गेला सांगून

जर एखाद्या अस्सल पुणेकराचे डोळे व कान बंद करुन पुण्याची सफर घडवली तर तो त्याला नाकाने जाणवणाऱ्या त्या त्या परिचित गंधावरुन ते ते ठिकाण हमखास सांगू शकतो. मी हा प्रयोग एकदा केला. एका अस्सल पुणेकर मित्राचे डोळे व कानावरुन काळी पट्टी लावून त्याला पुण्यातून अनेक ठिकाणी उलटे सुलटे गाडीवरुन फिरविले. मी जिथे जिथे त्याला घेऊन गेलो, त्यानं मला पोपटासारखी ‘अचूक उत्तरं’ दिली.
[…]

घरौंदा

समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर लहान मुलं आपल्या पावलावर ओलसर वाळूचा मोठा थर थापतात. मग हळूच पाऊल काढून घेतल्यावर पावलाच्या पोकळीचं छान घरटं तयार होतं व एक ‘घर’ तयार केल्याचा त्यांना अवर्णनीय आनंद मिळतो. […]

हवाहवासा ‘पाहुणा’

सुमित्रा भावे गेल्या, किशोर नांदलस्कर. अशी चित्रपट क्षेत्रातील एकेक जण ‘एक्झिट’ घेऊ लागल्यावर, काळजात धस्स होऊ लागलं. आज ना उद्या हा कोरोना जाईलही, मात्र जाताना अजून किती जणांना घेऊन जाणार आहे? हे त्याचा तोच जाणे. […]

बढती का नाम दाढी…

पूर्वी लहान मुलास भीती दाखवण्यासाठी त्याची आई म्हणायची, ‘तू जर माझं ऐकलं नाहीस तर, तुला ‘दाढीवाल्या बुवा’ला देऊन टाकेन.’ ते मूल लगेच चूप बसायचं. […]

शाळा सुटली, ‘स्क्रिन’ फुटली

जून महिन्यातील साधारणपणे दुसरा आठवडयाचा सोमवार म्हणजे शाळा सुरु होण्याचा दिवस.. म्हणजेच आजचा दिवस!! दोन वर्षांपूर्वी या दिवशी छोटी मुलं नवीन कपडे घालून शाळेचा श्रीगणेशा करायला जात होती. […]

1 36 37 38 39 40 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..